ETV Bharat / sports

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पहिल्या दिवशी पदक जिंकण्याचं भारताचं स्वप्न भंगलं; 'या' भारतीय खेळाडूनं जिंकलं होतं पहिल्याच दिवशी पदक - Paris Olympics 2024 - PARIS OLYMPICS 2024

Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकच्या पहिल्या दिवशी 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी निराशाजनक कामगिरी केली. इलावेनिल वालारिवन आणि संदीप सिंग 12 व्या स्थानावर तर रमिता जिंदाल आणि अर्जुन बबुता यांनी सहावा क्रमांक पटकावला.

Paris Olympics 2024
10 मीटर एअर रायफल (ANI Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 27, 2024, 3:25 PM IST

Updated : Jul 27, 2024, 3:41 PM IST

पॅरिस Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये खेळांना सुरुवात झाली आहे. आज (27 जुलै) पहिल्या दिवशी भारतीय नेमबाजांकडून पदकांची अपेक्षा होती, पण त्यांनी निराशा केली. 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक स्पर्धेत दोन्ही भारतीय जोडी अंतिम फेरीसाठी पात्र ठरु शकल्या नाहीत. इलावेनिल वालारिवन आणि संदीप सिंग 12 व्या स्थानावर राहिले तर रमिता जिंदाल आणि अर्जुन बबुता यांनी सहावा क्रमांक पटकावला. रमिता-अर्जुननं एकूण 628.7 गुण मिळवले. तर इलावेनिल-संदीप यांना 626.3 गुण मिळाले.

केवळ टॉप 4 संघ अंतिम फेरीत : 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक स्पर्धेत फक्त टॉप 4 संघच पदक फेरीसाठी पात्र ठरले. या स्पर्धेचा अंतिम सामना आजच (27 जुलै) रोजी होणार आहे. भारतासाठी पदक मिळवण्याची आज ही एकमेव स्पर्धा होती. ऑलिम्पिक स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताकडून पदक जिंकण्याचा विक्रम वेटलिफ्टर मीराबाई चानूच्या नावावर आहे. चानूनं टोकियो ऑलिम्पिक 2020 च्या पहिल्याच दिवशी रौप्य पदक जिंकलं होतं.

10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक स्पर्धेत भारतीय नेमबाजांची कामगिरी :

  • रमिता जिंदाल - पहिली फेरी : 104.6, दुसरी फेरी 104.4, तिसरी फेरी 105.5, एकूण : 314.5 गुण
  • अर्जुन बबुता - पहिली फेरी : 104.1, दुसरी फेरी 106.2, तिसरी फेरी 103.9, एकूण : 314.2 गुण
  • इलावेनिल वालारिवन - पहिली फेरी : 103.4, दुसरी फेरी 104.7, तिसरी फेरी 104.5, एकूण : 312.6 गुण
  • संदीप सिंग - पहिली फेरी : 104.1, दुसरी फेरी 105.3, तिसरी फेरी 104.3, एकूण : 313.7 गुण

10 मीटर एअर रायफलमध्ये अपेक्षा : नेमबाजीतील मिश्र सांघिक स्पर्धेत निराशजनक कामगिरीनंतर आता पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफलमध्ये भारतीय खेळाडूंकडून मोठ्या अपेक्षा आहेत. पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफलची पात्रता फेरी सुरु झाली आहे. भारताचा अर्जुन सिंग चीमा आणि सरबजोत या स्पर्धेत आहेत. या दोघांकडून देशाला मोठ्या अपेक्षा आहेत.

हेही वाचा :

  1. शानदार सोहळ्यानं पॅरिस ऑलिम्पिकचं उद्‌घाटन; भारतीय पारंपरिक वेशभूषा अन्... 'या' गोष्टींनी वेधलं लक्ष - Paris Olympics 2024
  2. अमरावतीचं ऑलिम्पिक कनेक्शन; श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या खेळाडूंचं हिटलरनं केलं होतं कौतुक, 'ईटीव्ही भारत'चा स्पेशल रिपोर्ट - Amravati Olympic News

Last Updated : Jul 27, 2024, 3:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.