मेलबर्न Attendance Record at MCG : मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर सुरु असलेला भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघातील बॉक्सिंग-डे कसोटी सामना अतिशय रोमांचकारी स्थितीत पोहोचला असताना, खेळाच्या पाचव्या दिवशी खेळाडूंनी नव्हे तर स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांनीच 87 वर्षे जुना रेकॉर्ड मोडला आहे. या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियानं भारतीय संघाला चौथ्या डावात विजयासाठी 340 धावांचं लक्ष्य दिलं आहे. बॉक्सिंग-डे कसोटी सामना पाहण्यासाठी ऑस्ट्रेलियातील चाहते आतुरतेनं वाट पाहत होतं आणि ऑस्ट्रेलियात मोठ्या संख्येनं असलेले भारतीय चाहतेही हा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये आले आहेत नवीन रेकॉर्ड तयार करण्यासाठी.
OVER 66,000 AT THE MCG FOR DAY 5. 🤯
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 30, 2024
- The love for Test Cricket in Australia is huge! 👌 pic.twitter.com/MHZCtt7dFj
1937 चा विक्रम मोडला : यावेळी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर बॉक्सिंग-डे कसोटी सामना पाहण्यासाठी एकूण पाच दिवसांच्या खेळासह एकूण प्रेक्षक संख्या 350,700 पेक्षा जास्त होती. आतापर्यंत या मैदानावर इतके प्रेक्षक कधीच आले नव्हते, जेवढे हा सामना पाहण्यासाठी आले आहेत. याआधी 1937 मध्ये या मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्यात एकूण 351104 प्रेक्षक पाच दिवसांच्या खेळात पोहोचले होते. ऑस्ट्रेलियातही आतापर्यंत कोणताही कसोटी सामना पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांची ही सर्वाधिक संख्या आहे. हा सामना पाहण्यासाठी पाचही दिवस आलेल्या चाहत्यांची संख्या पाहिली तर पहिल्या दिवशी 87,242 चाहते, दुसऱ्या दिवशी 85,147 चाहते, तिसऱ्या दिवशी 83,073 आणि चौथ्या दिवशी 43,867 चाहते आले. सामना पाचव्या दिवशी या सामन्यासाठी स्टेडियममध्ये 51,371 हून अधिक चाहते उपस्थित होते.
Good morning and welcome to Day Five of the Boxing Day Test 🙌
— cricket.com.au (@cricketcomau) December 29, 2024
Crowd numbers could be very strong with a riveting day ahead of us. #AUSvIND
भारताच्या सामन्यासाठी चाहते एमसीजीला पोहोचले : जगातील कोणत्याही मैदानावर भारतीय संघ सामना खेळतो तेव्हा स्टेडियममध्ये चाहते मोठ्या संख्येनं दिसतात. असंच काहीसं यापूर्वी MCG ग्राउंडवर देखील पाहायला मिळाले होते, जेव्हा 2022 साली इथं झालेल्या T20 विश्वचषक स्पर्धेत भारत पाकिस्तान विरुद्ध सामना खेळला होता, ज्यात एकूण 90,293 चाहते स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी आले होते. याशिवाय याच स्पर्धेत झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात 82,507 चाहते सामना पाहण्यासाठी MCG मैदानावर आले होते.
हेही वाचा :