ETV Bharat / sports

भारतीय संघाचा विजयी 'पंच'; पाकिस्तानवर दणदणीत विजय - IND vs PAK Hockey

IND vs PAK Hockey : आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघानं पाकिस्तानचा पराभव केला. यासह भारतानं या स्पर्धेत सलग पाचवा विजय मिळवला.

IND vs PAK Hockey
भारतीय पुरुष हॉकी संघ (IANS Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Sep 14, 2024, 3:04 PM IST

Updated : Sep 14, 2024, 3:15 PM IST

मोकी (चीन) IND vs PAK Hockey : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही भारतीय हॉकी संघाच्या खेळाडूंनी पॅरिस ऑलिम्पिकमधील फॉर्म कायम ठेवला आहे. चीनमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत भारतीय संघानं पुन्हा एकदा दमदार कामगिरी करत सलग पाचवा विजय मिळवला आहे. गटातील शेवटच्या सामन्यात भारतीय संघानं पाकिस्तानचा 2-1 असा पराभव केला. भारतीय संघानं या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. संघाच्या विजयाचा हिरो ठरला कर्णधार हरमनप्रीत सिंग, यानं पेनल्टी कॉर्नरद्वारे 2 गोल केले. पाकिस्ताननं सामन्यात पहिला गोल केला असला तरी भारतीय संघानं दमदार पुनरागमन करत सामना 2-1 असा जिंकला.

पाकिस्तानचा पहिला गोल, भारताचे दोन : भारत आणि पाकिस्तानचे संघ 350 दिवसांनंतर सामना खेळत होते. खेळ सुरु होताच पाकिस्ताननं आक्रमणाला सुरुवात केली आणि सातव्या मिनिटाला हन्नान शाहिदच्या सहाय्यानं गोल नोंदवत 1-0 अशी आघाडी घेतली. मात्र, भारतानं पुनरागमन करण्यास विलंब लावला नाही. भारताचा कर्णधार हरमनप्रीत सिंगनं 13व्या मिनिटाला भारतासाठी पहिला गोल करत सामना 1-1 असा बरोबरीत आणला. दुसऱ्या क्वार्टरमध्ये खेळाच्या 19व्या मिनिटाला भारतीय संघाला पुन्हा पेनल्टी कॉर्नर मिळाला, त्यानंतर भारतीय संघाच्या 'सरपंच'नं सामन्यातील दुसरा गोल केला. यासह भारतानं पाकिस्तानविरुद्ध 2-1 अशी आघाडी घेतली. हीच आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली.

पाकिस्तानचा संघर्ष : तिसऱ्या क्वार्टरमध्ये खेळाच्या 38व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. मात्र कर्णधार हरमनप्रीत सिंगची हॅट्ट्रिकची संधी हुकली. यानंतरही भारतीय संघाला तिसऱ्या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये संधी मिळाल्या, मात्र त्यांचं गोलमध्ये रुपांतर होऊ शकलं नाही. दुसरीकडे पाकिस्तानचा संघ सतत संघर्ष करताना दिसला. त्यांनी बरोबरीच्या अनेक संधी गमावल्या. खेळादरम्यान पाकिस्तानच्या अबू महमूद गंभीर जखमी झाला. त्याला स्ट्रेचरवर बाहेर काढावं लागलं, त्यामुळं पाकिस्तान संघाचं मोठं नुकसान झालं.

हेही वाचा :

  1. भारतीय क्रिकेटमध्ये 17 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी झाली होती 'धोनी युगा'ची सुरुवात; 'बॉल आउट'मध्ये पाकिस्तानला चारली होती धूळ - IND vs PAK Bowl Out
  2. एमएस धोनीला चेन्नई सुपर किंग्स IPL 2025 साठी...; समोर आली मोठी अपडेट - MS Dhoni in IPL 2025

Last Updated : Sep 14, 2024, 3:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.