ETV Bharat / sports

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतर देशांकडून खेळणारे 'हे' खेळाडू भारतीय वंशाचे; मुंबईच्याही एका खेळाडूचा समावेश' - Paris Olympics 2024 - PARIS OLYMPICS 2024

Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 117 भारतीय खेळाडू भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत. पण, या ऑलिम्पिकमध्ये भारतीय वंशाचे अनेक खेळाडू इतर देशांचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

Paris Olympics 2024
पॅरिस ऑलिम्पिक (ETV Bharat MH Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 23, 2024, 8:15 PM IST

मुंबई Paris Olympics 2024 : येत्या 26 जुलैपासून पॅरिस ऑलिम्पिक सुरु होत आहे. या ऑलिम्पिकमध्ये 117 खेळाडू पदकांसाठी भारताचं प्रतिनिधित्व करतील. इतकंच नव्हे तर आगामी ऑलिम्पिकमध्ये भारताचे अनेक प्रकारे प्रतिनिधित्व केलं जाईल. पॅरिस गेम्समध्ये भारतीय वंशाचे अनेक खेळाडू आपापल्या देशांच्या वतीनं सहभागी होत आहेत. विशेष म्हणजे यात मुळचा महाराष्ट्रातील मुंबईच्या एका खेळाडूचा समावेश आहे. कनक झा असं या खेळाडूचं नाव आहे.

कनक झा - महाराष्ट्र (टेबल टेनिस, यूएसए)

कनक झा हा पॅरिस ऑलिम्पिक भाग घेणारा भारतीय वंशाचा खेळाडू अमेरिकन टेबल टेनिसपटू आहे. झा याची आई करुणा मुंबईची आहे, तर वडील अरुण हे कोलकाता आणि प्रयागराज इथं लहानाचे मोठे झाले आहेत. दोघंही आयटी प्रोफेशनल आहेत. दोन वेळचा ऑलिंपियन कनक झा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पहिलं पदक जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. कनक झा 2016 मध्ये ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा सर्वात तरुण पुरुष टेनिसपटू होता. तेव्हापासून, तो दोन वेळा ऑलिम्पियन बनला आहे. विशेष म्हणजे पॅरिस ऑलिम्पिकमधील टेबल टेनिस एकेरी सामन्यांमध्ये तो अमेरिकेचा एकमेव खेळाडू असेल. झा हा पाच वेळा अमेरिकेचे राष्ट्रीय चॅम्पियन आणि पॅन अमेरिकन चॅम्पियन आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येही त्यानं उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली होती. तो आपला पहिला पदक जिंकण्यासाठी आतुर आहे. 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमधला तो सर्वात तरुण अमेरिकन ऍथलीट होता आणि 2018 मध्ये अर्जेंटिना इथं झालेल्या युवा ऑलिंपिकमध्ये पदक जिंकणारा पहिला अमेरिकन ठरला होता.

राजीव राम- कर्नाटक (टेनिस, यूएसए)

या खेळाडूंमध्ये राजीव रामचा देखील समावेश आहे, हा सुद्धा अमेरिकेचा टेनिसपटू आहे. 40 वर्षीय राजीव रामचे आई-वडील मुळचे भारतातील बंगळुरु इथले आहेत. त्याचा जन्म अमेरिकेतील डेन्व्हर इथं झाला होता. भारतीय अमेरिकन राजीव रामनं 2019 ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये मिश्र दुहेरीत वयाच्या 34 व्या वर्षी पहिलं ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकलं. त्यानंतरच्या वर्षांत, त्यानं यूकेच्या सॅलिसबरीसह आणखी पाच ग्रँडस्लॅम विजेतेपदे जिंकली आहेत. एक मिश्र दुहेरीत आणि चार पुरुष दुहेरीत. रामनं एकेरी आणि दुहेरीमध्ये एकूण नऊ राष्ट्रीय ज्युनियर जेतेपदे जिंकली आहेत.

शांती परेरा -केरळ (सिंगापूर, ॲथलेटिक्स)

सिंगापूरची स्प्रिंट क्वीन म्हणून ओळखली जाणारी वेरोनिका शांती परेरा ही मूळची केरळची आहे. तिचे आजी आजोबा तिरुअनंतपुरमजवळील वेट्टुकड या गावातून आले होते. पण, जेव्हा शांतीच्या आजोबांना सिंगापूरमध्ये नोकरी लागली तेव्हा दोघांनी भारत सोडला आणि ते सिंगापुरमध्ये स्थायिक झाले.

पृथिका पावडे - पाँडिचेरी (फ्रान्स)

टेबल टेनिस पृथिकाचे वडील पाँडिचेरीत वाढले, जिथं तिचा जन्म झाला. त्यांनी 2003 मध्ये लग्न केलं आणि ते पॅरिसला गेले. फ्रान्सच्या राजधानीत जन्मलेल्या पृथिकानं एका वर्षानंतर वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी टोकियो इथं झालेल्या पहिल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेतला.

अमर धेसी - पंजाब (कुस्ती, कॅनडा)

अमरवीरचा जन्म सरे ब्रिटिश कोलंबिया, देशाच्या पश्चिम किनाऱ्यावरील लहान प्रांतात बलबीर ढेसी यांच्या घरी झाला. माजी ग्रीको-रोमन नॅशनल चॅम्पियन अमरचे वडील जालंधर जिल्ह्यातील संघवाल या पंजाबी गावातील आहेत. एनआयएस पटियाला इथं प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आणि पंजाब पोलिसांत पद मिळाल्यानंतर, बलबीर 1979 मध्ये चांगल्या संधींच्या शोधात कॅनडाला गेला.

हेही वाचा :

  1. अशक्य! ऑलिम्पिक इतिहासातील 'हे' 10 विश्वविक्रम मोडणे जवळपास कोणत्याही खेळाडूच्या आवाक्याच्या बाहेर - Paris Olympics 2024
  2. कसं असतं ऑलिम्पिक गाव? कधीपासून सुरु झाली ऑलिम्पिक खेळाडूंसाठी 'ही' सुविधा - Paris Olympics 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.