पॅरिस Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या पदार्पणाच्या सामन्यात हरमीत देसाईची चमकदार कामगिरी पाहायला मिळाली. आपल्या ऑलिम्पिक पदार्पणात, भारतीय पॅडलर हरमीत देसाईनं शनिवारी पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या टेबल टेनिस एकेरी स्पर्धेत पहिला विजय मिळवला. हरमीतनं आपलं कौशल्य दाखवलं आणि प्राथमिक सामन्यात जॉर्डनच्या अबो यमन झैदवर 4-0 असा सहज विजय मिळवला.
🚨 Table Tennis - Easy win for @HarmeetDesai as makes his way into the next round with a comfortable 4-0 win! pic.twitter.com/rjXNq4WaJe
— Team India (@WeAreTeamIndia) July 27, 2024
30 मिनिटांत केला प्रतिस्पर्ध्याचा पराभव : या सामन्यात हरमीतला त्याच्या प्रतिस्पर्ध्याला पराभूत करण्यासाठी केवळ 30 मिनिटं लागले. हरमीतनं 11-7 11-9 11-5 11-5 असा विजय मिळवून आपली मोहीम सकारात्मकतेनं पुढं नेली. 31 वर्षीय हरमीतनं चांगली लय शोधली आणि बहुतांश प्रसंगी तो त्याच्या जॉर्डनच्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध वरचढ होता. पहिल्या गेममध्ये सहज विजय मिळविल्यानंतर, हरमीतनं दुसऱ्या गेममध्येही सरळ आघाडी घेतली.
🇮🇳 Result Update: TABLE TENNIS MEN'S SINGLES PRELIMINARY ROUND👇@HarmeetDesai beats Jordan's Zaid Abo Yaman 11-7, 11-9, 11-5 & 11-5 to qualify for the Round of 64. @ttfitweet pic.twitter.com/jf032nFkHd
— SAI Media (@Media_SAI) July 27, 2024
रविवारी खेळणार पुढील सामना : हरमीत हा भारतातील दोन पुरुष एकेरी खेळाडूंपैकी एक आहे. तसंच अनुभवी अचंता शरथ कमल, जो उद्घाटन समारंभात भारताचा ध्वजवाहक होता. जर्मनीतील तीन स्पर्धा आणि वयक्तिक प्रशिक्षणानंतर भारतीय पॅडलर्स ऑलिम्पिकमध्ये आले आहेत. 31 वर्षीय हरमीत दक्षिण पॅरिस एरिना 4 इथं पुरुष एकेरीच्या टेबल टेनिस स्पर्धेच्या 64 च्या फेरीत फ्रान्सच्या लेब्रॉन फेलिक्सविरुद्ध आपला पुढील सामना खेळेल. हा सामना 28 जुलै रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 11.30 वाजता सुरु होईल.
मागील दशकात दमदार कामगिरी : गेल्या दशकात जागतिक स्पर्धांमध्ये हरमीतची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. 2019 मध्ये हरमीतनं इंडोनेशियामध्ये आयोजित ITTF जिंकलं आणि ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. हरमीत देसाईनं 2018 आणि 2022 मध्ये कॉमनवेल्थ गेम्समध्ये भाग घेतला आणि दोन्ही हंगामांमध्ये सांघिक स्पर्धांमध्ये सुवर्णपदकं जिंकली. तसंच, 2021 मध्ये दोहा इथं झालेल्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये त्यानं दोन सुवर्णपदकं जिंकली.
हेही वाचा :