अबुधाबी IRE Beat SA in 2nd T20I : आयर्लंड क्रिकेट संघानं इतिहास रचला आहे. अबुधाबी इथं खेळल्या गेलेल्या दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात त्यांनी बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. आयर्लंडनं T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. यासह दुसरी T20 मालिका 1-1 अशी बरोबरीत संपली. पहिला T20 सामना 8 गडी राखून जिंकणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा दुसऱ्या T20 सामन्यात आयर्लंडकडून 10 धावांनी पराभव झाला. या विजयात आयर्लंडकडून खेळणाऱ्या दोन भावांची भूमिका निर्णायक ठरली. रग्बी खेळून क्रिकेटमध्ये आलेल्या मोठ्या भावानं फलंदाजीत शतक झळकावलं. त्यानंतर धाकट्या भावानं घातक गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला.
History for Ireland as they claim their first-ever men's T20I victory over South Africa 🙌#IREvSA 📝 https://t.co/53ZqjrKqjt pic.twitter.com/Apc2D8JI4w
— ICC (@ICC) September 29, 2024
रग्बी खेळणाऱ्या रॉस अडीयरनं झळकावलं पहिलं T20 शतक : मालिकेतील दुसऱ्या आणि शेवटच्या T20 मध्ये दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून आयर्लंडला प्रथम फलंदाजी दिली. जणू ही संधी आयर्लंडनं दोन्ही हातांनी स्विकारली. सलामीवीर रॉस अडीयर आणि पॉल स्टर्लिंग यांनी सलामीच्या विकेटसाठी 137 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी 52 धावा करुन बाद झालेल्या स्टर्लिंगच्या विकेटनं तुटली. पॉल स्टर्लिंग बाद झाला पण रॉस अडीयर अजूनही खेळपट्टीवर होता आणि मोकळेपणानं त्याचे शॉट्स खेळत होता. 30 वर्षीय रॉस अडीयरने रग्बीपासून आपल्या क्रीडा कारकीर्दीची सुरुवात केली. तो पूर्वी रग्बी खेळत होता. पण, त्याला काही दुखापती झाल्यामुळं तो खेळ सोडून क्रिकेटकडं वळावं लागलं. 30 वर्षीय रॉस अडीयरनं आपली वेगवान फलंदाजी दाखवली आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक झळकावल तब्बल. 172.41 च्या दमदार स्ट्राईक रेटनं फलंदाजी करताना त्यानं 58 चेंडूत 9 षटकार आणि 5 चौकारांसह 100 धावा केल्या. रॉस अडीयरच्या T20I कारकिर्दीतील हे पहिलं शतक होतं, ज्याच्या जोरावर आयर्लंड संघानं 20 षटकांत 6 विकेट गमावत 195 धावा केल्या.
" 99. here we go."
— Cricket Ireland (@cricketireland) September 29, 2024
and he went. and not only @GRAdair11, but the whole side lifted itself to this historic win. Great work, lads!
Get in, Ireland 🎉#BackingGreen pic.twitter.com/uOs0YPsmbQ
मार्क अडीयर सर्वात यशस्वी गोलंदाज : दक्षिण आफ्रिकेसमोर 196 धावांचं लक्ष्य होतं, ज्याचा पाठलाग करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या दोन विकेट्ससाठी अर्धशतकी भागीदारी केली. परंतु, त्यानंतर आयरिश गोलंदाज मार्क अडीयरनं गोलंदाजीत कहर केला. त्याचा परिणाम असा झाला की तो केवळ आपल्या संघाचा सर्वात यशस्वी गोलंदाज बनला नाही तर दक्षिण आफ्रिकेला विजयाचं लक्ष्य गाठण्यापासून रोखणाराही तो ठरला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 20 षटकांत 9 विकेट्सवर केवळ 185 धावा करता आल्या आणि दुसरा T20 सामना 10 धावांनी गमावला. दक्षिण आफ्रिकेच्या पडलेल्या 9 विकेटपैकी 4 मार्क अडीयरच्या नावावर आहेत, ज्या त्यानं 4 षटकांत 31 धावा देत घेतल्या.
A memorable night at the Zayed Cricket Stadium. 🙌
— Cricket Ireland (@cricketireland) September 29, 2024
Stunning performances from the Adair brothers help us level the T20I series in dramatic fashion! 👊
▪️ Ireland 195-6 (20 overs)
▪️ South Africa 185-9 (20 overs)#IREvSA #BackingGreen pic.twitter.com/q60YX0wgBL
दोन भावांनी मिळवून दिला आयर्लंडला विजय : आयर्लंडनं प्रथमच दक्षिण आफ्रिकेनं T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पराभव केला आहे. यासह, T20 मध्ये सर्वाधिक 28 विरोधी संघांना पराभूत करणारा संघ बनला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आयर्लंडच्या विजयात अडीयर बंधूंनी महत्त्वाची भूमिका बजावली. रॉस अडीयर आणि मार्क अडीयर हे भाऊ आहेत. रॉस मोठा आहे तर मार्क लहान आहे. रॉस अडीयरला सामनावीर आणि मालिका सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले, तर मार्क ॲडीयरला मालिकेतील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून गौरवण्यात आलं.
HISTORY IN ABU DHABI! 🇦🇪
— Cricket Ireland (@cricketireland) September 29, 2024
We've beaten South Africa for the first time in T20Is!!!#IREvSA #BackingGreen pic.twitter.com/i62XqeKpPe
हेही वाचा :