ETV Bharat / sports

शुभमन गिलचं टीकाकारांना जोरदार उत्तर, पठ्ठ्यानं शतकचं ठोकलं!

Ind Vs Eng Test : इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताची सुरुवात खराब झाली. रोहित शर्मा 13 तर यशस्वी जयस्वाल 17 धावा करून बाद झाला. मात्र यानंतर शुभमन गिल आणि श्रेयस अय्यरनं भारताचा डाव सांभाळला. गिलनं आज कसोटी करियरचं तिसरं शतक साजरं केलं. तो सध्या 141 चेंडूत 102 धावांवर खेळतोय. भारताच्या 55 षटकात 4 बाद 209 धावा झाल्या आहेत. टीम इंडियाकडे सध्या 352 धावांची आघाडी आहे.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 4, 2024, 10:15 AM IST

Updated : Feb 4, 2024, 1:33 PM IST

Ind Vs Eng Test
Ind Vs Eng Test

विशाखापट्टणम Ind Vs Eng Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात विशाखापट्टणम येथील डॉ.वाय.एस. राजशेखर क्रिकेट स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. आज सामन्याचा तिसरा दिवस आहे. भारतानं पहिल्या डावात 396 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, इंग्लंडला पहिल्या डावात 253 धावाच करता आल्या. दुसऱ्या डावात दुसऱ्या दिवसअखेर भारतानं एकही विकेट न गमावता 28 धावा केल्या होत्या. दिवसाअखेर भारताकडे 171 धावांची आघाडी होती.

दिवस 3, पहिलं सत्र : रोहित शर्मा (13) आणि यशस्वी जैस्वाल (15) यांनी भारतासाठी तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. भारतासाठी दिवसाची सुरुवात खराब झाली. जेम्स अँडरसननं प्रथम रोहित शर्माला 13 धावांवर आणि नंतर यशस्वी जयस्वालला 17 धावांवर बाद केलं. सध्या श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल क्रिजवर आहेत.

यशस्वी जयस्वालचं द्विशतक : यशस्वी जयस्वालनं पहिल्या डावात द्विशतक झळकावलंय. त्यानं 290 चेंडूत 19 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीनं 209 धावांची स्फोटक खेळी केली. जसप्रीत बुमराहनं पहिल्या डावात शानदार गोलंदाजी करत 6 बळी घेतले. या सामन्यात त्यानं 150 वी कसोटी विकेटही घेतली.

दोन्ही संघाची प्लेइंग 11 :

भारत - रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, केएस भरत, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मुकेश कुमार.

इंग्लंड - जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फॉक्स, रेहान अहमद, टॉम हार्टले, शोएब बशीर, जेम्स अँडरसन.

हे वाचलंत का :

  1. जैस्वालच्या द्विशतकानंतर बुमराहची 'यशस्वी' गोलंदाजी; दुसऱ्या दिवसअखेर भारतीय संघाकडं भक्कम आघाडी
  2. अंडर 19 विश्वचषक क्रिकेट; भारताचा नेपाळवर मोठा विजय, उपांत्य फेरीत दिमाखात एन्ट्री
  3. इंग्लंडविरुद्ध यशस्वी जयस्वालचं शानदार द्विशतक, मोडला 'हा' रेकॉर्ड

Last Updated : Feb 4, 2024, 1:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.