बेंगळुरु 3 Super Overs : भारतात देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या अनेक स्पर्धा खेळल्या जात आहेत. काही राज्यांमध्ये टी 20 लीग देखील आयोजित केल्या जात आहेत. ज्यात महाराजा टी 20 ट्रॉफीचा समावेश आहे. या लीगमध्ये एक अनोखी गोष्ट पाहायला मिळाली. या सामन्यात 1 किंवा 2 नव्हे तर एकूण 3 सुपर ओव्हर खेळल्या गेल्या, जेव्हा सामन्याचा निकाल लागला. हा सामना बेंगळुरु ब्लास्टर्स आणि हुबळी टायगर्स यांच्यात खेळला गेला. हुबळी टायगर्सची कमान मनीष पांडे याच्या हाती आहे. तर बेंगळुरु ब्लास्टर्स संघ मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखाली खेळत आहे.
𝐂𝐎𝐌𝐏𝐋𝐄𝐓𝐄 𝐌𝐀𝐃𝐍𝐄𝐒𝐒! 😱
— Maharaja Trophy T20 (@maharaja_t20) August 23, 2024
A Triple Super over for the first time in the history of cricket! 🤯#ಇಲ್ಲಿಗೆದ್ದವರೇರಾಜ #MaharajaTrophy #Season3@StarSportsKan pic.twitter.com/s8dH4Rigcz
एकाच सामन्यात 3 सुपर ओव्हर : दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात हुबळी टायगर्सनं प्रथम फलंदाजी केली. हुबळी टायगर्स संघ 20 षटकांत 164 धावा करत सर्वबाद झाला. यानंतर बेंगळुरु ब्लास्टर्सनं फलंदाजी केली, पण बेंगळुरु ब्लास्टर्सनं 20 षटकांत 164 धावा करुन सर्वबाद केलं. अशा परिस्थितीत दोन्ही संघांमध्ये सुपर ओव्हर खेळवण्यात आली, जेणेकरुन सामन्याचा निकाल लावता येईल. सुपर ओव्हरमध्ये बेंगळुरु ब्लास्टर्सनं प्रथम फलंदाजी करताना 1 गडी गमावून 10 धावा केल्या. अशा स्थितीत हुबळी टायगर्सला विजयासाठी 11 धावा करायच्या होत्या, पण हुबळी टायगर्स संघाला 10 धावाच करता आल्या.
तिसऱ्या सुपर ओव्हरमध्ये जिंकला सामना : पहिला सुपर ओव्हर टाय झाल्यानंतर हुबळी टायगर्सनं प्रथम फलंदाजी करत दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये 8 धावा केल्या. मात्र 9 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना बेंगळुरु ब्लास्टर्स संघही 1 गडी गमावून केवळ 8 धावा करु शकला. अशा स्थितीत हा सामना तिसऱ्या सुपर ओव्हरपर्यंत पोहोचला. तर तिसऱ्या सुपर ओव्हरमध्ये बेंगळुरु ब्लास्टर्सनं प्रथम फलंदाजी करताना 1 गडी गमावून 12 धावा केल्या. यावेळी हुबळी टायगर्स संघानं 13 धावा केल्या आणि सुपर ओव्हरमध्ये बेंगळुरु ब्लास्टर्सचा पराभव करुन सामना जिंकला.
सुपर ओव्हरचा नियम काय : 2008 मध्ये टी 20 क्रिकेटमध्ये सुपर ओव्हर सुरु करण्यात आली होती. दोन्ही संघांच्या धावा समान असताना सुपर ओव्हरचा वापर केला जातो. ज्यामध्ये दोन्ही संघांमध्ये 1-1 षटकांचा सामना खेळला जातो. जर सुपर ओव्हर देखील बरोबरीत असेल, तर सुपर ओव्हर पुन्हा एकदा खेळला जातो आणि निकाल घोषित होईपर्यंत असंच चालू राहतं. मात्र, सुपर ओव्हरमध्ये काढलेल्या धावा आणि विकेट या रेकॉर्डमध्ये जोडल्या जात नाहीत.
हेही वाचा :