नवी दिल्ली T20 Cricket : बुधवार म्हणजेच 9 ऑक्टोबरचा दिवस भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी धमाकेदार ठरणार आहे. कारण या दिवशी चाहत्यांना क्रिकेट सामन्यांचा बडल डोस मिळणार आहे, कारण भारतीय संघ एकाच वेळी दोन सामने खेळणार आहे. यात एकीकडे भारतीय महिला क्रिकेट संघ ICC महिला T20 विश्वचषक 2024 च्या आपल्या तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध खेळताना दिसणार आहे. तर दुसरीकडे, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरुष क्रिकेट संघ बांगलादेशसोबत भिडताना दिसणार आहे.
Familiar foes collide 💥#AUSvNZ preview 📝 https://t.co/DugVaOhsn7#T20WorldCup #WhateverItTakes pic.twitter.com/yaWvxldy0x
— ICC (@ICC) October 8, 2024
भारतीय महिलांसाठी 'करो या मरो'चा सामना : ICC महिला T20 विश्वचषक 2024 च्या बाराव्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघ बुधवारी श्रीलंका महिला क्रिकेट संघाविरुद्ध सामना खेळताना दिसणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार असून हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून खेळवला जाईल. युएईत सुरु असलेल्या ICC महिला T20 विश्वचषकात भारतीय क्रिकेट संघाचा हा तिसरा सामना आहे. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडनं भारताला 58 धावांनी पराभूत केलं होतं, त्यानंतर रविवारी झालेल्या आपल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय महिला संघानं कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला 6 विकेटनं धुळ चारत स्पर्धेतील आपलं आव्हान जिवंत राखलं. आता या तिसऱ्या सामन्यात भारतीय महिला संघाला कोणत्याही किंमतीत विजयाची गरज आहे.
भारत आणि बांगलादेश पुन्हा भिडणार : दुसरीकडे भारत आणि बांगलादेशच्या पुरुष संघांमध्ये रविवारपासून म्हणजेच 6 ऑक्टोबरपासून तीन T20 सामन्यांची मालिका सुरु झाली आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघानं दणदणीत विजय मिळवला होता. आता बुधवारी होणाऱ्या सामन्यात पुन्हा विजय मिळवत भारतीय संघाचा मालिका जिंकण्याचा प्रयत्न असेल. तर सामन्यात पुनरागमन करत बांगलादेश मालिकेत बरोबरी करण्याचा प्रयत्न करेल. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता सुरु होईल.
Gwalior ✈️ Delhi#TeamIndia have arrived for the 2nd #INDvBAN T20I 👌👌@IDFCFIRSTBank pic.twitter.com/jBWuxzD0Qe
— BCCI (@BCCI) October 8, 2024
दोन्ही सामने कुठं पाहता येतील लाईव्ह : ICC महिला T20 विश्वचषकातील भारत विरुद्ध श्रीलंका सामना हा स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रसारित केला जाईल तर या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहता येईल. तसंच भारत आणि बांगलादेश दरम्यानचा दुसरा T20 सामना भारतात स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर थेट प्रसारित केला जाईल, तर जियो सिनेमावर या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग चाहत्यांना पाहता येईल.
हेही वाचा :