रांची High Court Issues Notice To MS Dhoni : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 2025 तयारीत व्यस्त आहे. दरम्यान, झारखंड उच्च न्यायालयानं मंगळवारी महेंद्रसिंग धोनीला त्याचे माजी भागीदार मिहिर दिवाकर आणि सौम्या दास यांनी दाखल केलेल्या प्रकरणात नोटीस बजावली. न्यायालयानं भारतीय क्रिकेट संघाच्या माजी कर्णधाराला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
🧵 Jharkhand High Court Issues Notice to MS Dhoni Over Business Dispute 🚨
— Navya Goyal (@04Navya) November 13, 2024
1/ The Jharkhand High Court has issued a notice to cricket legend Mahendra Singh Dhoni in a legal case filed by his former business partners, Mihir Diwakar and Soumya Das. #MSDhoni #LegalNews
2/ Diwakar… pic.twitter.com/jgbtmUpdb6
काय आहे प्रकरण : दिवाकर आणि दास हे 'अर्का स्पोर्ट्स अँड मॅनेजमेंट लिमिटेड'चे संचालक आहेत आणि धोनीच्या नावानं क्रिकेट अकादमी उघडण्यासाठी त्यांनी त्याच्याशी करार केला होता. धोनीनं 5 जानेवारीला रांचीमध्ये दोघांविरुद्ध फसवणुकीचा आरोप करत फौजदारी तक्रार दाखल केली होती. तक्रार अर्जात त्यांनी आरोप केला आहे की 2021 मध्ये त्यांचे अधिकार रद्द केल्यानंतरही या दोघांनी त्यांचं नाव वापरणं सुरु ठेवलं. 15 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप या क्रिकेटपटूनं केला आहे. दिवाकर आणि दास यांनी रांची येथील न्यायदंडाधिकारी न्यायालयानं त्यांच्याविरुद्ध घेतलेल्या दखलला आव्हान देत उच्च न्यायालयात धाव घेतली.
धोनी कोर्टात हजर होणार? : यानंतर हायकोर्टानं धोनीला याप्रकरणी हजर राहून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. आता या प्रकरणी धोनी किती दिवसांत कोर्टात हजर होईल हे पाहायचं आहे. दुसरीकडे, आयपीएलचा लिलाव या महिन्यात 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी जेद्दाहमध्ये होणार आहे. धोनी यावेळी अनकॅप्ड म्हणून फ्रँचायझीमध्ये सामील झाला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली, 5 वेळा चॅम्पियन झालेल्या चेन्नईनं त्याला 4 कोटी रुपयांमध्ये संघात कायम ठेवलं आहे.
हेही वाचा :
- दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार सूर्याचं मोठं नुकसान
- भारत-दक्षिण आफ्रिका तिसरा T20 सामना आज, कोण घेणार मालिकेत विजयी आघाडी? 'इथं' दिसेल लाईव्ह सामना]
- विश्वविजेत्या 'कांगारुं'ची घरच्या मैदानावर सर्वात मोठी नाचक्की; 8187 दिवसांनंतर वनडे क्रिकेटमध्ये 'असं' घडलं
- 6,6,6,6,6,6,6...एका डावात 12 षटकार ठोकत केला विश्वविक्रम; महिला T20 क्रिकेटच्या इतिहासात 'असं' घडलंच नव्हतं