ETV Bharat / sports

MI पासून CSK पर्यंत, प्रत्येक संघ कोणत्या 5 खेळाडूंना करु शकतो रिटेन, वाचा सर्व यादी - Players Retention for IPL 2025 - PLAYERS RETENTION FOR IPL 2025

MI CSK Players Retention for IPL 2025 : BCCI कडून कायम IPL 2025 साठी खेळाडूंना कायम ठेवण्याचं धोरण लवकरच जाहीर केलं जाईल. यावेळी BCCI सर्व फ्रँचायझींना आयपीएल 2025 च्या लिलावापूर्वी 5-5 खेळाडूंना कायम ठेवण्याची परवानगी देऊ शकते. यानंतर मेगा लिलाव होणार आहे.

Players Retention for IPL 2025
Players Retention for IPL 2025 (ANI Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Sep 26, 2024, 3:03 PM IST

मुंबई MI CSK Players Retention for IPL 2025 : IPL 2025 पूर्वी एक मेगा लिलाव होणार आहे, जो या वर्षाच्या अखेरीस आयोजित केला जाऊ शकतो. BCCI कडून खेळाडूंना कायम ठेवण्याचं धोरण लवकरच जाहीर केलं जाऊ शकतं. दरम्यान, BCCI आयपीएल फ्रँचायझीला 5 खेळाडू कायम ठेवण्याची परवानगी देऊ शकते, अशी बातमी समोर येत आहे. ज्यात 3 भारतीय आणि 2 परदेशी खेळाडूंचा समावेश असेल. गेल्या वेळी सर्व संघांनी प्रत्येकी केवळ 4 खेळाडूंना कायम ठेवलं होतं. मात्र यावेळी राईट टू मॅच नियम काढून टाकला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत, लिलावापूर्वी सर्व आयपीएल फ्रँचायझी कोणते 5 खेळाडू कायम ठेवू शकतात त्यांची संभाव्य यादी.

चेन्नई सुपर किंग्ज

एमएस धोनीचं नाव चेन्नई सुपर किंग्जच्या कायम ठेवण्याच्या यादीत पुन्हा एकदा येऊ शकतं. अशा परिस्थितीत तो आणखी एका मोसमात खेळताना दिसणार आहे. त्याचबरोबर संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाडलाही कायम ठेवण्यात येणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. याशिवाय रवींद्र जडेजा तिसरा भारतीय म्हणून संघाचा भाग बनू शकतो. याशिवाय परदेशी खेळाडू म्हणून रचिन रवींद्र आणि मथिशा पाथिराना हे खेळाडू कायम ठेवण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.

गुजरात टायटन्स

गुजरात टायटन्स संघासाठी 5 खेळाडूंची निवड करणं खूप कठीण जाणार आहे. मात्र, संघाचा कर्णधार शुभमन गिलला कायम ठेवण्यात येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. त्याच्याशिवाय साई सुदर्शन आणि मोहम्मद शमी हे संघाची पहिली पसंती असू शकतात. त्याचबरोबर परदेशी खेळाडूंबद्दल बोलायचं झालं तर राशिद खानचं नाव आघाडीवर असू शकते आणि संघ पुन्हा एकदा डेव्हिड मिलरवर विश्वास व्यक्त करु शकतो.

कोलकाता नाईट रायडर्स

गेल्या मोसमातील चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्ससाठी 5 खेळाडू रिटेन करणं हे एखाद्या टेन्शनपेक्षा कमी नाही. गेल्या मोसमात त्यांच्या संघाचे संयोजन खूप चांगलं होतं. त्यामुळं ते विजेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरले होते. अशा स्थितीत ते कोणते 5 खेळाडू कायम ठेवणार हे पाहायचं आहे. मात्र, श्रेयस अय्यर, रिंकू सिंग आणि वरुण चक्रवर्ती संघाची पहिली पसंती असू शकतात. त्याचवेळी, सुनील नरेन आणि आंद्रे रसेल हे संघातील सर्वात जुने खेळाडू आहेत, ज्यांना पुन्हा एकदा कायम ठेवलं जाऊ शकतं.

दिल्ली कॅपिटल्स

दिल्ली कॅपिटल्स संघातील 5 खेळाडू जवळपास निश्चित मानले जात आहेत. यात कर्णधार ऋषभ पंतसोबतच अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांचाही रिटेन्शन लिस्टमध्ये समावेश केला जाऊ शकतो. त्याच वेळी, संघ नेहमीच तरुण खेळाडूंवर विश्वास ठेवतो. अशा परिस्थितीत जेक फ्रेझर-मॅकगर्क आणि ट्रिस्टियन स्टब्स हे युवा परदेशी खेळाडू पुन्हा एकदा या संघाचा भाग होऊ शकतात.

लखनऊ सुपर जायंट्स

केएल राहुल पुन्हा एकदा लखनऊ सुपर जायंट्स संघासाठी पहिली पसंती ठरु शकतो. त्याचवेळी रवी बिश्नोई आणि आयुष बडोनी यांनाही लखनऊ सुपरजायंट्सकडून कायम ठेवल्या जाऊ शकतं. याशिवाय निकोलस पूरन आणि मार्कस स्टॉइनिस हे विदेशी खेळाडू म्हणून कायम ठेवण्याची शर्यत जिंकू शकतात.

मुंबई इंडियन्स

मुंबई इंडियन्स संघावर सर्वांची नजर असणार आहे. स्टार खेळाडूंनी सजलेल्या या संघासाठी 5 खेळाडूंची निवड करणं खूप कठीण जाणार आहे. मुंबई इंडियन्सकडे हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, तिलक वर्मा, रोहित शर्मा आणि इशान किशनसारखे भारतीय खेळाडू आहेत. पण त्यांना यापैकी कोणत्याही 3 खेळाडूंना कायम ठेवता येईल. त्याचबरोबर टीम डेव्हिड आणि जेराल्ड कोएत्झी हे परदेशी खेळाडू म्हणून संघाची पहिली पसंती असू शकतात.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुबद्दल बोलायचे झालं तर, दरवेळेप्रमाणे याही वेळी विराट कोहली संघाची पहिली पसंती असणार आहे. त्याच्याशिवाय मोहम्मद सिराज आणि यश दयाल हे संघात राहू शकतात. त्याचबरोबर फाफ डु प्लेसिस आणि विल जॅक हे देखील संघातील मोठ्या नावांमध्ये आहेत.

सनरायझर्स हैदराबाद

सनरायझर्स हैदराबाद कर्णधार पॅट कमिन्सला त्यांच्यासोबत कायम ठेवू शकते. त्याच्या नेतृत्वाखाली संघानं गेल्या मोसमात चांगली कामगिरी केली होती. त्याचबरोबर सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांचाही संघाच्या कायम ठेवण्याच्या यादीत समावेश होऊ शकतो. त्याचबरोबर नितीश रेड्डीही या शर्यतीत सामील असून या संघाकडे हेनरिक क्लासेनसारखा स्फोटक फलंदाजही आहे. अशा परिस्थितीत परदेशी खेळाडूंची निवड करणे त्यांच्यासाठी सर्वात कठीण जाणार आहे.

पंजाबचे किंग्ज

पंजाब किंग्जबद्दल बोलायचं झालं तर अर्शदीप सिंग संघात कायम राहू शकतो. त्याच्याशिवाय आशुतोष शर्मा आणि शशांक सिंग यांसारख्या खेळाडूंवरही संघ विश्वास ठेवू शकतो. त्याचबरोबर सॅम कुरान आणि कागिसो रबाडा हे परदेशी खेळाडू म्हणून कायम ठेवण्याच्या यादीत आपली जागा बनवू शकतात.

राजस्थान रॉयल्स

राजस्थान रॉयल्स संघ संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल आणि रायन पराग यांना कायम ठेवू शकतो. त्याचबरोबर जोस बटलर आणि ट्रेंट बोल्ट हे विदेशी खेळाडू संघात राहू शकतात.

हेही वाचा :

  1. 5447 चेंडू, 1981 धावा... इतिहासातील सर्वात लांब कसोटी सामना, 12 दिवसानंतरही लागला नव्हता निकाल - Timeless Test
  2. न्यूझीलंडविरुद्ध श्रीलंका 2009 नंतर पहिल्यांदा मालिका जिंकणार की किवी संघ पुनरागमन करणार? 'इथं' पाहा लाईव्ह मॅच - SL vs NZ 2nd Test Live in India

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.