मुंबई India Tour of Sri Lanka : आयसीसी टी 20 विश्वचषक 2024 संपल्यानंतर, भारतीय क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर आहे. तिथं ते 5 सामन्यांची टी 20 मालिका खेळत आहे. झिम्बाब्वे नंतर, भारतीय संघाला या महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जायचं आहे. त्या दौऱ्यात त्यांना प्रत्येकी 3 सामन्यांची टी 20 आणि एकदिवसीय मालिका खेळायची आहे. भारताचा श्रीलंका दौरा यापूर्वी 26 जुलैपासून सुरु होणार होता, मात्र बीसीसीआयनं आता त्यात बदल केला आहे.
UPDATE 🚨
— BCCI (@BCCI) July 13, 2024
A look at the revised schedule for #TeamIndia's upcoming tour of Sri Lanka #SLvIND pic.twitter.com/HLoTTorOV7
नवीन वेळापत्रक काय : सुधारित वेळापत्रकानुसार आता भारतीय संघ 27 जुलैपासून या दौऱ्याला सुरुवात करणार आहे. आधी भारत आणि श्रीलंका यांच्यात 3 सामन्यांची टी 20 मालिका खेळवली जाईल. हे सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजल्यापासून पल्लेकेले इथं खेळवले जातील. यानंतर दोन्ही संघांमध्ये 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे. पहिला एकदिवसीय सामना 2 ऑगस्ट रोजी होणार आहे. या मालिकेतील सर्व एकदिवसीय सामने श्रीलंकेची राजधानी कोलंबो इथं खेळवले जातील. 50-50 षटकांचे हे एकदिवसीय सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 पासून खेळवले जातील.
गंभीर युगाची होणार सुरुवात : गेल्या महिन्यात भारतीय संघानं रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टी 20 विश्वचषक जिंकला होता. या स्पर्धेनंतरच राहुल द्रविडचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला. अशा परिस्थितीत भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) माजी सलामीवीर गौतम गंभीरची नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. आता या दौऱ्यापासूनच गंभीर त्याच्या कोचिंगला सुरुवात करणार आहे.
या दौऱ्यावर कोण असेल संघाचा कर्णधार : श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झालेली नाही. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील आठवड्यात संघाची घोषणा केली जाईल. या दौऱ्यासाठी भारतीय टी 20 संघाचं कर्णधारपद हार्दिक पांड्याकडं सोपवलं जाऊ शकते. तर एकदिवसीय संघाची कमान केएल राहुलकडे दिली जाऊ शकते. रोहित या दौऱ्यातून विश्रांती घेऊ शक्यता आहे. तर विश्वचषकानंतरच त्यानं टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. अशा परिस्थितीत हार्दिक टी 20 आणि केएल राहुल एकदिवसीयमध्ये कर्णधार होऊ शकतो.
भारत-श्रीलंका नवीन वेळापत्रक :
- 27 जुलै - पहिला टी 20, पल्लेकेले
- 28 जुलै - दुसरा टी 20, पल्लेकेले
- 30 जुलै - तिसरा टी 20, पल्लेकेले
- 2 ऑगस्ट - पहिला वनडे, कोलंबो
- 4 ऑगस्ट - दुसरा वनडे, कोलंबो
- 7 ऑगस्ट - तिसरा वनडे, कोलंबो
हेही वाचा :