नॉर्थम्प्टनशायर Yuzvendra Chahal : युझवेंद्र चहलला अद्याप भारतीय कसोटी क्रिकेट संघात संधी मिळालेली नाही. यामुळं त्यानं इंग्लंडच्या काउंटी क्लब नॉर्थम्प्टनशायरकडून खेळण्याचा निर्णय घेतला. मग त्यानं आपल्या पहिल्याच सामन्यात विक्रमी कामगिरी केली आणि पाच विकेट्स घेतल्या. चहलच्या दमदार कामगिरीमुळं त्याचा संघ नॉर्थम्प्टनशायरनं केंट स्पिटफायर्सवर 9 गडी राखून विजय मिळवला आहे. विशेष बाब म्हणजे चहल नॉर्थम्प्टनशायरमध्ये सामील झाल्याची बातमी सामन्याच्या एक तास आधी आली होती.
10 overs.
— Northamptonshire Steelbacks (@NorthantsCCC) August 14, 2024
5 maidens.
14 runs.
5 wickets.
Take a bow, @yuzi_chahal 👏 pic.twitter.com/LDuDVzhNvy
संघाला मोसमातील पहिला विजय मिळवून दिला : सुपरस्टार फिरकीपटू युझवेंद्र चहलने केंट स्पिटफायर्सच्या फलंदाजाची कणा मोडला आणि त्याच्या 10 षटकांत 14 अवघ्या धावा देत 5 विकेट घेतल्या, परिणामी त्याच्या संघानं 35.1 षटकांतच विरोधी संघाला 82 धावांत गुंडाळलं. चहलनं जदीन डेन्ली (22), एकांश सिंग (10), ग्रँट स्टीवर्ट (01), बेअर्स स्वानेपोएल (01) आणि नॅथन गिलख्रिस्ट (06) यांचे बळी घेतले. या लक्ष्याचा पाठलाग करताना नॉर्थम्प्टनशायर संघानं 14 षटकांत एक गडी गमावून 86 धावा करत सहज विजयाची नोंद केली. याआधी नॉर्थम्प्टनशायर सहा सामने हरला होता. त्यांचा हा दुसरा विजय आहे. हा संघ गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे.
18.5 | Two in the over! 😵💫
— Northamptonshire Steelbacks (@NorthantsCCC) August 14, 2024
Chahal gets Swanepoel LBW and picks up a third. 3️⃣
Spitfires 50/7.
Watch live 👉 https://t.co/CU8uwteMyd pic.twitter.com/KoMcvKWeXw
नॉर्थम्प्टनशायरनं दिली माहिती : एकदिवसीय चषकाव्यतिरिक्त युझवेंद्र चहल 'कौंटी चॅम्पियनशिप डिव्हिजन टू' मध्ये उर्वरित पाच सामनेही खेळणार आहे. नॉर्थम्प्टनशायरनं आपल्या वेबसाइटवर चहलच्या संघात सामील झाल्याची घोषणा केली. 'नॉर्थहॅम्प्टनशायर काउंटी क्रिकेट क्लबला हे जाहीर करताना आनंद होत आहे की भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहल केंटमधील अंतिम एकदिवसीय चषक सामन्यासाठी आणि उर्वरित पाच काउंटी चॅम्पियनशिप सामन्यांसाठी क्लबमध्ये सामील होईल,' असं नॉर्थम्प्टनशायरने एका निवेदनात म्हटलं आहे.
भारतासाठी घेतल्या सर्वाधिक टी 20 विकेट : 34 वर्षीय युजवेंद्र चहलनं आतापर्यंत भारतासाठी 72 एकदिवसीय आणि 80 टी-20 सामने खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये तो भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्याच्या नावावर 96 विकेट आहेत. याशिवाय एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यानं 121 विकेट्स घेतल्या आहेत. त्याला अद्याप कसोटी संघात पदार्पण करण्याची संधी मिळालेली नाही.
हेही वाचा :