ETV Bharat / sports

33 वर्षीय रुटचं 33वं कसोटी शतक; मोडले अनेक विक्रम, सचिनचा विक्रमही धोक्यात - Joe Root - JOE ROOT

Joe Root 33rd test hundred : इंग्लंडचा स्टार कसोटी फलंदाज जो रुटने लॉर्ड्सवर आपलं 33 वं कसोटी शतक झळकावून अनेक विक्रम मोडीत काढत इतिहास रचला आहे. आता महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम रुटच्या रडारवर आहे, जो तो लवकरच मोडू शकतो.

Joe Root
जो रुट (AFP Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Aug 30, 2024, 9:46 AM IST

लंडन Joe Root 33rd test hundred : इंग्लंडचा उजव्या हाताचा स्टार फलंदाज जो रुटनं गुरुवारी लॉर्ड्सवर श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी शानदार शतक झळकावून महत्त्वपूर्ण कामगिरी केली. या शतकासह रुटनं इंग्लंडकडून सर्वाधिक 33 कसोटी शतकं झळकावणाऱ्या इंग्लंडचा महान खेळाडू सर ॲलिस्टर कुकच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

रुटनं कूकच्या विक्रमाशी केली बरोबरी : प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर श्रीलंकेनं लॉर्ड्सवर चांगली सुरुवात केली, परंतु जो रूटने विक्रमी 33 वं कसोटी शतक झळकावून त्यांचे मनसुबे हाणून पाडले. जो रुटनं 162 चेंडूत 13 चौकारांच्या मदतीनं आपलं 33 वं कसोटी शतक पूर्ण केलं. इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रुट 33वं शतक झळकावल्यानंतर कसोटीत सर्वाधिक शतक झळकावणारा संयुक्तपणे 10वा खेळाडू बनला आहे. रुटचं हे यश विशेष आहे कारण त्यानं हा विक्रम आपल्या 145 व्या सामन्यात केला होता, तर कुकनं यासाठी 161 सामने खेळले.

कसोटीत सर्वाधिक धावा करणारा 7वा फलंदाज : रुटनं अलीकडेच त्याच्या 12 हजार कसोटी धावा पूर्ण केल्या होत्या. यासह तो आतापर्यंतचा सातवा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. रुटनं 145 कसोटी सामन्यांच्या 265 डावांमध्ये 50.71 च्या उत्कृष्ट सरासरीनं एकूण 12 हजार 274 धावा केल्या आहेत. यात त्यानं 5 द्विशतकं, 33 शतकं आणि 64 अर्धशतकं केली आहेत.

सचिन तेंडुलकरचा विक्रम धोक्यात : इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रुट हा महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक 15 हजार 921 धावांचा कसोटी विक्रम मोडू शकतो. रुटनं आतापर्यंत 12 हजार 274 कसोटी धावा केल्या आहेत. तेंडुलकरचा विक्रम मोडण्यापासून तो फक्त 3647 धावा दूर आहे आणि त्याच्याकडे अजून बरंच कसोटी क्रिकेट शिल्लक आहे. 33 वर्षीय रुटनं भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरनं वयाच्या 34 वर्षापूर्वी केलेल्या 35 कसोटी शतकांची जवळपास बरोबरी केली आहे. ज्या फॉर्ममध्ये तो खेळत आहे. त्याच्याकडे पाहता तो लवकरच तेंडुलकरचा 51 कसोटी शतकांचा विक्रम मोडेल असं दिसतं. 1989-2013 पर्यंत 200 कसोटी सामन्यांमध्ये 51 शतकं झळकावणारा सचिन सर्वाधिक कसोटी शतकांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक शतकं :

  • सचिन तेंडुलकर : 51
  • जॅक कॅलिस : 45
  • रिकी पाँटिंग : 41
  • कुमार संगकारा : 38
  • राहुल द्रविड : 36
  • सुनील गावस्कर : 34
  • महेला जयवर्धने : 34
  • ब्रायन लारा : 34
  • युनिस खान : 34
  • ॲलिस्टर कूक : 33
  • जो रुट : 33*

हेही वाचा :

  1. एक-दोन नव्हे तर 13 वेळा डोक्याला लागला चेंडू; 26 वर्षाय खेळाडूला घ्यायला लावली सक्तीची निवृत्ती? - Will Pucovski
  2. इंग्लंड-श्रीलंका दुसरा कसोटी सामना कुठे आणि कसा बघायचा 'फ्री'? वाचा एका क्लिकवर - ENG vs SL 2nd Test

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.