ETV Bharat / sports

मायकल वॉनसमोर मुंबईच्या टॅक्सी चालकाकडून 'फिक्सिंग'चा सिक्सर, पाहा व्हिडिओ - Michael Vaughan

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 27, 2024, 11:36 AM IST

Updated : Jun 27, 2024, 2:46 PM IST

भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य फेरीत कोण जिंकणार? असा प्रश्न मायकेल वॉननं मुंबईतील एका टॅक्सी चालकाला विचारला. त्याच्या प्रश्नावर चालकाचं उत्तर ऐकून मायकेल वॉनची बोलतीच बंद झाली.

T20 World Cup 2024
T20 World Cup 2024 (ETV Bharat)

India vs Engaland T20 World Cup 2024 : टी-20 क्रिकेट विश्वचषक 2024 आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या स्पर्धेतील दुसरा सेमीफायनल सामना आज भारत आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ विजयाच्या रथावर स्वार आहे. भारतानं साखळी टप्प्यातील आणि सुपर-8 मध्ये प्रत्येकी तीन सामने जिंकून अव्वल स्थानावर राहिले. त्याचवेळी गतविजेत्या इंग्लंडनं साखळी फेरीतील दोन सामने आणि सुपर-8 मधील एक सामना गमावून सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. भारत आणि इंग्लंड यांच्यातील सेमीफायनल कोण जिंकणार? असा प्रश्न मायकेल वॉननं मुंबईतील एका टॅक्सी चालकाला विचारला. त्याच्या प्रश्नावर चालकानं जे उत्तर दिलं ते ऐकून वॉन अवाक् झाला.

वॉनने बुधवारी एक्स मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं की, "मुंबईत टॅक्सी चालकाबरोबर विश्वचषक सेमीफायनलचा प्रीव्ह्यू. व्हिडिओमध्ये, वॉन चालकाला विचारतो की सेमीफायनल कोण जिंकेल? चालक म्हणतो भारत जिंकणार आहे. यावर मायकेल वॉनने विचारलं की तुम्हाला असं का वाटतं? चालक म्हणाला, "कारण भारतीय संघ टॉपवर आहे आणि जबरदस्त फॉर्ममध्ये आहे." मायकेल वॉन यावर म्हणाला, ''पण इंग्लंड हा एक मजबूत संघ आहे, भारत त्यांना कसा हरवू शकेल? हे ऐकून चालक म्हणाला, "हो, इंग्लंड चांगला संघ आहे, पण ऑस्ट्रेलिया इतका मजबूत नाहीय. भारतच जिंकेल, असं म्हणत टॅक्सी चालकानं मायकल वॉनची बोलतीच बंद केली.

वॉन पुढे म्हणाला, मग वनडे विश्वचषकात काय झालं होतं, भारत ऑस्ट्रेलिया विरूध्द का हरला होता. यावर तो टॅक्सी चालक म्हणतो, ''मागच्या विश्वचषकात फिक्सिंग झाली होती. त्यामुळंच ते जिंकले. ऑस्ट्रेलिया मजबूत संघ नाहीय. जर त्यांचा संघ मजबूत असता तर ते या विश्वचषकात अफगाणिस्तान सोबत हरले नसते.

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन हा सोशल मीडियातील वक्तव्यांमुळं नेहमीच चर्चेत असतो. हा दिग्गज क्रिकेटर भारतात याआधी न्हावीच्या दुकानात दाढी करताना तर कधी मुंबईत गल्ली क्रिकेट खेळताना दिसला होता. आता तो पुन्हा एकदा या व्हिडिओमुळे चर्चेत आलाय​.

हेही वाचा अफगाणिस्तानला हरवून दक्षिण आफ्रिकेने रचला इतिहास; पहिल्यांदाच अंतिम फेरीत मारली धडक - T20 World Cup 2024

  1. भारत आणि इंग्लड यांच्यात आज चुरशीची लढत; कोणाचं पारडं जड? पाहा हेड-टू-हेट रेकॉर्ड - T20 World Cup 2024
  2. भारत-इंग्लंड उपांत्य फेरीचा सामना पावसात वाहून गेल्यास भारतीय संघ जाणार थेट अंतिम फेरीत, काय आहे नियम? - T20 World Cup 2024

Last Updated : Jun 27, 2024, 2:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.