ETV Bharat / sports

Pak vs Ban 2nd Test : पावसानं पाकिस्तानला वाचवलं, मात्र पाचव्या दिवशी बांगलादेशविरुद्ध लाजिरवाणा पराभव निश्चित? - Pakistan vs Bangladesh

Pak vs Ban 2nd Test Live : पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवसाचा खेळ संपला आहे. या कसोटीतही पाकिस्तान पराभवाच्या छायेत आहे.

Pak vs Ban 2nd Test Live
Pak vs Ban 2nd Test Live (AP Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Sep 2, 2024, 7:36 PM IST

रावळपिंडी Pak vs Ban 2nd Test Live : पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवसाचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बांगलादेशनं दुसऱ्या डावात एकही विकेट न गमावता 42 धावा केल्या होत्या. आता सामन्याच्या शेवटच्या दिवशी बांगलादेशला विजयासाठी 143 धावा करायच्या आहेत, तर पाकिस्तानला 10 विकेट्सची गरज आहे. आज चौथ्या दिवशी पावसानं हजेरी लावल्यानं पुर्ण खेळ होऊ शकला नाही.

पाकिस्तानला लाजिरवाण्या पराभवाची भिती : बांगलादेशनं दुसरी कसोटी जिंकल्यास मालिकेत क्लीन स्वीप होईल. बांगलादेशनं मालिकेतील पहिला कसोटी सामना 10 गडी राखून जिंकली. जर बांगलादेशनं दुसराही कसोटी सामना जिंकला तर ते पाकिस्तानला प्रथमच कसोटी मालिकेत पराभूत करतील. अशा परिस्थितीत पाकिस्तानला जगात नाचक्की भीती आहे.

बाबर आझमची फ्लॉप : तत्पूर्वी, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पाकिस्ताननं दुसऱ्या डावात 2 गडी गमावून 9 धावा केल्या होत्या. सामन्याच्या चौथ्या दिवशीही पाकिस्तानच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. माजी कर्णधार बाबर आझम पुन्हा एकदा सपशेल अपयशी ठरला. पाकिस्तानकडून आघा सलमाननं सर्वाधिक 71 चेंडूत नाबाद 47 धावा केल्या तर यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवाननं 73 चेंडूत 43 धावा केल्या.

हसन महमूदनं घेतले 5 बळी : सैम अय्युबनं 35 चेंडूत 20 धावा, कर्णधार शान मसूदनं 34 चेंडूत 28 धावा, सौद शकीलनं 10 चेंडूत 2 धावा केल्या. मोहम्मद अलीचं खातंही उघडलं नाही. अबरार अहमदनं 2 आणि मीर हमजानं 4 धावा केल्या. बांगलादेशकडून हसन महमूदनं सर्वाधिक 5 बळी घेतले. त्याच्याशिवाय नाहिद राणानं 4 आणि तस्किन अहमदनं 1 बळी घेतला.

बांगलादेशचा क्लीन स्वीप करण्याचा प्रयत्न : यानंतर प्रत्युत्तरात फलंदाजीसाठी उतरलेल्या बांगलादेशनं चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दुसऱ्या डावात एकही विकेट न गमावता 42 धावा केल्या. झाकीर हसन 23 चेंडूत 31 धावा केल्यानंतर क्रीजवर उपस्थित आहे. शादमान इस्लामनं 19 चेंडूत 9 धावा केल्या आहेत. दोन्ही फलंदाज शेवटच्या दिवशी आपली भागीदारी आणखी वाढवण्याचा प्रयत्न करतील. तसंच हा सामना जिंकत बांगलादेशचा पाकिस्तानला क्लीन स्वीप देण्याचा प्रयत्न असेल.

हेही वाचा :

  1. दुसऱ्या कसोटीतही पाकिस्तान पराभवाच्या छायेत; बांगलादेशच्या 'लिटन'समोर प्रतिस्पर्धी गोलंदाज बनले 'दास' - Pak vs Ban 2nd Test
  2. '...तर भारतीय संघानं चॅम्पियन ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जावं', 'आप' खासदाराचं मोठं वक्तव्य - Champions Trophy 2025

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.