दुबई INDW vs NZW Live Streaming : भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ 2024 यांच्यात आज ICC महिला T20 विश्वचषकील चौथा सामना 4 सप्टेंबर (शुक्रवार) रोजी दुबई येथील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. हरमनप्रीत कौर भारतीय संघाचं नेतृत्व करेल तर सोफी डिव्हाईन न्यूझिलंडचं नेतृत्व करेल. दोन्ही संघ या सामन्यात विजय मिळवत स्पर्धेची विजयी सुरुवात करण्याचा प्रयत्न करतील.
Captains' Media Day ✅
— BCCI Women (@BCCIWomen) October 2, 2024
Joint Panel Session ✅
Photo-op ✅#T20WorldCup | #TeamIndia | #WomenInBlue | @ImHarmanpreet
📸: ICC pic.twitter.com/FgyLlYiN9f
भारताची मदार कोणत्या खेळाडूवर : भारताच्या महिला संघात कर्णधार हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना, दीप्ती शर्मा, शेफाली वर्मा, रेणुका सिंग ठाकूर आणि इतर अनेक प्रमुख खेळाडू आहेत. भारतीय संघ ICC महिला T20 विश्वचषक 2018 च्या अंतिम फेरीत आणि स्पर्धेच्या मागील आवृत्तीच्या उपांत्य फेरीत पोहोचला होता. भारतीय महिला संघाला हा सामना जिंकून आपल्या मोहिमेची विजयी सुरुवात करायची आहे.
न्यूझिलंड प्रबळ दावेदार : दुसरीकडे, न्यूझीलंड महिला संघात कर्णधार सोफी डिव्हाईन, सुझी बेट्स, अमेलिया केर आणि ली ताहुहू यांच्यासह अनेक प्रभावी खेळाडू आहेत. त्या आपल्या क्षमतेनुसार खेळून सामना जिंकेल, अशी आशा असेल. ICC महिला T20 विश्वचषक 2024 जिंकण्यासाठी न्यूझिलंड प्रबळ दावेदारांपैकी एक आहे, आणि आपल्या खेळीतून हा दावा आणखी मजबूत करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
A stern test for India and New Zealand as they open their Women's #T20WorldCup 2024 campaign 💥
— T20 World Cup (@T20WorldCup) October 3, 2024
ICC Digital Insider Sanjana Ganesan previews the much-awaited #INDvNZ contest 📽#WhateverItTakeshttps://t.co/fBkRRU1hDy
दोन्ही संघाचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : भारतीय महिला आणि न्यूझीलंड महिला T20I मध्ये आतापर्यंत 13 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यात 4 वेळा भारतानं विजय मिळवला आहे तर न्यूझीलंडनं नऊ सामने जिंकले आहेत. परिणामी दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा अपेक्षित आहे.
- ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा चौथा सामना भारत महिला विरुद्ध न्यूझिलंड महिला कधी खेळला जाईल?
ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा चौथा सामना भारत महिला विरुद्ध न्यूझिलंड महिला शुक्रवार, 4 ऑक्टोंबर रोजी होणार आहे.
The road to #T20WorldCup greatness begins today 🏆#WhateverItTakes pic.twitter.com/eWE5LO3ziu
— T20 World Cup (@T20WorldCup) October 3, 2024
- ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा चौथा सामना भारत महिला विरुद्ध न्यूझिलंड महिला कुठं खेळवला जाईल?
ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा चौथा सामना भारत महिला विरुद्ध न्यूझिलंड महिला दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई इथं होणार आहे.
- ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा चौथा सामना भारत महिला विरुद्ध न्यूझिलंड महिला किती वाजता सुरु होईल?
ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा चौथा सामना भारत महिला विरुद्ध न्यूझिलंड महिला भारतीय वेळेनुसार सायंकाळी 07:30 वाजता सुरु होईल.
- ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा चौथा सामना भारत महिला विरुद्ध न्यूझिलंड महिला टीव्हीवर कुठं पाहायचा?
ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा चौथा सामना भारत महिला विरुद्ध न्यूझिलंड महिला टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.
- ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा चौथा सामना भारत महिला विरुद्ध न्यूझिलंड महिला सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग कुठं पहायचं?
ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा चौथा सामना भारत महिला विरुद्ध न्यूझिलंड महिला सामन्याचं लाइव्ह स्ट्रीमिंग तुम्ही डिस्ने+हॉटस्टार ॲप आणि वेबसाइटवर पाहू शकाल.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन :
भारतीय महिला संघ : स्मृती मानधना, शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्ज, ऋचा घोष (यष्टिरक्षक), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, श्रेयंका पाटील, रेणुका सिंग ठाकूर.
न्यूझीलंड महिला संघ : सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, अमेलिया केर, सोफी डिव्हाईन (कर्णधार), ब्रुक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गेज (यष्टिरक्षक), हॅना रोवे, जेस केर, लेह कॅस्परेक, ली ताहुहू.
हेही वाचा :