IPL 2024 Awards List : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) च्या 17 व्या हंगामाचा अंतिम सामना 26 मे (रविवार) रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला गेला. अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं (KKR) सनरायझर्स हैदराबादचा (SRH) 8 गडी राखून पराभव केला. कोलकाता नाईट रायडर्स तिसऱ्यांदा आयपीएल चॅम्पियन बनला आहे. तर सनरायझर्स हैदराबादचं दुसऱ्यांदा आयपीएलचं जेतेपद पटकावण्याचं स्वप्न भंगलं.
विराट कोहलीनं रचला इतिहास : आयपीएलच्या या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं वर्चस्व गाजवलं. त्यानं संपूर्ण मोसमात शानदार फलंदाजी करत सर्वाधिक धावा करून ऑरेंज कॅप जिंकली. 35 वर्षीय विराट कोहलीनं आयपीएल 2024 मध्ये 15 सामन्यांमध्ये 61.75 च्या सरासरीनं आणि 154.69 च्या स्ट्राइक रेटनं 741 धावा केल्या. या काळात किंग कोहलीनं एक शतक आणि पाच अर्धशतके झळकावली. विराटनं दुसऱ्यांदा ऑरेंज कॅपवर कब्जा केलाय. आयपीएलमध्ये दोनदा ऑरेंज कॅप जिंकणारा कोहली हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी कोहलीनं 2016 च्या मोसमात 973 धावा करून ऑरेंज कॅप जिंकली होती.
प्लेयर ऑफ द टुर्नामेंट : कोलकाता नाईट रायडर्सचा खेळाडू सुनील नरेनला प्लेयर ऑफ द टुर्नामेंटचा किताब मिळालाय. आयपीएलमध्ये तीनवेळा हा पुरस्कार जिंकणारा पहिला खेळाडू ठरलाय. नरेननं 488 धावा केल्या आणि 17 विकेट घेतल्या. नरेननं 9.27 च्या इकॉनॉमी आणि 31.44 च्या सरासरीनं 17 विकेट घेतल्या. 15 सामन्यात 180.74 च्या स्ट्राईक रेटनं 488 धावा केल्या.
IPL 2024 मध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
• विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा) – 741 धावा
• ऋतुराज गायकवाड (चेन्नई सुपर किंग्ज) – 583 धावा
• रियान पराग (राजस्थान रॉयल्स) – 573 धावा
हर्षल पटेलनं दुसऱ्यांदा जिंकली पर्पल कॅप : वेगवान गोलंदाज हर्षल पटेलबद्दल बोलायचे तर त्यानं या मोसमात 14 सामन्यात 19.87 च्या सरासरीनं आणि 9.73 च्या इकॉनॉमी रेटनं 24 विकेट घेतल्या. हर्षल पटेलनं दुसऱ्यांदा पर्पल कॅपवर कब्जा केलाय. याआधी हर्षलनं 2021 च्या मोसमात पर्पल कॅप जिंकली होती.
IPL 2024 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे खेळाडू
• हर्षल पटेल (पंजाब किंग्ज) – 24 विकेट्स
• वरुण चक्रवर्ती (कोलकाता नाइट रायडर्स) – 21 विकेट्स
• जसप्रीत बुमराह (मुंबई इंडियन्स) – 20 विकेट्स
उदयोन्मुख खेळाडू : सनरायझर्स हैदराबादचा युवा फलंदाज नितीश रेड्डीनं आयपीएल 2024 मध्ये अप्रतिम कामगिरी केली. आपल्या खेळीनं सर्वांना प्रभावित करण्यात तो यशस्वी ठरला. त्यानं आयपीएल 2024 च्या 13 सामन्यांमध्ये 303 धावा केल्या ज्यात 2 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय त्यानं तीन विकेट्सही आपल्या नावावर केल्या. त्याला इमर्जिंग प्लेयर ऑफ द सीझनचा पुरस्कार देण्यात आलाय.
हंगामातील सर्वात वेगवान फलंदाज : संपूर्ण हंगामात सर्वाधिक स्ट्राइक रेटनं धावा करणाऱ्या खेळाडूला इलेक्ट्रिक स्ट्रायकर ऑफ द सिझनचा किताब देण्यात येतो. ज्यामध्यं विजेत्याला टाटा इलेक्ट्रिक कार बक्षीस म्हणून देण्यात आली. दिल्ली कॅपिटल्सचा खेळाडू फ्रेजर मॅकगर्गनं ही कार जिंकलीय. या हंगामात फ्रेझर मॅकगारनं 234.04 च्या स्ट्राइक रेटनं धावा केल्या आहेत.
सुपर सिक्सेस ऑफ द टुर्नामेंट : सनरायझर्स हैदराबादचा युवा फलंदाज अभिषेक शर्मानं आयपीएल 2024 मध्ये अप्रतिम कामगिरी केलीय. आपल्या खेळीनं त्यानं अनेक सामने जिंकवलेत. त्यानं आयपीएल 2024 च्या 16 सामन्यांमध्ये 484 धावा केल्या ज्यात 3 अर्धशतकांचा समावेश आहे. या खेळीदरम्यान त्यानं ४२ षटकार ठोकले. त्याला सुपर सिक्सेस ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार मिळालाय.
हेही वाचा
- केकेआरच्या विजयानंतर गौतमची 'गंभीर' पोस्ट; मध्यरात्री केलेली 'ही' पोस्ट ठरतेय चर्चेचा विषय - Gautam Gambhir Post
- 'केकेआर'च्या विजयानंतर शाहरुख खानचं कुटुंब झालं भावूक, बाप लेकीच्या डोळ्यात आनंदाश्रू - IPL 2024 Final
- अंतिम सामन्यानंतर 'कही खुशी कही गम'; काव्या मारनंच्या डोळ्यात अश्रू तर शाहरुख खानचा जल्लोष - kavya maran emotional