ETV Bharat / sports

महेंद्रसिंग धोनीनं सुरु केली आयपीएल 2025 ची तयारी; कसं ठेवतोय स्वत:ला तंदुरुस्त, पाहा व्हिडिओ - MS Dhoni - MS DHONI

MS Dhoni IPL 2025 : सोशल मीडियावर 6 सेकंदाचा व्हिडिओ वेगानं व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये महेंद्रसिंग धोनी बॅडमिंटन खेळताना दिसत आहे.

MS Dhoni IPL 2025
महेंद्रसिंग धोनीनं सुरु केली आयपीएल 2025 ची तयारी (Screenshot from Social media and Getty Images)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Aug 24, 2024, 5:27 PM IST

नवी दिल्ली MS Dhoni IPL 2025 : चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं फार पूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. तो आता फक्त इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्येच खेळताना दिसतो. एमएस धोनीनं आधीच आयपीएल 2025 ची तयारी सुरु केली आहे. सीएसकेसाठी 5 विजेतेपद पटकावणारा माही आयपीएलच्या 18व्या हंगामात तंदुरुस्त राहण्यासाठी खूप मेहनत करत आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एमएस धोनी बॅडमिंटन खेळताना दिसत आहे.

गेल्या मोसमात विशेष कामगिरी नाही : धोनीचा 6 सेकंदाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये महेंद्रसिंग धोनी बॅडमिंटन खेळताना दिसत आहे. यादरम्यान तो उत्कृष्ट स्मॅश मारतनाही दिसत आहे. महेंद्रसिंग धोनीच्या गुडघ्यावर आयपीएल 2023 नंतर शस्त्रक्रिया झाली होती. आयपीएल 2024 मध्ये त्याची कामगिरी काही खास नव्हती. 17व्या सत्रात धोनी खूपच खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसला.

रुतुराज यांच्याकडं दिलं होत कर्णधारपद : आयपीएल 2024 पूर्वी महेंद्रसिंग धोनीनं चेन्नई सुपर किंग्जचं कर्णधारपद सोडलं होतं. अशा परिस्थितीत रुतुराज गायकवाडला या संघाचा नवा कर्णधार बनवण्यात आलं होतं. एमएस धोनीच्या आयपीएल 2024 मधील कामगिरीबद्दल बोलायचं तर त्यानं 14 सामन्यात 53.67 च्या सरासरीनं आणि 220.55 च्या स्ट्राइक रेटनं 161 धावा केल्या. यात त्यानं एकही अर्धशतक झळकावलं नाही. 17व्या मोसमातील त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 37 होती. सीएसकेनं आयपीएल 2024 मध्ये 14 पैकी 7 सामने जिंकले. परिणामी हा संघ गुणतालिकेत संघ पाचव्या स्थानावर होता.

हेही वाचा :

  1. भारतीय संघानं 53 वर्षांपूर्वी मोडला होता 'साहेबां'चा अभिमान; त्यांच्याच मैदानावर मुंबईकर कर्णधाराच्या नेतृत्त्वाखाली रचला होता इतिहास - First Test Match Win In England
  2. अरेच्चा... सामन्याचं तिकीट फक्त 15 रुपये, तरी मैदान रिकामं; अखेर पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं उचललं मोठं पाऊल - PAK vs BAN Test
  3. एक, दोन नव्हे तर टी20 सामन्यात झाल्या तीन सुपर ओव्हर; क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं, कुठं झाला सामना? - 3 Super Overs

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.