India vs Sri lanka 3rd T20 : भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना मंगळवारी (30 जुलै) पल्लेकेले येथे खेळण्यात आला. सुपर ओव्हरमध्ये पोहोचलेला सामना भारतानं जिंकून मालिका 3-0 अशा फरकानं खिशात घातली. हा सामना बरोबरीत सुटल्यामुळे सुपर ओव्हरनं विजयी संघाची निवड करण्यात आली.
3⃣-0⃣ 🙌@Sundarwashi5 with a 'super' over and Captain @surya_14kumar with the winning runs! 😎
— BCCI (@BCCI) July 30, 2024
Scorecard ▶️ https://t.co/UYBWDRh1op#SLvIND pic.twitter.com/KoNf4OFJHq
भारतानं श्रीलंकेवर सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेच्या संघानं भारताला विजयासाठी 3 धावांचं आव्हान दिलं होतं. कर्णधार सूर्यकुमारनं पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकून भारताला विजय मिळवून दिला.
When in need, call @rinkusingh235 🤙
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) July 30, 2024
Game-changing over 🤩🔥#SonySportsNetwork #SLvIND pic.twitter.com/aGjQNXamFp
भारताची फलंदाजी : नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघानं 20 षटकात 9 विकेट गमावत 137 धावा केल्या. यशस्वी जैस्वाल (10), संजू सॅमसन (0), रिंकू सिंग (1), सूर्यकुमार (8) आणि शिवम दुबे (13) हे फलंदाज अपयशी ठरले. भारतीय संघाची धावसंख्या 8.4 षटकात 5 विकेट 48 धावा होती. त्यानंतर शुभमन गिल आणि रियान पराग या दोघांनी डावाची धुरा सांभाळली. दोन्ही खेळाडूंनी सहाव्या विकेटसाठी 40 चेंडूत 54 धावांची भागीदारी केली. गिलनं 37 चेंडूत 39 धावा तर रियान परागनं 18 चेंडूत 26 धावांची खेळी खेळली. शेवटच्या षटकांमध्ये वॉशिंग्टन सुंदरनं 18 चेंडूत 25 धावा करत भारताचा विजय सोपा केला. श्रीलंकेकडून महिष तिक्षानानं 3 विकेट आणि वानिंदू हसरंगाने 2 विकेट घेतले.
Game-changing batting ✅
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) July 30, 2024
Game-changing bowling ✅@surya_14kumar bhau mann la 👏🙇♂️#SonySportsNetwork #SLvIND #TeamIndia #SuryakumarYadav pic.twitter.com/5G3PESMVY9
रिंकूची जबरदस्त गोलंदाजी : भारतानं दिलेल्या 138 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघांनं 18 व्या षटकापर्यंत सामन्यावर घट्ट पकड मिळवली होती. पाथुम निसांका 26 आणि कुसल मेंडीसच्या 43 धावांच्या जोरावर श्रीलंकेची विजयाच्या दिशेनं कूच सुरू होती. शेवटच्या 2 षटकांत श्रीलंकेला अवघ्या 9 धावांची गरज होती. मैदानात कुसल परेराची तडाखेबंद फलंदाजी सुरू होती. त्यामुळे श्रीलंकेला हा सामना सहज जिंकेल असं वाटत होतं. सूर्यानं 19 वे षटक रिंकू सिंहला दिले. सूर्याच्या या निर्णयामुळे सर्वांनाच धक्का बसला. रिंकूनं आपल्या षटकांत 3 धावांच्या मोबदल्यात 2 विकेट घेतल्या. त्यानं कुसल परेरा (46) रमेश मेंडीस (3) या दोघांना पवेलियनमध्ये पाठवलं.
First series in GG era 👉 𝐀 𝐂𝐥𝐞𝐚𝐧 𝐒𝐰𝐞𝐞𝐩 💙🇮🇳
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) July 30, 2024
𝐖𝐨𝐫𝐥𝐝 𝐂𝐡𝐚𝐦𝐩𝐢𝐨𝐧𝐬 for a reason 🤩🏆#SonySportsNetwork #SLvIND #TeamIndia pic.twitter.com/BgDnPULlyH
सुपर ओव्हरमुळे भारताचा विजय- श्रीलंकेला शेवटच्या षटकात 6 धावा करायच्या होत्या. सूर्यानं स्वत: शेवटचं षटक टाकायचा निर्णय घेतला. त्यानंही आपल्या षटकात 2 विकेट घेतल्या. कमिंडू मेंडीस (1) आणि महीश तीक्षणा (0) यांना त्यानं आऊट केलं. सामना शेवटच्या बॉलपर्यंत पोहचला तेव्हा श्रीलंकेला विजयासाठी 3 धावांची गरज होती. मात्र, श्रीलंकेच्या संघाने दोनच धावा केल्या. त्यामुळं सामना बरोबरीत सुटला. सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेच्या संघानं भारतासमोर 3 धावांचं लक्ष्य ठेवलं. त्यानंतर भारताकडून फलंदाजीसाठी आलेल्या सूर्यानं पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला.
𝙒𝙄𝙉𝙉𝙀𝙍𝙎!
— BCCI (@BCCI) July 30, 2024
Congratulations to the @surya_14kumar-led side on clinching the #SLvIND T20I series 3⃣-0⃣ 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/UYBWDRh1op#TeamIndia pic.twitter.com/h8mzFGpxf3
श्रीलंकेविरुद्ध भारताचा वरचष्मा : टी-20 फॉरमॅटमध्ये श्रीलंकेविरुद्ध भारतीय संघाचा नेहमीच वरचष्मा राहिला आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 32 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यात आले आहेत. यात भारतानं 22 सामने जिंकले तर श्रीलंकेनं 9 सामने जिंकले आहेत. तर एक सामना अनिर्णित राहिला.
दोन्ही संघ
- भारताचा संघ : यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रायन पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.
- श्रीलंकेचा संघ: पाथुम निसांका, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, चरित असलंका (कर्णधार), चामिंडू विक्रमसिंघे, वानिंदू हसरंगा, महिश तिक्षाना, मथिशा पाथिराना, असिथा फर्नांडो आणि रमेश मेंडिस.
हेही वाचा
- पॅरिस ऑलिम्पिकचा पाचवा दिवस; भारतीय खेळाडूंचं आजचं संपूर्ण वेळापत्रक, एका क्लिकवर - Paris Olympics 2024
- चक दे इंडिया! भारतीय हॉकी संघानं आयर्लंडचा 2-0 ने केला पराभव, हरमनप्रीत सिंगच्या गोलचा 'चौकार'! - Paris Olympics 2024
- आईनं दागिने गहाण ठेवून मुलीला दिलं पाठबळ; "तिनं" कुस्तीतं सुवर्णपदकाला घातली गवसणी - World Wrestling Championship
- "भारत खूप आनंदी आहे...", नेमबाजीत कांस्य पदक जिंकणाऱ्या मनू-सरबज्योतचं दिग्गजांकडून कौतुक - Paris Olympics 2024