पल्लेकेले IND vs SL T20I : भारत आणि श्रीलंका क्रिकेट संघात आजपासून (27 जुलै) टी 20 मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघानं फलंदाजीनंतर गोलंदाजीत शानदार कामगिरी करत 43 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं 20 षटकांत 7 बाद 213 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ 170 धावांपर्यंत मजल मारु शकला. भारताकडून रियान परागनं सर्वाधिक 3 विकेट घेतल्या.
1ST T20I. India Won by 43 Run(s) https://t.co/Ccm4ubmWnj #SLvIND #1stT20I
— BCCI (@BCCI) July 27, 2024
सूर्याचं अर्धशतक : या सामन्यात भारतीय संघानं नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना 7 विकेट गमावत 213 धावा केल्या. पॉवरप्लेमध्ये यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांनी चांगली फलंदाजी केली आणि दोघांनी 6 षटकांत 74 धावांची भागीदारी केली. शुभमन गिलनं 16 चेंडूत 6 चौकार आणि एका षटकारासह 34 धावा केल्या. शुभमनला दिलशान मदुशंकानं बाद केलं. शुभमननंतर श्रीलंकेला वानिंदू हसरंगाच्या चेंडूवर यष्टिचित झालेल्या यशस्वीची विकेटही मिळाली. यशस्वीनं 21 चेंडूंत 5 चौकार आणि दोन षटकारांसह 41 धावा केल्या. तसंच भारतीय कर्णधार सूर्यकुमारनं 26 चेंडूत 58 धावा केल्या.
दोन्ही संघाचे नवे कर्णधार : टी 20 मालिकेतील सर्व सामने पल्लेकेले इथं होणार आहेत. यावेळी दोन्ही संघांचे कर्णधार नवीन आहेत. सूर्यकुमार यादव भारताचं कर्णधारपद भूषवत आहेत, तर चरिथ असालंका श्रीलंकेच्या टी 20 संघाचं नेतृत्व करत आहे. या मालिकेद्वारे भारतीय क्रिकेटमध्ये गौतम गंभीरच्या प्रशिक्षक युगाची सुरुवात होणार आहे.
कधी झाला पहिला टी 20 सामना : दोन्ही देशांमधला पहिला टी 20 आंतरराष्ट्रीय सामना 10 फेब्रुवारी 2009 रोजी कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला गेला. हा सामना भारतानं3 विकेटनं जिंकला होता. यात श्रीलंकेनं प्रथम खेळताना 4 बाद 171 धावा केल्या, प्रत्युत्तरात भारतानं 4 चेंडू शिल्लक असताना 7 बाद 174 धावा करुन हे लक्ष्य गाठलं.
श्रीलंकेची प्लेइंग इलेव्हन : पाथुम निसांका, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, चारिथ असलंका (कर्णधार), वानिंदू हसरंगा, दासुन शनाका, महिष तिक्षाना, मथिशा पाथिराना, असिथा फर्नांडो, दिलशान मदुशानका.
भारताची प्लेइंग इलेव्हन : शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रीयान पराग, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज.
हेही वाचा :