पॅरिस Paris Olympics 2024 Badminton : भारताचा स्टार शटलर एचएस प्रणॉयनं बुधवारी रात्री उशिरा खेळल्या गेलेल्या बॅडमिंटन पुरुष एकेरी गट सामन्यात व्हिएतनामच्या ले डक फॅटचा 16-21, 21-11, 21-12 असा पराभव केला. या विजयासह त्यानं गटविजेता म्हणून उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मात्र दुर्दैवानं आता राऊंड ऑफ 16 मध्ये त्याचा सामना आपल्याच देशाच्या लक्ष्य सेनशी होणार आहे, हा सामना आज संध्याकाळी 5:40 वाजेनंतर होणार आहे.
Prannoy cruised through with a brilliant comeback victory to enter the pre-quarterfinal at his maiden #Olympics! 🫡🔥
— BAI Media (@BAI_Media) July 31, 2024
📸: @badmintonphoto#Paris2024#IndiaAtParis24#Cheer4Bharat#IndiaontheRise#Badminton pic.twitter.com/t5UGhMIjna
एचएस प्रणॉय उपउपांत्यपूर्व सामन्यात : 13व्या मानांकित प्रणॉयनं बुधवारी ला चॅपेल एरिना इथं आपल्या बिगरमानांकित व्हिएतनामी प्रतिस्पर्ध्याचा 62 मिनिटांत सहज पराभव केला. गेल्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या 32 वर्षीय भारतीय शटलरला पहिल्याच सामन्यात अनपेक्षित पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. मात्र, प्रणॉयनं जोरदार पुनरागमन करत दुसरा आणि तिसरा सामना सहज जिंकला.
An all-Indian clash!!! 🥶
— JioCinema (@JioCinema) July 31, 2024
Lakshya Sen & HS Prannoy will go head-to-head in a thrilling R16 match tomorrow 🏸
Catch all the action from this mouthwatering clash LIVE on #Sports18 and stream for FREE on #JioCinema! 👈#OlympicsOnJioCinema #OlympicsOnSports18 #JioCinemaSports… pic.twitter.com/qnt7trWlFO
उपउपांत्यपूर्व फेरीत प्रणय विरुद्ध लक्ष्य आमनेसामने : याआधी बुधवारी भारताचा युवा शटलर लक्ष्य सेननं पुरुष एकेरीच्या गटातील लढतीत इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीचा 21-18, 21-12 असा पराभव करत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आता भारताचे हे दोन स्टार शटलर आज होणाऱ्या राउंड ऑफ 16 मध्ये आमनेसामने येणार आहेत. या सामन्यानंतर या दोघांपैकी एका खेळाडूचं पॅरिस ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात येईल हे मात्र नक्की.
Lakshya Enters Round of 16 in Style in his maiden #Olympics! 😍🔥
— BAI Media (@BAI_Media) July 31, 2024
Gets the better of WR-4 Christie 🇮🇩 in straight games. 🔝
📸: @badmintonphoto#Paris2024#IndiaAtParis24#Cheer4Bharat#IndiaontheRise#Badminton pic.twitter.com/xMub2m8Tbu
प्रणय विरुद्ध लक्ष्य हेड टू हेड : भारताचा अनुभवी शटलर एचएस प्रणॉय आणि युवा स्टार लक्ष्य सेन आतापर्यंत 7 वेळा आमनेसामने आले आहेत. यात लक्ष्य सेन प्रणॉयवर भारी पडला. दोघांमध्ये झालेल्या एकूण 7 सामन्यांपैकी लक्ष्य सेननं 4 वेळा विजय मिळवला आहे. त्याचवेळी प्रणॉयनं तीन वेळा बाजी मारली आहे. हे दोन्ही खेळाडू 14 जानेवारी 2022 रोजी इंडिया ओपनमध्ये शेवटचे आमनेसामने आले होते. यादरम्यान लक्ष्यनं प्रणॉयचा 21-14, 9-21, 14-21 असा पराभव केला. दोन्ही शटलर्समध्ये आज रोमांचक लढत अपेक्षित आहे.
🇮🇳 Result Update: #Badminton🏸Men’s Singles Group Stage👇@PRANNOYHSPRI , the rockstar, qualifies for the Round of 16 at #ParisOlympics2024.
— SAI Media (@Media_SAI) July 31, 2024
After a tough battle against Vietnam’s Le Duc Phat, Prannoy makes his way into the Round of 16 as he wins with a scoreline of 16-21,… pic.twitter.com/io4iv5hfnF
हेही वाचा :