मुंबई Indian Cricketers Private Jet : भारताचे दिग्गज क्रिकेट खेळाडू सचिन तेंडुलकर, एमएस धोनी आणि विराट कोहली हे सध्या जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू आहेत. हे क्रिकेटपटू लीग क्रिकेट, ब्रँड एंडोर्समेंट आणि जाहिरातींच्या माध्यमातून भरपूर पैसे कमावतात. त्यांच्याकडे महागडे बंगले, कार आणि अगदी प्रायव्हेट जेट यासारख्या चैनीच्या वस्तू देखील आहेत. चला तर मग या क्रिकेटपटूंवर एक नजर टाकूया.
- कपिल देव : कपिल देव यांना क्रिकेटच्या इतिहासातील महान अष्टपैलू खेळाडूंपैकी एक मानलं जातं. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतानं 1983 मध्ये पहिल्यांदा विश्वचषक जिंकला होता. स्वातंत्र्यानंतर स्वतःचं जेट खरेदी करणारे कपिल देव हे पहिले क्रिकेटपटू ठरले. कपिल देव यांच्या खासगी जेटची किंमत 110 कोटी रुपये आहे.
- सचिन तेंडुलकर : क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर महान क्रिकेटपटूंपैकी एक आहे. तो जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक आहे आणि त्याच्याकडे प्रायव्हेट जेट देखील आहे. या अनुभवी क्रिकेटपटूकडे 250 कोटी रुपयांचं जेट आहे.
- एमएस धोनी : एमएस धोनी हा जगातील तीनही आयसीसी ट्रॉफी जिंकणारा एकमेव कर्णधार आहे. महान कर्णधारासोबतच तो जगातील सर्वात श्रीमंत खेळाडूंपैकी एक आहे. एमएस धोनीकडे स्वतःचं जेटही आहे. त्याच्या जेटची किंमत 110 कोटी रुपये आहे.
- विराट कोहली : रन मशिन विराट कोहली नेहमीच त्याच्या उच्च जीवनशैलीमुळं चर्चेत असतो. त्याच्याकडे महागडी कार आणि एक प्रायव्हेट जेटही आहे. कोहलीचं खाजगी जेट अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे आणि प्रवासाचा आरामदायी अनुभव देतं. त्याची किंमत 120 कोटी रुपये आहे.
- हार्दिक पांड्या : भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्यानं 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये देशाच्या विजेतेपदात महत्त्वाची भूमिका बजावली. हार्दिक हा भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक आहे आणि त्याच्याकडे 40 कोटी रुपयांचं खाजगी जेट देखील आहे.
हेही वाचा :