ETV Bharat / sports

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आजपासून आयपीएलचा 'तडका'; नव्या कर्णधारासह गतविजेते मैदानात - IPL 2024 CSK vs RCB

IPL 2024 CSK vs RCB : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या मोसमाचा सलामीचा सामना आज चेन्नईत खेळला जाणार आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे संघ आमनेसामने असतील. या हंगामात चेन्नईचा संघ नव्या कर्णधारासह मैदानात उतरणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आजपासून आयपीएलचा 'तडका'; नव्या कर्णधारासह गतविजेते मैदानात

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 22, 2024, 9:15 AM IST

चेन्नई IPL 2024 CSK vs RCB : एकीकडे देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आसताना इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 17 व्या हंगामाला आजपासून सुरुवात होणार आहे. पहिल्या सामन्यात गतविजेते चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) हे संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. या सामन्यात चेन्नईचा संघ आपल्या नव्या कर्णधारासह मैदानात उतरणार आहे. याचाच अर्थ आता आयपीएलच्या पहिल्या सामन्यानं एका नव्या पर्वाची सुरुवात होणार आहे. चेन्नई संघाची कमान आता महेंद्रसिंग धोनीऐवजी मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडकडे आहे. हा सलामीचा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर रात्री 7:30 वाजता खेळला जाणार आहे.

बेंगळुरुविरुद्ध चेन्नईचा वरचष्मा : पाच वेळचा विजेता आणि गतविजेता चेन्नईचा संघ यंदाच्या हंगामात विक्रमी सहाव्या विजेतेपदाकडे डोळे लावून बसला आहे. तर दुसरीकडं आरसीबी प्रथमच विजेतेपदावर कब्जा करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. आयपीएलमध्ये सीएसके आणि आरसीबीचे संघ आतापर्यंत 31 वेळा आमनेसामने आले आहेत. यात चेन्नईनं वर्चस्व राखत 20 सामने जिंकले, तर बंगळुरुनं 10 सामने जिंकले. तर एक सामना अनिर्णित राहिला.

चेन्नई संघाची ताकद काय : अंगठ्याच्या दुखापतीमुळं आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांमधून बाहेर पडलेल्या डेव्हॉन कॉनवेच्या जागी न्यूझीलंडच्या रचिन रवींद्रनं चेन्नईच्या संघात स्थान घेतलंय. त्याचवेळी त्याचा देशबांधव डॅरिल मिशेल मधल्या फळीत असेल. तर मधल्या फळीत धावा काढण्याची जबाबदारी अनुभवी अजिंक्य रहाणे आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड यांच्यावर असेल. चिदंबरम स्टेडियमच्या खेळपट्टीवर अष्टपैलू आणि फिरकीपटू हे चेन्नईची बलस्थानं आहेत. रवींद्र जडेजा, मिचेल सँटनर, मोईन अली, रचिन रवींद्र, महिश तिक्षीना यांची गोलंदाजी इथं प्रभावी ठरेल. सीएसकेकडे दीपक चहर आणि शार्दुल ठाकूरसारखे वेगवान गोलंदाजही आहेत.

2008 पासून बेंगळुरु चेन्नईत चेन्नईला हरवू शकलं नाही : 2008 पासून या मैदानावर बेंगळुरुनं चेन्नईला हरवलेलं नाही. दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर मैदानात परतणाऱ्या विराट कोहली आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस यांच्यावर धावा काढण्याची जबाबदारी असेल. अष्टपैलू कॅमेरुन ग्रीन आणि ग्लेन मॅक्सवेल हेही बेंगळुरु संघात आहेत. वेगवान गोलंदाजांमध्ये त्यांच्याकडे मोहम्मद सिराज, लॉकी फर्ग्युसन, अल्झारी जोसेफ, आकाश दीप आणि रीस टोपली आहेत. फिरकी गोलंदाजीत वानिंदू हसरंगाची उणीव भासेल, पण मॅक्सवेलला अनुभव आहे.

दोन्ही संघ पुढीलप्रमाणे :

  • चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), महेंद्रसिंग धोनी, मोईन अली, दीपक चहर, तुषार देशपांडे, शिवम दुबे, अजय मंडल, मुकेश चौधरी, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, मिचेल सँटनर, सिमरजीत सिंग, निशांत सिंधू, प्रशांत सिंधू, प्रशांत सोंडे, महिश तिक्षीणा, रचिन रवींद्र, शार्दुल ठाकूर, डॅरिल मिशेल, समीर रिझवी, मुस्तफिजुर रहमान, अवनीश राव अरावेली.
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, विल जॅक, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, मनोज भडांगे, मयंक डांगर, विजय कुमार, दीपकुमार वैशाख, विजय कुमार , मोहम्मद सिराज, रीस टोपले, हिमांशू शर्मा, राजन कुमार, कॅमेरॉन ग्रीन, अल्झारी जोसेफ, यश दयाल, टॉम कुरन, लॉकी फर्ग्युसन, स्वप्नील सिंग, सौरव चौहान.

हेही वाचा :

  1. मराठमोळा ऋतुराज गायकवाड 'चेन्नई सुपर किंग्ज'चा नवा कर्णधार - Ruturaj Gaikwad is new captain

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.