अल अमेरत IND A vs UAE Liev Streaming : ACC पुरुष T20 इमर्जिंग टीम्स आशिया कप स्पर्धेचा आठवा सामना आज भारत A राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध UAE राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात खेळवला जाईल. उभय संघांमधील हा सामना अल अमेरत येथील अल अमेरत क्रिकेट मैदानावर खेळवला जाईल.
India ‘A’ clinched victory against Pakistan ‘A’ by 7 runs in a nail-biting match! A thrilling finish that kept everyone on the edge till the last ball! 🙌🥶#MensT20EmergingTeamsAsiaCup #ACC pic.twitter.com/OgCzabLrzs
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) October 19, 2024
भारत अ संघाची शानदार सुरुवात : भारत अ संघानं या स्पर्धेत शानदार सुरुवात केली आहे. भारत अ संघानं पहिल्या सामन्यात पाकिस्तान अ संघाचा 7 धावांनी पराभव केला. अशा स्थितीत भारत अ संघाला दुसऱ्या सामन्यात यूएईचा पराभव करुन दुसरा विजय नोंदवायचा आहे. दुसरीकडे, संयुक्त अरब अमिरातीनंही पहिल्या सामन्यात ओमानचा 4 विकेट राखून पराभव करत पहिला विजय नोंदवला. अशा स्थितीत यूएई संघ भारत अ संघाला कडवे आव्हान देण्याचा प्रयत्न करत आणखी एक विजय नोंदवण्याच्या प्रयत्नात असेल. त्यामुळं दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे.
तिलक वर्मा करणार भारताचं नेतृत्त्व : रमणदीप सिंग, नेहल वढेरा, अभिषेक शर्मा, आयुष बडोनी, अनुज रावत, साई किशोर आणि राहुल चहर हे स्टार खेळाडूंनी भरलेल्या भारत अ संघाचं नेतृत्व करताना तिलक वर्मा दिसणार आहेत. 2023 मधील स्पर्धेच्या मागील आवृत्तीत, अंतिम फेरीत पाकिस्ताननं भारताचा 128 धावांनी पराभव केला होता.
स्पर्धेत किती संघ सहभागी : यावेळी इमर्जिंग आशिया चषक T20 फॉरमॅटमध्ये खेळवला जात आहे, ज्यात भारत आणि पाकिस्तानच्या अ संघांव्यतिरिक्त हाँगकाँग, ओमान, अफगाणिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि यूएईचे संघही सहभागी होत आहेत. यावेळी भारतीय अ संघाला स्पर्धेत अ गटात स्थान मिळालं असून त्यात पाकिस्तान व्यतिरिक्त यूएई आणि ओमानचे संघही सहभागी आहेत.
भारत A विरुद्ध युएई सामना कधी आणि कुठं खेळवला जाईल?
भारत A विरुद्ध युएई इमर्जिंग टीम्स आशिया चषकाचा आठवा सामना 21 ऑक्टोबर (सोमवार) रोजी अल अमेरत क्रिकेट ग्राउंड इथं भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:00 वाजता खेळवला जाईल. ज्याची नाणेफेक संध्याकाळी 06.30 वाजता होईल.
भारत A विरुद्ध युएई सामन्याचं थेट प्रक्षेपण कुठं पहावं?
स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे ACC पुरुष T20 इमर्जिंग आशिया कप 2024 चे प्रसारण हक्क आहेत. जे आपल्या टीव्ही चॅनल स्टार स्पोर्ट्स 1 वर भारत A विरुद्ध युएई सामन्याचे थेट प्रक्षेपण प्रदान करेल. जिथे चाहत्यांना सामन्याचा आनंद लुटता येणार आहे.
भारत A विरुद्ध युएई सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग कसं पहावं?
भारत A विरुद्ध युएई सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग FanCode च्या ॲप आणि ब्राउझरवर पाहू शकतात. याशिवाय तुम्ही तुमच्या स्मार्ट टीव्हीवर फॅनकोड ॲपवरही हा सामना पाहू शकता.
सामन्यासाठी दोन्ही संघ :
भारत अ : तिलक वर्मा (कर्णधार), अभिषेक शर्मा, आयुष बडोनी, निशांत सिंधू, रमणदीप सिंग, अनुज रावत, प्रभ सिमरन सिंग, नेहल वढेरा, अंशुल कंबोज, हृतिक शौकीन, आकिब खान, वैभव अरोरा, रसिक सलाम, साई किशोर, राहुल चहर
यूएई : तनिश सुरी, मयंक राजेश कुमार, विष्णू सुकुमारन, राहुल चोप्रा, सय्यद हैदर शाह (कर्णधार), बासिल हमीद (यष्टिरक्षक), नीलांश केसवानी, संचित शर्मा, मुहम्मद फारूख, मुहम्मद जवादुल्ला, ओमिद रहमान, अंश टंडन, ध्रुव पराशर , आर्यांश शर्मा, अकिफ राजा
हेही वाचा :