पॅरिस Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. गुरुवारी रात्री बॉक्सिंगच्या सामन्यात एका बायोलॉजिकल पुरुष बॉक्सरचा सामना महिलेशी केल्याचा आरोप केला जात आहे.
The Olympics allowed a biological man, Imane Khelif, to fight as a woman despite his XY chromosomes. The end result?
— Robby Starbuck (@robbystarbuck) August 1, 2024
“I have never been hit so hard in my life.”
Italian Olympian Angela Carini lasted 46 seconds before quitting due to how painful it was. It’s just shameful that… pic.twitter.com/OWhKggM7qe
काय आहे प्रकरण : बॉक्सिंगच्या एका सामन्यात इटलीची अँजेला कॅरिनी आणि अल्जेरियाची इमाने खलीफ या 66 किलो वजन गटामध्ये आमने-सामने होत्या. मात्र या सामन्यात अवघ्या 46 सेकंदात इटलीच्या अँजेला कॅरिनीनं सामन्यातून माघार घेतली. त्यानंतर तिनं केलेल्या दाव्यावर सध्या जगभरात तसंच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर वाद सुरु झाला आहे. पराभूत झाल्यानंतर कॅरिनी रिंगमध्ये गुडघ्यावर बसून रडू लागली. सामन्याच्या सुरुवातीलाच कठोर मुक्रे लागल्यानं नाकात तीव्र वेदना झाल्यामुळं सामना सोडल्याचं तिनं सांगितलं. अल्जेरियन बॉक्सर इमान खलिफनं बायोलॉजिकल पुरुष असूनही महिला बॉक्सर म्हणून ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतल्यानं वाद निर्माण झाला आहे. तेव्हापासून इमान खलीफ सोशल मीडियावर खूप ट्रेंड करत आहे.
The IOC has legitimized male violence against women as entertainment.
— Genevieve Gluck (@WomenReadWomen) August 1, 2024
Get men out of women's sports.#IStandWithAngelaCarini who should never have been made to enter a boxing ring with Imane Khelif.#SaveWomensSports@Olympics @iocmedia @Marq pic.twitter.com/3PLxDmf4e0
वर्ल्ड चॅम्पियनशिपचा वाद काय : गेल्या वर्षी नवी दिल्लीत झालेल्या महिलांच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये इमाने ही टेस्टोस्टेरॉन आणि जेंडर एलिजिबीलिटी टेस्ट मध्ये अपात्र ठरली होती. त्यामुळं तिला स्पर्धेतून बाद ठरवण्यात आलं होतं, असं असूनही ऑलिम्पिकमध्ये तिला सहभागी होण्याची परवानगी का देण्यात आली? याची चर्चा सध्या सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. याप्रकरणात जगभरातून असंख्य क्रीडाप्रेमींनी अँजेला कॅरिनीला समर्थन दिलं असून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषदेवर टीका केली जात आहे.
This woman, Angela Carini, is crying because her dream of winning a medal for her late father was destroyed in 46 seconds.
— 𝐌𝐚𝐭𝐭 𝐏𝐢𝐧𝐧𝐞𝐫 (@Matt_Pinner) August 1, 2024
Male boxer Imane Khelif beat up Angela Carini and punched her in the face.#IStandWithAngelaCarini #Paris2024
The @Olympics should be ashamed pic.twitter.com/Ic8hjU1sMD
पॅरिस ऑलिम्पिक पात्रतेबाबत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषदेनं काय म्हटलं : आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे प्रवक्ते मार्क ॲडम्स यांनी इमान खलिफ वादाच्या संदर्भात म्हटलं की, खलिफच्या पासपोर्टवर 'महिला' असं लिहिलेलं असल्यानं ती महिलांच्या 66 किलो गटात खेळत आहे. महिला गटातील सर्व महिला स्पर्धा पात्रता नियमांचं पालन करत आहेत. तिच्या पासपोर्टमध्ये स्त्री असं लिहिलं आहे म्हणूनच त्या महिला आहेत.
Joint Paris 2024 Boxing Unit/IOC Statementhttps://t.co/22yVzxFuLd pic.twitter.com/fZvgsW8OOi
— IOC MEDIA (@iocmedia) August 1, 2024
हेही वाचा :
- पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या स्वप्नीलच्या गावात दिवाळी; मायदेशी परतल्यानंतर 'असं' होणार स्वागत - paris olympics 2024
- सात्विक-चिरागचं ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचं स्वप्न भंगलं; उपांत्यपूर्व सामन्यात पराभव - Paris Olympics 2024
- पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला मोठा धक्का; पदकाची प्रबळ दावेदार असलेल्या स्टार बॉक्सरचं आव्हान संपुष्टात - Paris Olympics 2024