ETV Bharat / sports

विनेश फोगटच्या आधी 'या' खेळाडूला CAS कोर्टातून मिळाला न्याय; अमेरिकन खेळाडूकडून जिंकलं 'कांस्यपदक' - paris olympic 2024

author img

By ETV Bharat Sports Team

Published : Aug 11, 2024, 5:22 PM IST

Gymnastics Bronze Ana Barbosu : पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या अखेरीस, कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्स (CAS) नं रोमानियाची जिम्नॅस्ट ॲना बार्बोसूला आनंदाची बातमी दिली आहे. तिला आता कांस्यपदक मिळणार आहे.

Gymnastics Bronze
विनेश फोगट (IANS Photo)

पॅरिस Gymnastics Bronze Ana Barbosu : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये, स्टार भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट 100 ग्रॅम जास्त वजनामुळं अंतिम फेरीसाठी अपात्र झाली होती. अशा स्थितीत तिच्याकडून पदक हिसकावण्यात आलं. त्यानंतर विनेशनं कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्समध्ये (CAS) अपील दाखल केलं असून त्यावर सुनावणी झाली आहे. आता 13 ऑगस्टला निर्णय होणार आहे. पण त्याआधी CAS नं रोमानियन जिम्नॅस्ट ॲना बार्बोसू हिला आनंदाची बातमी दिली आहे. जिम्नॅस्टिक्सच्या फ्लोर इव्हेंटमध्ये पराभूत होऊनही ॲना बार्बोसूनं कांस्यपदक जिंकलं आहे. इतकंच नव्हे तर न्यायालयानं अमेरिकन जिम्नॅस्ट जॉर्डन चिलीसचं कांस्यपदक हिसकावलं आहे. या स्पर्धेत जॉर्डन तिसऱ्या आणि ॲना बार्बोसू चौथ्या क्रमांकावर होती. (Vinesh Phogat Verdict)

कोर्टानं ॲना बार्बोसूच्या बाजूनं दिला निकाल : खरं तर, स्पर्धेच्या अंतिम फेरीत, अमेरिकेच्या जॉर्डननं 13.766 गुणांसह तिसरं स्थान मिळवून कांस्यपदक जिंकलं. तर ॲना बार्बोसूचा स्कोअर 13.700 होता आणि ती चौथ्या स्थानावर राहिल्यानंतर बाहेर पडली. म्हणजे एक प्रकारे तिचा पराभव झाला. मात्र CAS च्या निर्णयानंतर आता हे प्रकरण पूर्णपणे मोडीत निघालं आहे. या सामन्यातील पराभवानंतर ॲना बार्बोसू आणि तिच्या टीमनं CAS मध्ये केस दाखल केली होती. ती म्हणाली की, जॉर्डन चिलीसला चुकीचे गुण देण्यात आले, त्यामुळं ती तिसरी राहिली आणि कांस्यपदक जिंकलं. या प्रकरणी CAS मध्ये दीर्घ सुनावणी झाली आणि त्यांना ॲना बार्बोसू योग्य वाटली.

ॲना बार्बोसू तिसऱ्या स्थानावर : यानंतर CAS नं जॉर्डन चिलीचे गुणही वजा केले आहे. या निर्णयानंतर जॉर्डन चिलीचा स्कोअर 13.666 झाला आहे. यासह ती पाचव्या स्थानावर पोहोचली. तर ॲना बार्बोसू तिसऱ्या स्थानावर आहे. अशाप्रकारे न्यायालयाच्या निर्णयानंतर ॲना बार्बोसूला कांस्यपदक देण्यात आलं. आता या निर्णयानंतर ॲना बार्बोसू खूश आहे. जिम्नॅस्टिक्स फ्लोअर इव्हेंटच्या अंतिम फेरीत ब्राझीलच्या रेबेका अँड्रेडनं सुवर्णपदक तर अमेरिकेच्या सिमोन बायल्सनं रौप्यपदक पटकावलं आहे.

विनेशची केसही CAS कोर्टात सुरु : विनेश फोगटचा खटलाही CAS कोर्टात सुरु आहे. (Vinesh Phogat Silver) 50 किलो फ्रीस्टाइल कुस्तीच्या अंतिम फेरीत प्रवेश करुन विनेशला रौप्यपदकाची खात्री होती. परंतु, तिला पदकाच्या सामन्यापूर्वीच अपात्र ठरवण्यात आलं कारण तिचं वजन ऑलिम्पिक सुवर्णपदकाच्या सामन्यापूर्वी 100 ग्रॅम जास्त होतं. विनेशनं उपांत्य फेरीत क्युबाची कुस्तीपटू युस्नेलिस गुझमनचा 5-0 असा पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला होता. विनेशला फायनल जिंकून सुवर्णपदक जिंकण्याची संधी होती. पण अंतिम सामन्याच्या दिवशी सकाळी विनेशचं वजन 100 ग्रॅम जास्त असल्याचं आढळून आलं आणि तिला अपात्र ठरवण्यात आलं. त्यानंतर विनेशनं CAS मध्ये केस दाखल केली असून, त्यावर 13 ऑगस्ट रोजी निर्णय होणार आहे. विनेशच्या बाजूनं निर्णय आल्यास त्यांना संयुक्तपणे रौप्यपदक मिळेल.

हेही वाचा :

  1. अमेरिकेपेक्षा कमी पदकं जिंकूनही चीन ऑलिम्पिक पदकतालिकेत अव्वल स्थानी; 91 देशांमध्ये भारताचा कितवा क्रमांक? - Olympics 2024 Medal Tally
  2. विनेश फोगटच नव्हे, तर 'या' भारतीय खेळाडूंनीही दोषी आढळल्यानं गमावली पदकं; 'पद्मश्री' आणि 'अर्जुन पुरस्कार' विजेत्यांचाही यादीत समावेश - Paris Olympics 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.