पॅरिस Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेचा अंतिम सामना गुरुवारी रात्री उशिरा खेळला गेला. यात भारताचा 'गोल्डन बॉय' नीरज चोप्रा सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकेल अशी अपेक्षा होती. पण, काल नीरजचा दिवस नव्हता आणि त्याच्या हातातून सुवर्णपदक निसटलं. पाकिस्तानच्या अर्शद नदीमनं ऑलिम्पिकमधील विक्रम मोडीत काढत 92.97 मीटर फेक करुन सुवर्णपदक जिंकलं. मात्र रौप्यपदकावर समाधानी असूनही, 26 वर्षीय भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रानं अशी कामगिरी केली जी आजपर्यंत कोणत्याही भारतीय खेळाडूला करता आलेली नाही.
Neeraj Chopra becomes fourth Indian (Independent) to win multiple medals in an individual event at the Olympics. 🔥
— Johns. (@CricCrazyJohns) August 8, 2024
- HISTORY BY NEERAJ....!!!! pic.twitter.com/6aRpVyc96d
ट्रॅक आणि फील्डमध्ये 2 पदकं जिंकणारा पहिला भारतीय : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रानं सुवर्णपदक गमावूनही मोठा विक्रम केला. नीरजनं त्याच्या हंगामात 89.45 मीटर फेक करुन रौप्यपदक जिंकलं आणि सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये ट्रॅक आणि फील्डमध्ये पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. नीरजनं टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं, आता पॅरिसमध्ये त्यानं रौप्यपदक जिंकलं.
All set, all prepared, all in for the 🥇
— JioCinema (@JioCinema) August 8, 2024
Watch Neeraj Chopra go for glory in the Javelin final LIVE NOW on #Sports18 and stream for FREE on #JioCinema #OlympicsOnJioCinema #OlympicsOnSports18 #Olympics #Javelin #Athletics pic.twitter.com/qqoSct2Gxh
सलग ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारा तिसरा भारतीय : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकून, नीरज चोप्रा सलग 2 ऑलिम्पिकमध्ये (2021, 2024) वैयक्तिक खेळांमध्ये पदक जिंकणारा तिसरा भारतीय बनला आहे. नीरजच्या आधी स्टार कुस्तीपटू सुशील कुमार (2008, 2012) आणि स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू (2016, 2021) यांनी ही कामगिरी केली आहे.
1 पेक्षा जास्त वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारा पाचवा भारतीय : नीरज चोप्रानं आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक खेळांमध्ये एकापेक्षा जास्त पदकं जिंकणारा स्वतंत्र भारतातील तो केवळ चौथा खेळाडू ठरला आहे. वैयक्तिक खेळांमध्ये एकापेक्षा जास्त पदकं जिंकणारे खेळाडू :
- सुशील कुमार : 1 रौप्य, 1 कांस्य
- पीव्ही सिंधू : 1 रौप्य, 1 कांस्य
- मनू भाकर : 2 कांस्य
- नीरज चोप्रा : 1 सुवर्ण, 1 रौप्य
#Silver🥈it is for Neeraj✔️ Adds another🎖️to his #Olympic collection!@Neeraj_chopra1 gets Silver at the #ParisOlympics2024 with a best throw of 89.45m.
— SAI Media (@Media_SAI) August 8, 2024
He becomes the second Indian after Norman Pritchard (1900) to win two medals in track & field.
The GOAT gave it his all to… pic.twitter.com/Ak6NqjdvW4
वैयक्तिक खेळातील सर्वाधिक यशस्वी भारतीय खेळाडू : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये रौप्यपदक जिंकून, नीरज चोप्रा वैयक्तिक खेळांमध्ये ऑलिम्पिकमधील सर्वात यशस्वी भारतीय खेळाडू ठरला. नीरज चोप्रानं ऑलिम्पिकमध्ये पदकं (1 सुवर्ण, 1 रौप्य) जिंकली आहेत. याचबरोबर बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू (1 रौप्य, 1 कांस्य), कुस्तीपटू सुशील कुमार (1 रौप्य, 1 कांस्य) तर नेमबाज मनू भाकर (2 कांस्य) यांनी 2-2 ऑलिम्पिक पदकं जिंकली आहेत.
हेही वाचा :