पॅरिस Paris Olympics 2024 : खेळाचं सर्वात मोठं महाकुंभ म्हणजे ऑलिम्पिक सध्या पॅरिसमध्ये होत आहे. या पॅरिस ऑलिम्पिकला 26 जुलैपासून सुरुवात झाली. तर स्पर्धेचा समारोप 11 ऑगस्टला होणार आहे. यापुर्वी पॅरिस ऑलिम्पिकशी संबंधीत एक अपडेट समोर आली आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं नेमबाज मनू भाकर तसंच भारतीय पुरुष हॉकी संघाचा गोलकीपर पीआर श्रीजेश यांची समारोप समारंभासाठी ध्वजवाहक म्हणून नियुक्ती केली आहे.
PR Sreejesh named India flagbearer with Manu Bhaker for Paris 2024 Closing Ceremony
— ANI Digital (@ani_digital) August 9, 2024
Read @ANI Story | https://t.co/0vDTcIlWqQ#PRSreejesh #IndianHockey #ParisOlympics #TeamIndia #hockey pic.twitter.com/SCW98TTfBO
आयओएनं निवेदन जारी करत दिली माहिती : भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं (IOA) एक निवेदन जारी करत ही माहिती दिली. या निवेदनात म्हटलं की, पॅरिस ऑलिम्पिकच्या समारोप समारंभासाठी नेमबाज मनू भाकर आणि हॉकी संघाचा गोलकीपर पीआर श्रीजेश यांना ध्वजवाहक घोषित करताना खूप आनंद होत आहे. आयओएच्या अध्यक्षा पीटी उषा म्हणाल्या, 'श्रीजेश आमच्यासाठी एक भावनात्मक आणि लोकप्रिय पर्याय होता. श्रीजेशनं गेल्या दोन दशकात भारतीय हॉकी आणि एकूणच भारतीय खेळांमध्ये खूप मोठं योगदान दिलं आहे.'
दोन पदकं जिंकणारी पहिलीच खेळाडू : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाज मनू भाकरनं भारताला कांस्यपदकाच्या रुपात पहिलं पदक मिळवून दिलं होतं. तिनं 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकलं. यानंतर तिनं सरबज्योत सिंग सोबत मिश्र इव्हेंटमध्येही कांस्यपदक जिंकलं. अशाप्रकारे मनूनं एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकत इतिहास रचला. यासह ती एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.
हॉकी संघानं जिंकलं कांस्यपदक : दुसरीकडे, भारतीय हॉकी संघानं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये शानदार कामगिरी केली. भारतीय हॉकी संघानं सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकावर नाव कोरलं आहे. भारतीय संघानं कांस्यपदकाच्या सामन्यात स्पेनचा 2-1 असा पराभव केला. एकूणच हॉकी संघाच्या पदकात गोलकिपर पीआर श्रीजेशनं महत्त्वाची भूमिका बजावली.
हेही वाचा :