कोलंबो IND vs SL ODI Series : भारतीय क्रिकेट संघ आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना 7 जून रोजी कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात पुन्हा एकदा श्रीलंकन संघाच्या फिरकी गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला. ज्यात त्यांनी 249 धावांचं पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाचा डाव अवघ्या 138 धावांवर संपुष्टात आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. यासह 27 वर्षांनंतर द्विपक्षीय एकदिवसीय मालिकेत भारताचा पराभव करण्यातही श्रीलंकेचा संघ यशस्वी ठरला. या मालिकेत एक अनोखा विक्रमही झाला. ज्यात द्विपक्षीय एकदिवसीय मालिकेत प्रथमच 15 हून अधिक खेळाडू फिरकी गोलंदाजांविरुद्ध पायचीत (LBW) आऊट झाले आहेत.
INDIA LOSE THEIR FIRST ODI SERIES AGAINST SRI LANKA IN 27 YEARS....!!!! pic.twitter.com/L588dK19is
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 7, 2024
श्रीलंकेच्या फिरकीपटूंनी घेतल्या सर्वाधिक विकेट : तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत फिरकी गोलंदाजांचं पूर्ण वर्चस्व दिसून आलं. ज्यात श्रीलंकेकडून जेफ्री वँडरसेनं 8 विकेट्स घेतल्या, तर ड्युनिथ वेल्लालगेनं 7 विकेट घेतल्या. या मालिकेदरम्यान, एक अनोखा विक्रमही केला गेला ज्यात द्विपक्षीय वनडे मालिकेत प्रथमच 18 खेळाडू एलबीडब्ल्यू होऊन पॅव्हेलियनमध्ये परतले. विशेष म्हणजे यात श्रीलंकन संघाच्या फिरकी गोलंदाजांनी एकूण 14 भारतीय खेळाडूंना एलबीडब्ल्यू आऊट करुन पॅव्हेलियनमध्ये पाठवलं, तर भारतीय संघाच्या फिरकी गोलंदाजांना केवळ 3 एलबीडब्ल्यू विकेट घेण्यात यश आलं आहे. यापूर्वी 2018 मध्ये युएई आणि झिम्बाब्वे यांच्यातील एकदिवसीय मालिकेत एकूण 13 खेळाडू फिरकी गोलंदाजांविरुद्ध LBW आऊट झाले होते.
द्विपक्षीय एकदिवसीय मालिकेत फिरकी गोलंदाजांविरुद्ध सर्वाधिक LBW बाद :
- भारत विरुद्ध श्रीलंका (वर्ष 2024) - 18 विकेट्स LBW
- युएई विरुद्ध झिम्बाब्वे (2018) - 13 विकेट्स LBW
- पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका (2013) - 12 विकेट्स LBW
- पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड (2009) - 11 विकेट्स LBW
- बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान (2016) - 11 विकेट्स LBW
- दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (2018) - 11 विकेट्स LBW
हेही वाचा :
- यजमानच ठरले वरचढ! श्रीलंकेनं भारताला 32 धावांनी चारली धूळ, 'हिटमॅन'ची खेळी व्यर्थ - SL vs IND 2nd ODI
- 'हिटमॅन'नं दुसऱ्या वनडेत दोन धावा काढताच रचला इतिहास; 'द वॉल'ला टाकलं मागे - Rohit Sharma
- फिरकीपटूंच्या जाळ्यात अडकला भारतीय संघ; 1997 नंतर प्रथमच श्रीलंकेकडून भारताचा पराभव - India vs Sri lanka 3rd ODI