ॲडलेड 18 Hours Non-Stop Cricket : विकेंड म्हटलं की बहुतांश लोक फिरायला जाण्याचा प्लान करतात, तर काही लोक आपल्या आवडीच्या गोष्टी करण्याचंही नियोजन करतात तर अशा हौशी लोकांसाठी या वीकेंडला म्हणजेच आज 6 डिसेंबर शुक्रवारी रोजी 24 तासांतील तब्बल 18 तास क्रिकेटचे सामने पाहता येणार आहेत. विशेष म्हणजे यात भारतासह सहा संघ आपापसात क्रिकेटचे सामने खेळणार आहेत. त्यातही हे कसोटी सामने होणार आहेतय त्यामुळं क्रिकेटप्रेमींसाठी मोठी पर्वणी असणार आहे.
Our XI for the second Test against New Zealand has been announced 👇@IGcom | #EnglandCricket
— England Cricket (@englandcricket) December 4, 2024
न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड : इंग्लंडचा क्रिकेट संघ सध्या तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. या मालिकेतील दुसरा सामना वेलींग्टन इथं भारतीय वेळेनुसार सकाळी 03:30 वाजेपासून सुरु होणार आहे, या सामन्याच्या दिवसाचा खेळ शक्यतो 11 वाजेपर्यंत संपेल. या मालिकेतील पहिला सामना जिंकत इंग्लंडनं तीन सामन्यांच्या या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता दुसरा सामना जिंकत मालिका खिशात घालण्याचा इंग्लंडचा प्रयत्न असेल तर हा सामना जिंकून यजमान न्युझीलंड संघ मालिकेत बरोबरी करण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळं हा सामना अटीतटीचा होण्याची शक्यता आहे.
TIMING FOR THE DAY & NIGHT TEST MATCH:
— Johns. (@CricCrazyJohns) December 4, 2024
1st session: 9.30 to 11.30 am
2nd session: 12.10 to 2.10 pm
3rd session: 2.30 to 4.30 pm pic.twitter.com/Fip0UIGvME
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत : तर दुसरा सामना म्हणजे सर्वांचं लक्ष लागून असलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये होणार आहे. भारतीय क्रिकेट संघ सध्या पाच सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला आहे. या मालिकेतील दुसरा सामना आज सकाळी 09:30 वाजेपासून ॲडलेड ओव्हलवर खेळवला जाणार आहे. या सामन्याचा दिवसाचा खेळ साधारण सायंकाळी 5 वाजेपर्यंत चालणार आहे. हा सामना यासाठी विशेष आहे, कारण हा सामना दिवस-रात्र कसोटी असणार आहे, जो गुलाबी चेंडूनं खेळवला जाणार आहे. त्यामुळं या सामन्याबाबत अनेकांना उत्सुकता लागून आहे.
18 HOURS NON STOP TEST CRICKET THIS WEEKEND:
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 3, 2024
- New Zealand Vs England from 3.30am.
- Australia Vs India from 9.30am.
- South Africa Vs Sri Lanka from 2pm.
3.30am to 9.30pm of Test cricket. 😍❤️
भारताची मालिकेत 1-0 आघाडी : पाच सामन्यांच्या या कसोटी मालिकेत भारतीय क्रिकेट संघानं पहिला सामना जिंकत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी भारतीय संघाला ही मालिका जिंकावी लागेल. त्यामुळं हा दिवस-रात्र कसोटी सामना जिंकून मालिकेत आघाडी मजबूत करण्याचा भारताचा प्रयत्न असेल, तर दुसरीकडं हा सामना जिंकून कामगार संघ मालिकेत बरोबरी करण्याचा प्रयत्न करेल.
𝗣𝗿𝗲𝗽 𝗠𝗼𝗱𝗲 🔛 #TeamIndia gearing up for the Pink-Ball Test in Adelaide 👌 👌#AUSvIND pic.twitter.com/5K4DlBtOE6
— BCCI (@BCCI) December 4, 2024
दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका : तिसरा सामना हा श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ यांच्यात खेळवला जाणार आहे. श्रीलंकेचा संघ सध्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. हा कसोटी सामना 05 डिसेंबर पासून सुरु झाला. या सामन्याची वेळ दुपारी 2 ते रात्री 09:30 वाजेपर्यंत आहे. पहिल्या सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेनं श्रीलंकेचा एकतर्फी पराभव करत मालिकेत आघाडी घेतलीच शिवाय वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी आपली दावेदारी ही मजबूत केली. आता हा दुसरा सामना जिंकत दक्षिण आफ्रिकेचा संघ श्रीलंकेला क्लीन स्वीप करण्याचा प्रयत्न करेल, तर हा सामना जिंकून श्रीलंका संघ आपली प्रतिष्ठा राखत मालिकेत बरोबरी करण्याचा प्रयत्न करेल.
🟢🟡Match Day
— Proteas Men (@ProteasMenCSA) December 5, 2024
The 2nd Test Match between South Africa & Sri Lanka begins!🇿🇦vs🇱🇰
More points are up for grabs toward the WTC rankings.🏏
📺Watch on SuperSport Channel 201 and https://t.co/I2qRwf9zUG#WozaNawe #BePartOfIt #SAvSL pic.twitter.com/QcsQ1kpw57
18 तासा नॉन-स्टॉप क्रिकेट : एकूणच क्रिकेट प्रेमींसाठी आज पासून पुढचे दोन-तीन दिवस पर्वणी असणार आहे. कारण त्यांना पहाटे 03:30 वाजल्यापासून रात्री 09:30 वाजेपर्यंत नॉनस्टॉप कसोटी क्रिकेटचा आनंद घेता येणार आहे.
हेही वाचा :
- 'साहेबां'विरुद्ध पराभवाचा बदला घेण्यासाठी 'कीवीं'नी सामन्याच्या 24 तासाआधीच केली 'प्लेइंग इलेव्हन'ची घोषणा
- पाकिस्तान @250... जे 'साहेबां'च्या संघालाही जमलं नाही ते पाकिस्ताननं करुन दाखवलं
- 'फायनल'मध्ये स्थान पक्क करण्यासाठी आफ्रिकन संघ उतरणार मैदानात, श्रीलंका पलटवार करणार? निर्णायक सामना 'इथं' पाहा लाईव्ह