नवी दिल्ली Jacintha Kalyan : बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी देशातील पहिली महिला पिच क्युरेटर जॅसिंथा कल्याणचं कौतुक केलं आहे. जय शाह यांनी त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट टाकून जयसिथा कल्याण यांचं कौतुक केलं आहे. जॅसिंथा ही देशातील पहिली महिला खेळपट्टी क्युरेटर आहेत. सध्या त्यांच्याकडं महिला प्रीमियर लीगमधील खेळपट्टी तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
पिच क्युरेटरची भूमिका पहिल्यांदाच महिला करत आहे. बीसीसीआय सचिवांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, भारतीय क्रिकेटसाठी ऐतिहासिक प्रगती करताना, जेसिंथा कल्याण या आपल्या देशातील पहिली महिला क्रिकेट खेळपट्टी क्युरेटर म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. बंगळुरूमध्ये सुरू असलेल्या महिला प्रीमियर लीगमध्ये खेळपट्टीच्या तयारीची जबाबदारी स्वीकारताना, जॅसिंथा या दृढनिश्चयाचं प्रतीक आहेत. जॅसिंथा यांची ही अभूतपूर्व कामगिरी त्यांची खेळाप्रती असलेली कटिबद्धतेचा पुरावा आहे.
-
In a historic stride for Indian cricket, Jacintha Kalyan has become the trailblazing pioneer as the first female cricket pitch curator in our nation. 🙌 Taking the helm of pitch preparation for the inaugural leg of the Women's Premier League in Bengaluru, Jacintha embodies the… pic.twitter.com/AVqLondy77
— Jay Shah (@JayShah) February 27, 2024
पडद्यामागील अथक परिश्रम : जय शाह यांनी त्यांच्या पोस्टमध्ये पुढं म्हटलं आहे की "महिला प्रीमियर लीगच्या खेळपट्टीवर देखरेख करण्याची जेसिंथा यांची भूमिका खेळाला कलाटणी देणारी आहे. तसेच भारतातील क्रिकेटच्या विकसित होत असलेल्या लँडस्केपवर प्रकाश टाकणारी आहे. महिला प्रीमियर लीगमध्ये केवळ मैदानावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचेचं नव्हे, तर जेसिंथा कल्याणसारख्या असामान्य व्यक्तींचंही कौतुक करणं अत्यावश्यक आहे. त्यांचे पडद्यामागील अथक परिश्रम खेळाच्या यशात मोठं योगदान देतात!” एका शेतकऱ्याची असलेली मुलगी ही कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशनशी (KSCA) 30 वर्षांपासून संबंधित आहे. त्यांनी KSCA मध्ये रिसेप्शनिस्ट म्हणूनही काम केलं आहे.
पहिली महिला पिच क्युरेटर : भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील पहिली महिला पिच क्युरेटर बनल्याबद्दल बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी मंगळवारी जेसिंथा कल्याणचं कौतुक केलं. या वर्षीच्या महिला प्रीमियर लीग (WPL) च्या खेळपट्टीच्या तयारीवर जेसिंथा देखरेख करत आहेत. जेसिंथा यांचा जन्म कर्नाटकातील बंगळुरूजवळील हरोबेले येथे झाला होता. याआधी त्या कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशनमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होत्या . गेल्या तीस वर्षांत त्यांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या यशस्वीपणं पार पाडल्या आहेत.
हे वाचलंत का :