डल्लास (अमेरिका) NEP vs SCO ODI Live Streaming : ICC क्रिकेट विश्वचषक लीग दोन 2023-27 चा 44 वा सामना आज म्हणजेच 31 ऑक्टोबर रोजी नेपाळ राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध स्कॉटलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात होणार आहे. उभय संघांमधील हा सामना अमेरिकेतील डल्लास येथील मैदानावर खेळवला जाणार आहे.
All set to go in Dallas 🙌#FollowScotland
— Cricket Scotland (@CricketScotland) October 29, 2024
दोन्ही संघांची स्पर्धेतील कामगिरी कशी : नेपाळनं या स्पर्धेत आतापर्यंत 11 सामने खेळले आहेत. ज्यात फक्त 2 जिंकले, 8 हरले आणि एक सामना अनिर्णित राहिला. परिणामी नेपाळ संघ 5 गुणांसह गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे. दुसरीकडं, स्कॉटलंडनं आतापर्यंत 10 सामने खेळले आहेत. ज्यात 6 जिंकले आहेत आणि 4 हरले आहेत तर एक सामना अनिर्णित राहिला आहे आणि संघ 13 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. अशा स्थितीत दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो.
It's victory for Scotland in Dallas! 😍
— Cricket Scotland (@CricketScotland) October 31, 2024
Four wickets for Jack Jarvis help secure a 71 run victory 👏#FollowScotland 🏴 pic.twitter.com/VcK8icBGVN
दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : नेपाळ आणि स्कॉटलंडचे संघ वनडेत आतापर्यंत सात वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यात नेपाळनं चार सामने जिंकले आहेत. तर स्कॉटलंडनं तीन सामने जिंकले आहेत. हे ज्ञात आहे की जेव्हा जेव्हा दोन्ही संघ एकमेकांसमोर येतात तेव्हा स्पर्धा बरोबरीची असते. याशिवाय गेल्या पाच सामन्यांबद्दल बोलायचं झालं तर स्कॉटलंडनं त्यापैकी 2 सामने जिंकले आहेत. तर नेपाळनं तीन सामने जिंकले आहेत. नुकताच 29 ऑक्टोबर रोजी दोन्ही संघांमध्ये एकदिवसीय सामना खेळवण्यात आला. ज्यात नेपाळनं स्कॉटलंडचा 5 विकेट्सनं पराभव केला.
नेपाळ विरुद्ध स्कॉटलंड ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक लीग 2 मधील 44वा सामना कधी खेळला जाईल?
नेपाळ विरुद्ध स्कॉटलंड ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक लीग 2 चा 44 वा सामना आज सोमवार, 4 नोव्हेंबर रोजी अमेरिकेतील डल्लास इथं भारतीय वेळेनुसार रात्री 9:00 वाजता खेळवला जाईल.
A hard-fought effort from Team Nepal,
— CAN (@CricketNep) November 2, 2024
USA won the game by 37 runs.#NepalCricket | #NEPvUSA | #CWCL2 pic.twitter.com/4NbdwbD9W7
नेपाळ विरुद्ध स्कॉटलंड ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक लीग 2 चा 44वा सामना कुठं पहायचा?
नेपाळ विरुद्ध स्कॉटलंड ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक लीग 2 चा 44व्या सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग फॅनकोड ॲप आणि वेबसाइटवर भारतात उपलब्ध असेल. मात्र, कोणत्याही टीव्ही चॅनलवर या सामन्यांचं थेट प्रक्षेपण दिसणार नाही.
सामन्यासाठी दोन्ही संघ :
नेपाळ संघ : आसिफ शेख (यष्टीरक्षक), रोहित पौडेल (कर्णधार), अनिल शाह, कुशल भुर्तेल, कुशल मल्ला, आरिफ शेख, दीपेंद्र सिंग ऐरे, गुलसन झा, सोमपाल कामी, संदीप लामिछाने, करण केसी, पवन सराफ, भीम शार्के, ललित राजबंशी, सूर्या तमंग, देव खनाल, अर्जुन सौद, रिजन ढकल
स्कॉटलंड संघ : रिची बेरिंग्टन (कर्णधार), मॅथ्यू क्रॉस (विकेटकीपर), चार्ली टीयर, अँड्र्यू होप, ब्रँडन मॅकमुलेन, मायकेल जोन्स, मायकेल लीस्क, मार्क वॉट, जॅक जार्विस, ब्रॅड व्हील, ब्रॅडली करी, सफियान शरीफ, मायकेल इंग्लिश, गेविन मेन , क्रिस्टोफर सोल, जॉर्ज मुनसे, हमजा ताहिर, ख्रिस ग्रीव्हज, स्कॉट करी, जॅस्पर डेव्हिडसन, चार्ली कॅसल
हेही वाचा :