पल्लेकेले IND vs SL 2nd T20I : भारत विरुद्ध श्रीलंका दुसरा टी-20 सामना पल्लेकेले स्टेडियमवर खेळण्यात आला. श्रीलंकेनं प्रथम फलंदाजी करत 162 धावांचं आव्हान भारताला दिलं. भारतीय संघ आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरल्यानंतर पावसानं बॅटिंगला सुरुवात केली. पावसाच्या व्यत्ययामुळे भारतासमोर डकवर्थ लुईस नियमानुसार 8 षटकात 78 धावांचं लक्ष्य ठेवण्यात आलं. भारतानं हे लक्ष्य सातव्या षटकाच्या आतच पूर्ण केलं. भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. टी-20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना मंगळवारी होणार आहे.
#TeamIndia complete a 7 wicket win over Sri Lanka in the 2nd T20I (DLS method) 🙌
— BCCI (@BCCI) July 28, 2024
They lead the 3 match series 2-0 👍
Scorecard ▶️ https://t.co/R4Ug6MQGYW#SLvIND pic.twitter.com/BfoEjBog4R
श्रीलंकेची खराब फलंदाजी : नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेच्या संघानं 9 विकेट गमावून 161 धावा केल्या. कुसल परेरानं संघाकडून 34 चेंडूत 54 धावांची खेळी केली. तर पथुम निसांकानं 32 आणि कामिंडू मेंडिसनंं 26 धावा केल्या. 15 षटकांत 130 धावांत 2 विकेट होत्या, तेव्हा श्रीलंकेचा संघ मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना दिसत होता. मात्र, स्टार वेगवान गोलंदाज अष्टपैलू हार्दिक पांड्यानं एकाच षटकात कामिंदू आणि परेरा यांना केलं. यानंतर पुढच्याच षटकात फिरकीपटू रवी बिश्नोईनं दासून शनाका आणि वानिंदू हसरंगा यांना शून्यावर बाद करत श्रीलंकेला बॅकफूटवर आणलं. श्रीलंकेची मधली फळी सपशेल अपयशी ठरली. बिश्नोईने 3 विकेट घेतल्या. तर पांड्या, अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंग यांना प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.
Updated Playing Conditions:
— BCCI (@BCCI) July 28, 2024
Resumption of Play: 10.45 PM IST
Overs: 8
Target for #TeamIndia: 78#SLvIND https://t.co/YwjBwpb0B4
सूर्या-पांड्या चमकला : भारतीय संघाकडून सलामीवीर यशस्वी जैस्वालनं 15 चेंडूत 30 धावा केल्या. तर कर्णधार सूर्यकुमार यादवनं 12 चेंडूत 26 आणि हार्दिक पांड्यानं 9 चेंडूत 22 धावा केल्या. या मालिकेतील पहिला सामना खेळणाऱ्या संजू सॅमसनला आपलं खातंही खोलता आलं नाही. श्रीलंकेकडून महिश तिक्शिना, मथिशा पाथिराना आणि वानिंदू हसरंगा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतला.
India ensure series victory with second win in a row 👊#SLvIND: https://t.co/ruw5VGncoa pic.twitter.com/YNmzxFIhI8
— ICC (@ICC) July 28, 2024
श्रीलंकेविरुद्ध भारताचा वरचष्मा : श्रीलंकेविरोधातील खेळण्यात येणाऱ्या सामन्यांमधील विक्रमांमध्ये भारतीय संघाचा वरचष्मा राहिला आहे. आत्तापर्यंत भारत आणि श्रीलंका यांच्यात 31 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यात आले आहेत. यात भारतानं 21 सामने तर श्रीलंकेनं 9 सामने जिंकले. तर एक सामना अनिर्णित राहिला.
India come back strong with the ball to restrict Sri Lanka 👏#SLvIND: https://t.co/9LAqRbB6pX pic.twitter.com/wtsvMWLI5B
— ICC (@ICC) July 28, 2024
दोन्ही संघ
- भारतीय संघ : यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रायन पराग, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई आणि मोहम्मद सिराज.
- श्रीलंकेचा संघ : पाथुम निसांका, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, चारिथ असलंका (कर्णधार), वानिंदू हसरंगा, दासुन शनाका, महिश तिक्षाना, मथिशा पाथिराना, असिथा फर्नांडो आणि रमेश मेंडिस.
हेही वाचा :