ETV Bharat / sports

सुनील छेत्रीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा! कारकीर्दीतील सुवर्ण क्षणांवर टाकूया एक नजर... - Sunil Chhetri Retirement - SUNIL CHHETRI RETIREMENT

Sunil Chhetri Retirement : भारतीय फुटबॉलची ओळख असलेल्या 39 वर्षीय छेत्रीच्या निवृत्तीमुळं भारतीय फुटबॉलमध्ये एक पोकळी निर्माण होईल. सुनील छेत्रीच्या कारकिर्दीतील काही सोनेरी क्षणांवर एक नजर.

Sunil Chhetri Retirement
Sunil Chhetri Retirement (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 7, 2024, 1:00 PM IST

Sunil Chhetri Retirement : फिफा विश्वचषक पात्रता फेरीचा सामना भारत आणि कुवेत यांच्यात गुरुवारी सॉल्ट लेक स्टेडियमवर खेळला गेला. हा सामना 0-0 असा बरोबरीत संपला. भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री याच्या कारकिर्दीतील हा शेवटचा सामना होता. सुनील छेत्रीनं या सामन्यापूर्वीच घोषणा केली होती की, हा त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असेल. 39 वर्षीय सुनील छेत्रीच्या निवृत्तीमुळं भारतीय फुटबॉलमध्ये एक पोकळी निर्माण होईल.

भारताच्या अडचणी वाढल्या : या सामन्यात पहिल्या आणि दुसऱ्या हाफमध्ये भारताला गोल करण्याच्या अनेक संधी मिळाल्या. मात्र एकाही संधीचा फायदा भारताला मिळवता आला नाही. अंतिम-18 मध्ये जाण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं गरजेचं होतं. मात्र भारत अजूनही पुढच्या फेरीत जाऊ शकतो, पण त्यासाठी पुढील सामन्यांवर अवलंबून राहावं लागणार आहे. भारताचा आता 11 जून रोजी क्वालिफायरच्या दुसऱ्या फेरीतील अंतिम सामना कतारशी होणार आहे.

सुनील छेत्रीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द : सुनील छेत्रीनं या सामन्यासह आपल्या 19 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला अलविदा केलाय. त्यानं भारतासाठी 94 गोल केलेत. पोर्तुगालचा सुपरस्टार क्रिस्टियानो रोनाल्डो (128), इराणचा दिग्गज अली दाई (108) आणि अर्जेंटिनाचा करिष्माई खेळाडू लिओनेल मेस्सी (106) नंतर तो आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे. भारतासाठी सर्वाधिक सामने खेळण्याचा आणि सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. आजपर्यंतच्या इतिहासात भारतीय संघासाठी सर्वाधिक 4 हॅटट्रिक करणारा तो एकमेव खेळाडू आहे. 2011 मध्ये त्याला अर्जुन पुरस्कारानं तर 2019 मध्ये त्याला पद्मश्री या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलय.

पाणावलेल्या डोळ्यांनी निरोप : सुनील छेत्रीला निरोप देण्यासाठी हजारो प्रेक्षक स्टेडियमवर पोहोचले होते. सुनील छेत्रीचा शेवटचा सामना असल्यामुळं त्याला पाहण्याठी संपूर्ण स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरलं होतं. सामना संपल्यानंतर सुनील छेत्रीचा सत्कार करण्यात आला. यादरम्यान तो भावूकही झाला. त्याचे वडील खरगा आणि आई सुशीला आणि पत्नी सोनम भट्टाचार्य यांच्याशिवाय अनेक अधिकारी आणि माजी खेळाडूही स्टेडियमवर उपस्थित होते.

या लीगमध्ये खेळणार : शेवटच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात सुनील छेत्रीला एकही गोल करता आला नाही. मात्र, सुनील छेत्री क्लब फुटबॉल खेळणं सुरूच ठेवणार आहे. इंडियन सुपर लीग संघ बेंगळुरू एफसीसोबत 2025 वर्षापर्यंत त्याचा करार आहे. सुनील छेत्रीनं 12 जून 2005 रोजी क्वेटा येथे पाकिस्तानविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला. तो सामना 1-1 असा बरोबरीत संपला. त्या सामन्यात सुनील छेत्रीनं एक गोल केला होता.

सचिन तेंडुलकरचं ट्विट : सुनील छेत्रीच्या निवृत्तीवर प्रतिक्रिया देताना क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरनं ट्विट केलं की, ''कोणतेही ध्येय गाठणं सोपं नसतं. 94 आंतरराष्ट्रीय गोल करणं ही फार मोठी गोष्ट आहे. सुनील छेत्री तुम्ही भारताचा झेंडा कायम उंच ठेवलाय. अप्रतिम कारकीर्दीबद्दल अभिनंदन!”

16 मे रोजी निवृत्तीची घोषणा - 16 मे रोजी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत सुनील छेत्रीनं निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानं 9 मिनिटांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये सुनील छेत्रीनं पदार्पणाच्या सामन्याची आठवण काढली होती.

हेही वाचा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.