पॅरिस Paris Olympics 2024 Badminton : भारताचा स्टार शटलर लक्ष्य सेनला पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये बॅडमिंटन पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत सध्याचा ऑलिम्पिक चॅम्पियन डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सेलसेनकडून पराभव पत्करावा लागला आहे. यामुळं त्याचं अंतिम फेरीत जाण्याचं स्वप्न भंगलं असलं तरी तो आता कांस्यपदका सामना खेळेल. हा सामना जिंकत देशाला आणखी एक पदक मिळवून देण्याचा त्याचा प्रयत्न असेल. लक्ष्य सेनचा कांस्यपदाकासाठीचा सामना सोमवारी सायंकाळी 6 वाजता होणार आहे.
Lakshya Sen will be in action in Bronze medal match tomorrow, taking on WR 7 Lee Zii Jia.
— India_AllSports (@India_AllSports) August 4, 2024
H2H Lakshya leading 4-1 against the Malaysian shuttler. #Badminton #Paris2024 #Paris2024withIAS pic.twitter.com/tSGHmytiii
पहिला सेट थोडक्यात हुकला : भारताच्या 22 वर्षीय युवा शटलरनं सामन्याची सुरुवात धमाकेदार केली. लक्ष्यनं सुरुवातीला आक्रमक पवित्रा स्वीकारला आणि मध्यंतरापर्यंत 11-9 गुणांसह 2 गुणांची आघाडी घेतली होती. यानंतरही लक्ष्यनं चमकदार कामगिरी करत प्रतिस्पर्धी खेळाडूला एकही संधी दिली नाही. पहिल्या सेटमध्ये लक्ष्य 18-15 नं आघाडीवर होता. पण व्हिक्टरनं जोरदार पुनरागमन करत स्कोअर 20-20 असा बरोबरीत आणला आणि त्यानंतर सलग दोन गेम पॉइंट घेत पहिला सेट 22-20 असा जिंकला.
We are incredibly proud of you, Lakshya!! 🌟
— JioCinema (@JioCinema) August 4, 2024
You are still the first Indian male shuttler to reach the semi-finals at the Olympics ❤️ We Go again tomorrow for the Bronze medal!🥉 #Cheer4Bharat & catch all the action LIVE on #Sports18. Stream for FREE on #JioCinema! 👈… pic.twitter.com/aqAmJDbPtf
दुसरा सेटही रोमांचक : दोन्ही खेळाडूंमधील दुसरा सेटही अतिशय रोमांचक झाला. दुसऱ्या गेममध्ये 7-0 नं पिछाडीवर पडल्यानंतर एक्सेलसेननं शानदार पुनरागमन केलं. मात्र, मध्यांतरापर्यंत लक्ष्य सेननं 11-10 अशी आघाडी घेतली. पण यानंतर पुन्हा त्यानं आपली आघाडी गमावली आणि दुसरा सेट कट्टर प्रतिस्पर्धी व्हिक्टर एक्सेलसेनकडून 14-21 असा गमावला आणि उपांत्य फेरीतून बाहेर पडला.
उपांत्य फेरी गाठून रचला इतिहास : शुक्रवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारतीय शटलर लक्ष्य सेननं चिनी तैपेईच्या चाऊ तिएन चेनचा रोमहर्षक लढतीत पराभव केला होता. या विजयासह, ऑलिम्पिकमध्ये पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा तो पहिला भारतीय बॅडमिंटनपटू ठरला.
सोमवारी कांस्यपदकाची लढत : भारताचा युवा शटलर लक्ष्य सेन, आपल्या पहिल्या ऑलिम्पिकमध्ये खेळत असून, सोमवारी कांस्यपदकाच्या लढतीसाठी मलेशियाच्या ली झी जियाशी सामना होईल. त्याला ऑलिम्पिकमधील पुरुष एकेरीच्या बॅडमिंटनमध्ये भारतासाठी पहिलं पदक जिंकण्याची संधी आहे. कांस्यपदकासाठीचा सामना सोमवारी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता होणार आहे.
हेही वाचा :