नवी दिल्ली Jonty Rhodes LSG : दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्रिकेटपटू जॉन्टी रोड्स गेल्या काही दिवसांपासून भारतात होता. रोड्सनं आपल्या भारत दौऱ्यात दिल्ली ते मुंबई प्रवासाचा अनुभव शेअर केला आहे. रोड्सनं एका पोस्टद्वारे सांगितलं की, मुंबई ते दिल्ली प्रवास करताना त्यांना कशाप्रकारे अडचणींचा सामना करावा लागला. प्रथम त्याच्या विमानाला मुंबई विमानतळावर उशीर झाला, त्यानंतर विमानात बसल्यानंतर रोड्सला त्याची सीट तुटल्याचं समजलं. रोड्सची गणना क्रिकेट विश्वातील महान क्षेत्ररक्षकांमध्ये केली जाते. 1992 च्या विश्वचषकात रोड्सनं पाकिस्तानी फलंदाज इंझमाम उल हकला ज्या प्रकारे धावबाद केलं ते आजही चाहत्यांच्या मनात आहे.
My flying bad luck continues - not only is my @airindia flight from Mumbai to Delhi over 1.5hrs delayed, but now I just signed a waiver as I board stating I accept that my seat is broken 😠 #whyme 😂 Not looking forward to the next 36hrs with a return to Mumbai from Delhi and…
— Jonty Rhodes (@JontyRhodes8) August 30, 2024
रोड्सनं काय केली पोस्ट : रोड्सनं त्याच्या सोशल मीडियावर लिहिलं की, 'माझं दुर्दैव विमान प्रवासादरम्यान कायम आहे. एअर इंडियाच्या मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाला दीड तासांपेक्षा जास्त उशीर झाला. पण आता मी विमानात चढल्याबरोबर सूट फॉर्मवर स्वाक्षरी केली आणि मी मान्य करतो की माझी सीट तुटली आहे. मी पुढील 36 तासांची वाट पाहत नाही कारण मला दिल्लीहून मुंबईला परतायचं आहे आणि नंतर केपटाऊनला जाणारी फ्लाइट पकडायची आहे.'
Dear Sir, we regret to hear about your experience. Rest assured, we will thoroughly investigate your concern and ensure your feedback is shared internally.
— Air India (@airindia) August 30, 2024
काय म्हणालं एअरलाइन : जॉन्टी रोड्सच्या पोस्टनंतर एअरलाइननं माफी मागितली आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचं आश्वासन दिलं. एअर इंडियानं म्हटलं की, 'तुमचा अनुभव ऐकून आम्हाला वाईट वाटलं. निश्चिंत राहा, आम्ही तुमच्या समस्यांची सखोल चौकशी करु आणि तुमचा अभिप्राय आंतरिकरित्या शेअर केला जाईल याची खात्री करु.'
रोड्सची आंतरराष्ट्रीय कारकिर्द : जॉन्टी रोड्सनं दक्षिण आफ्रिकेकडून 52 कसोटी आणि 245 एकदिवसीय सामने खेळले. रोड्सनं कसोटी सामन्यात 35.66 च्या सरासरीनं 2532 धावा केल्या, ज्यात 3 शतकं आणि 17 अर्धशतकांचा समावेश आहे. तर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोड्सच्या नावावर 35.11 च्या सरासरीनं 5935 धावा आहेत. रोड्सनं एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात 2 शतकं आणि 33 अर्धशतकं केली आहेत. रोड्स सध्या आयपीएल फ्रँचायझी लखनऊ सुपर जायंट्स (एलएसजी) चे क्षेत्ररक्षण प्रशिक्षकही आहेत.
हेही वाचा :