बेंगळुरु IND vs NZ 1st Test Live Streaming : भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना आज बुधवार, 16 ऑक्टोबरपासून खेळवला जाणार आहे. उभय संघांमधील हा सामना बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे.
𝗜𝗻𝗱𝗶𝗮 𝘃𝘀 𝗡𝗲𝘄 𝗭𝗲𝗮𝗹𝗮𝗻𝗱
— BCCI (@BCCI) October 15, 2024
𝘛𝘩𝘦 𝘗𝘳𝘦𝘭𝘶𝘥𝘦 𝘣𝘺 𝘙 𝘈𝘴𝘩𝘸𝘪𝘯#TeamIndia 🇮🇳 is back in whites 🤍
One sleep away from Test No.1#INDvNZ | @IDFCFIRSTBank | @ashwinravi99 pic.twitter.com/lzVQCrtaLh
WTC गुणतालिकेत भारत पहिल्या स्थानावर : भारतीय संघानं अलीकडेच बांगलादेशचा दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत व्हाईटवॉश केला. यासह भारतीय संघाचे 11 सामन्यांत 8 विजय, 2 पराभव आणि एका अनिर्णित सामन्यासह 98 गुण आणि 74.24% असून जागतिक कसोटी चॅम्पियनशिप क्रमवारीत ते पहिल्या स्थानावर आहेत. अशा स्थितीत भारताला पहिल्या कसोटीत किवी संघाचा पराभव करुन मालिकेत 1-0 अशी आघाडी घेण्याची इच्छा असेल. दुसरीकडे, न्यूझीलंड संघाला अलीकडेच श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत दारुण पराभवाचा सामना करावा लागला. अशा परिस्थितीत पाहुण्या संघाला भारताविरुद्धचा पहिला कसोटी सामना जिंकायचा आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिप क्रमवारीत, किवी संघ 8 सामन्यांत 3 विजय आणि 5 पराभवांसह सहाव्या स्थानावर आहे. परिणामी दोन्ही संघांमध्ये रोमांचक कसोटी मालिका पाहायला मिळणार आहे.
खेळपट्टी कशी असेल : बेंगळुरुमधील एम चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियमच्या खेळपट्टीबद्दल सांगायचं तर, तिथं फलंदाजांना खूप मदत मिळते. येथील खेळपट्टी सपाट असणं अपेक्षित आहे. मात्र, इथल्या खेळपट्टीतून फिरकीपटूला नक्कीच मदत मिळते. याशिवाय वेगवान गोलंदाज या खेळपट्टीवर नव्या चेंडूनं काही विकेट्स नक्कीच घेऊ शकतात. न्यूझीलंडचा संघ भारताविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यासाठी श्रीलंका दौऱ्यावरुन आला आहे. श्रीलंकेविरुद्ध घरच्या मैदानावर न्यूझीलंडचा फॉर्म खराब होता. दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये किवी संघाला पराभवाचा सामना करावा लागला. अशा स्थितीत न्यूझीलंड भारताविरुद्ध पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. मात्र, न्यूझीलंडसाठी काहीही सोपे होणार नाही. बेंगळुरुमधील एम चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियमच्या खेळपट्टीबद्दल सांगायचं झालं तर, इथं फलंदाजांना खूप मदत मिळते. येथील खेळपट्टी सपाट असणं अपेक्षित आहे. मात्र, इथल्या खेळपट्टीतून फिरकीपटूलाही नक्कीच मदत मिळते. याशिवाय वेगवान गोलंदाज या खेळपट्टीवर नव्या चेंडूनं काही विकेट्स नक्कीच घेऊ शकतात.
📍 Bengaluru
— BCCI (@BCCI) October 14, 2024
The preps have begun for the #INDvNZ Test Series 💪#TeamIndia | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/z4d8WjzwGv
भारत आणि न्यूझीलंडचा हेड-टू-हेड कसोटी रेकॉर्ड कसा : पुढील 5 कसोटी सामने जिंकून भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना पुढील वर्षी 11 जून ते 15 जून दरम्यान लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळवला जाईल. जर आपण भारत आणि न्यूझीलंडच्या हेड टू हेड कसोटी रेकॉर्डबद्दल बोललो तर भारतीय संघाचा यात वरचष्मा दिसतो. वास्तविक, दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 62 कसोटी सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी 22 सामन्यांचा निकाल भारताच्या बाजूनं लागला आहे, तर केवळ 13 सामने न्यूझीलंडनं जिंकले आहेत. त्याचबरोबर 27 कसोटी सामन्यांचा निकाल अनिर्णित राहिला आहे.
घरच्या मैदानात भारताचं वर्चस्व : भारतानं न्यूझीलंडविरुद्ध घरच्या भूमीवर 17 कसोटी सामने जिंकले आहेत. तसंच भारतानं अद्याप घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या सर्व कसोटी मालिकेत भारतीय संघाचा वरचष्मा आहे. भारतानं न्यूझीलंडविरुद्ध 12 कसोटी मालिका जिंकल्या आहेत, तर किवी संघानं कसोटी मालिकेत 7 वेळा भारताचा पराभव केला आहे. यात जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या पहिल्या आवृत्तीच्या अंतिम सामन्याचाही समावेश आहे, ज्यात न्यूझीलंडनं इंग्लंडमध्ये भारताचा पराभव करुन प्रथमच जागतिक कसोटी चॅम्पियनशिप जिंकली होती.
It all starts next week in Bengaluru! LIVE scoring | https://t.co/uyqCWbRgMy #INDvNZ pic.twitter.com/nLRlpAJyKX
— BLACKCAPS (@BLACKCAPS) October 12, 2024
- भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना कधी होणार?
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना आज बुधवार 16 ऑक्टोबरपासून खेळवला जाणार आहे.
- भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना कुठं होणार आहे?
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना बेंगळुरुच्या एम चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियम खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी साडेनऊ वाजता सुरु होईल. त्याची नाणेफेक अर्धा तास आधी म्हणजे 9 वाजता होईल.
- भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचं थेट प्रक्षेपण कुठं पहता येईल?
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचं थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर पाहता येईल.
- भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग कुठं दिसेल?
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा ॲपवर केलं जाईल. याशिवाय, तुम्हाला ईटीव्ही भारतवर पहिल्या कसोटीशी संबंधित अपडेट्स क्षणोक्षणी मिळतील.
Rainy day indoor net sessions in Bengaluru 🏏#INDvNZ #CricketNation
— BLACKCAPS (@BLACKCAPS) October 15, 2024
📸 BCCI pic.twitter.com/VTDyb59VS0
मालिकेसाठी न्यूझीलंडचा कसोटी संघ : भारतीय दौऱ्यासाठी न्यूझीलंडच्या कसोटी संघाबद्दल बोलायचं तर त्यात टॉम लॅथम (कर्णधार), टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), मायकेल ब्रेसवेल (पहिल्या कसोटीसाठी), मार्क चॅपमन, डेव्हन कॉनवे, मॅट हेन्री, डॅरिल मिशेल, विल्यम ओ'रुर्के यांचा समावेश आहे. तसंच एजाज पटेल, मिचेल सँटनर, बेन सियर्स, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, ईश सोधी, टिम साऊदी, केन विल्यमसन आणि विल यंग यांनाही संघात स्थान मिळालं आहे.
भारताचा कसोटी संघ : जर भारतीय संघाच्या कसोटी संघाबद्दल बोलायचं झालं तर, रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि आकाशदीप.
हेही वाचा :