पॅरिस Vinesh Phogat Plea Result : भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटनं पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये महिलांच्या 50 किलो कुस्तीच्या अंतिम सामन्यातून अपात्र ठरवल्याच्या विरोधात कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट (CAS) मध्ये अपील दाखल केलं होतं. सीएएसच्या तदर्थ विभागातील त्याची सुनावणी पूर्ण झाली आणि भारतीय ऑलिम्पिक असोसिएशननं (IOA) सांगितलं की त्यांना अनुकूल निर्णयाची अपेक्षा आहे.
BIG BREAKING
— Boria Majumdar (@BoriaMajumdar) August 10, 2024
Here is the breaking update on the @Phogat_Vinesh appeal.
Decision to come today by 6pm Paris time. @RevSportzGlobal pic.twitter.com/u5FmSHQswa
आज रात्री होईल निर्णय : रविवारी पॅरिस ऑलिम्पिकच्या समारोप समारंभाच्या आधी हा निर्णय येऊ शकतो, असे तदर्थ विभागाने म्हटले होते. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) कुस्तीपटू विनेश फोगटने कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट (CAS) च्या तदर्थ विभागासमोर तिच्या वजन गटात अपात्र ठरल्याबद्दल दाखल केलेल्या अर्जावर सकारात्मक निर्णय घेण्याची आशा आहे. त्याचा निर्णय आज रात्री साडेनऊपर्यंत येईल, CAS नं एक निवेदन जारी करुन ही माहिती दिली आहे. मात्र आजचा निर्णय आता उद्यावर ढकलण्यात आला आहे.
The decision on VINESH PHOGAT will come at 9.30 pm IST today. [RevSportz] pic.twitter.com/UyHYAVot0x
— Johns. (@CricCrazyJohns) August 10, 2024
कोणी मांडली बाजू : विनेशच्या जागी क्यूबन कुस्तीपटू युस्नेलिस गुजमन लोपेझने फायनलमध्ये प्रवेश केला होता. जिला उपांत्य फेरीत विनेशकडून पराभव पत्करावा लागला होता. भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटनं तिच्या अपीलमध्ये लोपेझसोबत संयुक्त रौप्यपदक देण्याची मागणी केली आहे. कारण मंगळवारी झालेल्या सामन्यांदरम्यान तिचं वजन निर्धारित मर्यादेत होतं. विनेशची बाजू सुप्रसिद्ध ज्येष्ठ वकील हरीश साळवे आणि विदुष्पत सिंघानिया यांनी मांडली.
तीन तास चालली सुनावणी : IOA नं म्हटले की, 'हे प्रकरण अद्याप विचाराधीन आहे, त्यामुळं आता एवढंच म्हणता येईल की, एकमेव मध्यस्थ डॉ. ॲनाबेल बेनेट एसी (ऑस्ट्रेलिया) यांनी सर्व पक्षकार विनेश फोगट, युनायटेड वर्ल्ड रेसलिंग, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आणि IOA यांचं म्हणणं ऐकलं. ही सुनावणी सुमारे 3 तास चालली. सुनावणीपूर्वी सर्व संबंधित पक्षांना त्यांचे तपशीलवार कायदेशीर शपथपत्र सादर करण्याची संधी देण्यात आली होती. त्यानंतर प्रतिवादाला सुरुवात झाली.
आयओए अध्यक्ष पीटी उषा यांनी मानले आभार : आयओएच्या अध्यक्षा पीटी उषा यांनी साळवे, सिंघानिया आणि क्रिडा यांच्या कायदेशीर टीमनं सुनावणीदरम्यान सहकार्य आणि युक्तिवाद केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. डॉ. उषा म्हणाल्या, 'या खटल्याचा निकाल काहीही लागला तरी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि आम्हाला त्यांच्या कामगिरीचा अभिमान आहे'.
हेही वाचा :