रावळपिंडी Pakistan Won Series Against England : पाकिस्तान आणि इंग्लंड क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना रावळपिंडीत खेळला गेला. हा सामना जिंकत पाकिस्तान संघानं 2-1 नं मालिका जिंकली. पाकिस्तान संघासाठी ही मालिका खूप खास होती. कारण मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर पाकिस्तान संघात मोठे बदल करण्यात आले. बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदीसारख्या स्टार खेळाडूंना संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. याचा फायदा पाकिस्तान संघालाही झाला, सलग दोन सामने जिंकून संघानं मालिका जिंकली.
Pakistan achieve their first Test series victory under the leadership of Shan Masood 👏#WTC25 | #PAKvENG 📝: https://t.co/87QqjAVXzJ pic.twitter.com/h5beApSmrK
— ICC (@ICC) October 26, 2024
फिरकीत अडकले इंग्रज : पाकिस्तानचे फिरकी गोलंदाज नोमान अली आणि साजिद खान यांनी सामन्यात इंग्लंडचं कंबरडं मोडलं. तिसऱ्या कसोटीत पाकिस्तानला अवघ्या 36 धावांचं लक्ष्य मिळालं होतं. जे त्यांनी एका गड्याच्या मोबदल्यात गाठलं आहे. नोमानच्या 6 विकेट्स आणि साजिदच्या 5 विकेट्समुळं इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात 112 रन्सवर आटोपला. गेल्या 4 डावांमध्ये दोघांनी 40 पैकी 39 विकेट घेतल्या आहेत. नोमान अली आणि साजिद खान यांनी इंग्लंडच्या शेवटच्या 4 डावांपैकी 3 डावात सर्व 10 विकेट घेतल्या आहेत. जाहिद महमूदनं रावळपिंडी कसोटीच्या पहिल्या डावात एक विकेट घेतली. दोघांनी मिळून त्या डावात 9 विकेट घेतल्या होत्या.
Pakistan required just 19 balls to chase down the target, winning the match and clinching the series! 🙌🇵🇰
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 26, 2024
Scorecard: https://t.co/KZy76OPc1b#PAKvENG | #TestAtHome pic.twitter.com/fo86g6mK58
पाकिस्तानने एकतर्फी जिंकला सामना : दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तान संघानं एकतर्फी विजय मिळवला. इंग्लंडनं पाकिस्तानसमोर सामना जिंकण्यासाठी केवळ 36 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. पाकिस्ताननं हे लक्ष्य अवघ्या 3.1 षटकांत 1 गडी गमावून पूर्ण केले आणि सामना जिंकण्याबरोबरच मालिकाही जिंकली. पाकिस्ताननं दीर्घ प्रतीक्षेनंतर मायदेशात कसोटी मालिका जिंकली आहे. यापूर्वी 2021 च्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेला घरच्या मैदानावर पराभूत केलं होतं. म्हणजेच तब्बल 4 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पाकिस्तानला घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत विजय मिळाला आहे.
हेही वाचा :