बंगळुरु IPL 2024 RCB vs DC : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात 62वा सामना खेळला जात आहे. हा सामना बेंगळुरुच्या एम चिनास्वामी स्टेडियमवर होत आहे. ज्यात दिल्लीचा पार्टटाईम कर्णधार अक्षर पटेलनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आरसीबीनं 7 बाद 187 धावा केल्या.
दोन्ही संघासाठी करा किंवा मरा सामना : हा सामना दिल्ली आणि बेंगळुरु या दोन्ही संघासाठी करा किंवा मरा असाच आहे. पंतच्या नेतृत्वाखालील दिल्लीनं आतापर्यंत 12 पैकी 6 सामने जिंकले असून 12 गुणांसह ते पाचव्या स्थानावर आहेत. तर आरसीबीनं 12 पैकी फक्त 5 सामने जिंकले आहेत. फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबी सध्या गुणतालिकेत 7व्या स्थानावर आहे. दोन्ही संघांना आणखी 2-2 सामने खेळायचे आहेत. अशा स्थितीत दिल्ली पुढील दोन सामने जिंकून 16 गुणांसह प्लेऑफमध्ये पोहोचण्याची अधिक शक्यता आहे. तर आरसीबीची शक्यता फारच कमी दिसते.
दिल्लीविरुद्ध आरसीबीचा वरचष्मा : आयपीएलमध्ये जेव्हा-जेव्हा दिल्ली आणि बेंगळुरु यांच्यात सामना झाला, तेव्हा तो सामना रंजक झाला. या दोघांमध्ये आतापर्यंत 30 सामने खेळले गेले आहेत. ज्यात आरसीबीचा वरचष्मा राहिलाय. त्यांनी यापैकी 18 सामने जिंकले, तर दिल्लीनं 11 जिंकले. एक सामना अनिर्णित राहिलाय.
दिल्ली विरुद्ध बेंगळुरु हेड-टू-हेड :
- एकूण सामने : 30
- दिल्लीनं जिंकले : 11
- बेंगळुरुनं जिंकले : 18
- अनिर्णीत : 1
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन :
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु : विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विल जॅक, रजत पाटीदार, महिपाल लोमरोर, कॅमरुन ग्रीन, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), यश दयाल, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज आणि लॉकी फर्ग्युसन
इम्पॅक्ट खेळाडू : अनुज रावत, सुयश प्रभुदेसाई, विजयकुमार वैशाक, स्वप्नील सिंग, हिमांशू शर्मा
दिल्ली कॅपिटल्स : जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), शाई होप, कुमार कुशाग्रा, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल (कर्णधार), कुलदीप यादव, मुकेश कुमार, इशांत शर्मा, रसिक दार सलाम आणि खलील अहमद.
इम्पॅक्ट सब : डेव्हिड वॉर्नर, रिकी भुई, प्रवीण दुबे, सुमित कुमार आणि विकी ओस्टवाल.
हेही वाचा :