ETV Bharat / sports

गुलाबी शहरात कोण उधळणार 'विजयाचा गुलाल'? मागील पराभवाचा बदला घेण्यासाठी मैदानात उतरणार मुंबई - RR vs MI Preview - RR VS MI PREVIEW

RR vs MI Match Preview : आयपीएलचा 38वा सामना आज राजस्थान विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. उभय संघांमधील या हंगामातील हा दुसरा सामना असेल. पहिल्या सामन्यात राजस्थाननं मुंबईचा दारुण पराभव केला होता.

RR vs MI Match Preview
गुलाबी शहरात कोण उधळणार 'विजयाचा गुलाल'? मागील पराभवाचा बदला घेण्यासाठी मैदानात उतरणार मुंबई
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 22, 2024, 11:33 AM IST

जयपूर IPL 2024 RR vs MI : यंदाच्या आयपीएलमधील 38वा सामना आज राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्ध मुंबई इंडियन्स (MI) यांच्यात जयपूर येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर होणार आहे. राजस्थान विरुद्ध मुंबई इंडियन्सचा यंदाच्या हंगामातील हा दुसरा सामना असेल. यापूर्वी दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात राजस्थाननं मुंबईचा पराभव केला होता. त्यामुळं हा सामना जिंकून मागील पराभवाचा बदला घेण्याच्या इराद्यानं मुंबईचा संघ मैदानात उतरेल.

दोन्ही संघांचं गुणतालिकेतील स्थान : राजस्थाननं या हंगामात आतापर्यंत चमकदार कामगिरी केलीय. त्यांनी आतापर्यंत 7 सामने खेळले गेले आहेत, त्यातील 6 सामने जिंकले आहेत. गुजरात जायंट्सविरुद्धच्या सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. राजस्थानचा संघ 12 गुणांसह गुणतालिकेत अव्वलस्थानी विराजमान आहे. तर मुंबई इंडियन्सबद्दल बोलायचं झाले तर मुंबईनं 7 पैकी 3 सामन्यात विजय मिळवलाय. सहा गुणांसह ते गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहेत.

दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड : राजस्थान विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सामन्यांबद्दल बोलायचं झाल्यास, मुंबईचा वरचष्मा आहे. या दोघांमध्ये झालेल्या 29 सामन्यांपैकी मुंबईनं 15 तर राजस्थाननं 13 सामने जिंकले आहेत. तर एक सामना अनिर्णीत राहिला होता.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन :

  • मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, इशान किशन (यष्टिरक्षक), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, श्रेयस गोपाल, जसप्रीत बुमराह
  • राजस्थान रॉयल्स : यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (यष्टिरक्षक/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, कुलदीप सेन, युझवेंद्र चहल.

हेही वाचा :

  1. 'साई'कृपेनं गुजरात विजयी! घरच्या मैदानावर पंजाबच्या 'किंग्ज'चा पराभव, मागील पराभवाची गुजरातकडून व्याजासह परतफेड - PBKS vs GT
  2. शुभमन गिल होणार भारतीय संघाचा कर्णधार; सुरेश रैनाचं मोठं वक्तव्य - next India captain
  3. हैदराबादच्या फलंदाजांनी मोडले आयपीएलमधील धावांचे सर्व रेकॉर्ड; घरच्या मैदानावर 'राजधानी एक्सप्रेस' 'फेल' - DC vs SRH

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.