मुलतान Pakistan Playing 11 : पाकिस्तान आणि इंग्लंड क्रिकेट संघांमध्ये तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानला घरच्या मैदानावर दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. अशा परिस्थितीत पाकिस्ताननं आपल्या संघात अनेक मोठे बदल केले आहेत. त्याचा परिणाम त्यांच्या प्लेइंग 11 मध्येही दिसून आला आहे. दुसऱ्या कसोटीसाठी पाकिस्तानच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा करण्यात आली असून त्यात अनेक नवीन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. या संघात एकूण 4 बदल पाहायला मिळाले आहेत. तर बाबर आझमच्या जागी नव्या खेळाडूला स्थान मिळाले आहे.
The men’s national selection committee has confirmed Pakistan’s playing XI for the second Test against England, starting in Multan on Tuesday, 15 October.#PAKvENG | #TestAtHome pic.twitter.com/WzLnC0lfYQ
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 14, 2024
पाकिस्ताननं घोषित केली प्लेइंग 11 : या मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानला एक डाव आणि 47 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. अशा परिस्थितीत पाकिस्ताननं मालिकेत पुनरागमन करण्यासाठी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. बाबर आझम, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि सर्फराज अहमद यांना संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. अशा परिस्थितीत एक नवा संघ मैदानात पाहायला मिळणार आहे. या सामन्यासाठी बाबरच्या जागी कामरान गुलामचा प्लेईंग 11 मध्ये समावेश करण्यात आला आहे. कामरान गुलामनं पाकिस्तानकडून आतापर्यंत फक्त 1 एकदिवसीय सामना खेळला आहे. म्हणजेच या सामन्यातून तो कसोटी पदार्पण करेल.
संघात अनेक नवे चेहरे : शाहीन शाह आफ्रिदीऐवजी नोमान अलीचा गोलंदाजीत समावेश करण्यात आला आहे. तसंच साजिद खान आणि जाहिद मेहमूद यांनाही प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळालं आहे. हे दोन्ही खेळाडू फिरकी गोलंदाजी करतात. याशिवाय पहिल्या सामन्यात खेळलेले सॅम अयुब, अब्दुल्ला शफीक, शान मसूद, सौद शकील, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सलमान अली आगा आणि आमिर जमाल हे देखील दुसऱ्या कसोटीचा भाग आहेत.
इंग्लंड संघातही दोन बदल : या सामन्यासाठी इंग्लंड संघानंही आपली प्लेइंग 11 देखील जाहीर केली आहे. नियमित कर्णधार बेन स्टोक्सचं संघात पुनरागमन झालं असून तो दुखापतीमुळं पहिला सामना खेळू शकला नाही. त्याचबरोबर मॅथ्यू पॉट्सचाही प्लेइंग 11 मध्ये समावेश करण्यात आला आहे. या दोन्ही खेळाडूंनी गस ऍटकिन्सन आणि ख्रिस वोक्सची जागा घेतली आहे.
दुसऱ्या कसोटीसाठी पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन :
सॅम अयुब, अब्दुल्ला शफीक, शान मसूद (कर्णधार), कामरान गुलाम, सौद शकील (उपकर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सलमान अली आगा, आमिर जमाल, नोमान अली, साजिद खान आणि जाहिद मेहमूद.
दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग 11 :
जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (विकेटकीपर), ब्रायडन कार्स, मॅट पॉट्स, जॅक लीच, शोएब बशीर.
हेही वाचा :