ETV Bharat / sports

बांगलादेश इतिहास रचणार की भारत विजयी मालिका कायम राखणार की? 'इथं' पाहा लाईव्ह मॅच - IND vs BAN 2nd Test Live Streaming

IND vs BAN 2nd Test Live Streaming Free : भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिका 19 सप्टेंबरपासून सुरु झाली आहे. या मालिकेत एकूण दोन सामने खेळवले जाणार आहेत. यातील दुसरा कसोटी सामना आजपासून सुरु होत आहे. या मालिकेत भारतीय संघ 1-0 नं आघाडीवर आहे

IND vs BAN 2nd Test Live
IND vs BAN 2nd Test Live (Getty Images)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Sep 26, 2024, 5:31 PM IST

कानपूर IND vs BAN 2nd Test Live Streaming Free : भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दुसरा कसोटी सामना 26 सप्टेंबर रोजी ग्रीन पार्क स्टेडियम, कानपूर इथं खेळवला जाईल. भारतीय संघानं पहिल्या कसोटीत बांगलादेशचा 280 धावांनी पराभव केला. भारतीय संघानं बांगलादेशला 515 धावांचं लक्ष्य दिलं होतं. प्रत्युत्तरात पाहुण्या संघाचा डाव 234 धावांत गारद झाला. यासह भारतीय संघानं दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. अशा स्थितीत भारतीय संघाची नजर दुसरी कसोटी जिंकून मालिका काबीज करण्यावर असेल. दुसरीकडे बांगलादेशचा संघ मालिकेत 1-1 अशी बरोबरी करण्याच्या इराद्यानं मैदानात उतरणार आहे. मात्र, भारताला पराभूत करणं बांगलादेशसाठी इतकं सोपं नसेल.

कानपूरच्या मैदानावर फिरकीपटूंना मिळते मदत : कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियममध्ये फिरकीपटूंना नेहमीच मदत मिळत असते. यावेळीही असंच काहीसं अपेक्षित आहे. या मैदानावर सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या टॉप-7 गोलंदाजांमध्ये फक्त 6 फिरकीपटू होते. या सर्वांची सरासरीही मजबूत झाली आहे. अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग यांनी इथं सर्वाधिक बळी घेतले आहेत.

कशी असेल भारताची प्लेइंग इलेव्हन : यावेळीही ग्रीन पार्कच्या खेळपट्टीच्या अहवालात असं सांगण्यात आलं आहे की, इथं चेंडू संथ असेल आणि तो कमी वळणारा ट्रॅक असेल. अशा परिस्थितीत भारतीय कर्णधार एकतर 4 फिरकीपटू आणि 2 वेगवान गोलंदाजांसह जाऊ शकतो. या फिरकीपटूंमध्ये रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल हे फलंदाजी करण्यास सक्षम आहेत. अश्विननं पहिल्या कसोटीतही शतक झळकावलं होतं. तसंच संघ व्यवस्थापन अक्षर पटेलला विश्रांती देऊन कुलदीप यादवला संधी देऊ शकतो. याचं कारण अक्षर आणि जडेजा हे सारखेच फिरकीपटू आहेत. या संयोजनामुळं भारतीय संघ अधिक मजबूत होईल.

  • भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात दुसरा कसोटी सामना कधी होणार?

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना शुक्रवार 27 सप्टेंबरपासून खेळवला जाणार आहे.

  • भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना कुठं होणार आहे?

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी साडेनऊ वाजता सुरु होईल.

  • भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटीचं थेट प्रक्षेपण कुठं पहावं?

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटीचं थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर केलं जाईल.

  • भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटीचं लाइव्ह स्ट्रीमिंग कुठं पहावं?

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटीचं लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा ॲपवर केलं जाईल. याशिवाय, तुम्हाला ईटीव्ही भारतवर पहिल्या कसोटीशी संबंधित अपडेट्स क्षणोक्षणी मिळतील.

कसोटी मालिकेसाठी भारत-बांगलादेश संघ :

बांगलादेशचा संघ : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटन दास, मेहदी हसन मिराज, झाकीर अली, तस्किन अहमद, हसन महमूद, नाहिद राणा, तैजुल इस्लाम, महमुदुल हसन. , नईम हसन आणि खालिद अहमद.

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज , आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.

हेही वाचा :

  1. 5447 चेंडू, 1981 धावा... इतिहासातील सर्वात लांब कसोटी सामना, 12 दिवसानंतरही लागला नव्हता निकाल - Timeless Test
  2. कुलदीप की अक्षर...? दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात 'ग्रीन पार्क'वर कोणाला मिळणार संधी, समोर आली मोठी अपडेट - IND vs BAN 2nd Test Playing 11

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.