मुंबई INDW vs WIW 1st T20I Live Streaming : भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना आज नवी मुंबईतील डॉ. डी वाय पाटील स्पोर्ट्स अकादमी इथं खेळवला जाणार आहे.
ऑस्ट्रेलियाकडून पराभव : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अपेक्षेप्रमाणे राहू शकला नाही, जिथं त्यांना 0-3 असा पराभव पत्करावा लागला. T20I मध्ये भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाला अनेकदा पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी केल्यानंतर, महिला आशिया कप 2024 च्या अंतिम फेरीत त्यांना श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागला. UAE मध्ये होणाऱ्या महिला T20 विश्वचषक 2024 मध्ये भारत मोठ्या आशेनं आणि स्वप्नांसह गेला होता, परंतु गट टप्प्यातील दोन सामने गमावल्यानंतर आणि उपांत्य फेरीसाठी पात्रता मिळवण्यात अपयशी ठरल्यानं हे सर्व भंग पावले.
🚨 NEWS 🚨
— BCCI Women (@BCCIWomen) December 13, 2024
India’s squad for IDFC First Bank T20I & ODI series against West Indies announced.
All The Details 🔽 #TeamIndia | #INDvWI https://t.co/2Vf8Qbix76
वेस्ट इंडिजच्या दिग्गज खेळाडू अनुपस्थित : वेस्ट इंडिजविरुद्धच्या T20I मध्ये भारताला निराशाजनक वर्षानंतर या फॉरमॅटमध्ये स्वत:ला सुधारण्याची संधी मिळेल, पण हे काम सोपे नसेल. महिला T20 विश्वचषक 2024 मध्ये दिसल्याप्रमाणे हेली मॅथ्यू आणि तिची टीम चांगल्या फॉर्ममध्ये आहे. वेस्ट इंडिज उपांत्य फेरीत प्रवेश करण्यात यशस्वी ठरला, यात त्यांना अंतिम विजेत्या न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. वेस्ट इंडिजसाठी, अनुभवी स्टॅफनी टेलर दुखापतीतून सावरल्यामुळे संपूर्ण भारत दौऱ्याला मुकणार आहे.
T20I Mode 🔛#TeamIndia get into the groove ahead of the #INDvWI series opener at the DY Patil stadium 👌👌@IDFCFIRSTBank pic.twitter.com/DCC5tnq6Ew
— BCCI Women (@BCCIWomen) December 14, 2024
दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड काय : भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघाविरुद्ध एकूण 21 सामने खेळले आहेत. या 21 पैकी भारताने 13 सामने जिंकून आघाडी मिळवली आहे, तर वेस्ट इंडिजने आठ सामने जिंकले आहेत. जे या सामन्यात चुरशीची स्पर्धा असेल याची खात्री देते.
भारत महिला विरुद्ध वेस्ट इंडिज महिला पहिला T20 सामना कधी आणि कुठं खेळला जाईल?
- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघ तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना नवी मुंबईतील डॉ डी वाय पाटील स्पोर्ट्स अकादमी इथं संध्याकाळी 7:00 वाजता सुरू होईल. याची नाणेफेक अर्धातास आधी होईल.
भारतीय महिला विरुद्ध वेस्ट इंडिज महिला पहिला T20I सामना कुठं आणि कसा पहावा?
- भारत विरुद्ध वेस्ट इंडीज महिला मालिकेचे अधिकृत प्रसारण भागीदार व्हायाडॉट कॉम 18 आहे. भारतातील चाहते स्पोर्ट्स 18 टीव्ही चॅनेलवर सामन्याचं थेट प्रक्षेपण पाहू शकतात. तुम्ही जियो सिनेमा ॲप आणि वेबसाइटवर सामन्याचं लाइव्ह स्ट्रीमिंग विनामूल्य पाहू शकता.
Some centre field training before we take centre stage!🏏An epic cricket clash⚔️ awaits us as Caribbean🏝️ flair takes on Indian precision this Sunday!🙌🏼💪🏼#INDWvWIW | #MaroonWarriors pic.twitter.com/j8NBfo5PK1
— Windies Cricket (@windiescricket) December 14, 2024
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11:
भारत : स्मृती मानधना, ऋचा घोष (विकेटकीपर), जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), हरलीन देओल, दीप्ती शर्मा, मिन्नू मणी, राधा यादव, रेणुका सिंग ठाकूर, तितास साधू, प्रिया मिश्रा
वेस्ट इंडीज : हेली मॅथ्यूज (कर्णधार), डिआंड्रा डॉटिन, शमीन कॅम्पबेल, चिनेल हेन्री, रशादा विल्यम्स, मँडी मंगरू, जाडा जेम्स, आलिया ॲलेने, करिश्मा रामहरक, एफी फ्लेचर, शमिलिया कोनेल
हेही वाचा :