ETV Bharat / sports

महिला टी-20 विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीर; 'या' तारखेला भिडणार भारत-पाकिस्तान - ICC Womens T20 World Cup 2024

ICC Womens T20 World Cup : यंदाचा आयसीसी महिला टी-20 विश्वचषक बांगलादेशमध्ये खेळवला जाणार आहे. त्याचं वेळापत्रक आयसीसीनं जाहीर केलंय. 3 ऑक्टोबरपासून या स्पर्धेची सुरुवात होणार आहे.

सहा वेळचा विश्वविजेता ऑस्ट्रेलियन संघ
सहा वेळचा विश्वविजेता ऑस्ट्रेलियन संघ (Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 5, 2024, 4:11 PM IST

दुबई ICC Womens T20 World Cup : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) महिला टी-20 विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीर केलंय. यावेळी बांगलादेशमध्ये महिला टी-20 विश्वचषक खेळवला जाणार आहे. या विश्वचषकाचा सलामीचा सामना 3 ऑक्टोबरला इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. तर सहा वेळचा विश्वविजेता ऑस्ट्रेलियन संघ क्वालिफायर-1 विरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल.

भारतीय महिला संघाचा अ गटात समावेश : या स्पर्धेत भारताला अ गटात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि क्वालिफायर-1 यांच्यासोबत ठेवण्यात आलंय. तर ब गटात दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि क्वालिफायर-2 हे संघ आहेत. ऑस्ट्रेलियानं गेल्या वर्षी केपटाऊनमध्ये यजमान दक्षिण आफ्रिकेचा पराभव करुन विक्रमी सहाव्यांदा विजेतेपद पटकावलं होतं. 2020 मध्ये भारतीय संघाची सर्वोत्तम कामगिरी राहिली होती, जेव्हा ते अंतिम फेरीत पोहोचण्यात यशस्वी ठरले होते.

भारतीय संघाचे सामने कधी : भारतीय महिला संघ 4 ऑक्टोबरला सिलहट इथं न्यूझीलंडविरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे. नंतर 6 ऑक्टोबरला त्यांचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. त्यानंतर 9 ऑक्टोबरला त्यांचा सामना क्वालिफायर-1 शी होणार आहे. भारताचा शेवटचा गट सामना 13 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. भारतीय संघ आपले सर्व गट सामने सिलहटमध्ये खेळणार आहे.

प्रत्येक संघ खेळणार चार गट सामने : या स्पर्धेत प्रत्येक संघ चार गट सामने खेळणार आहे. यानंतर दोन्ही गटातील अव्वल 2 संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. उपांत्य फेरीचे सामने 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी होणार आहेत. अंतिम सामना 20 ऑक्टोबर रोजी ढाका इथं होणार आहे. एकूण 19 दिवसांत 23 सामने खेळले जातील, जे ढाका आणि सिलहट इथं होणार आहेत. उपांत्य आणि अंतिम सामन्यांसाठीही राखीव दिवस असेल.

महिला टी-20 विश्वचषकाचं वेळापत्रक :

  • 3 ऑक्टोबर : इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ढाका
  • 3 ऑक्टोबर : बांगलादेश विरुद्ध क्वालिफायर-2, ढाका
  • 4 ऑक्टोबर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध क्वालिफायर-1, सिलहट
  • 4 ऑक्टोबर : भारत विरुद्ध न्यूझीलंड, सिलहट
  • 5 ऑक्टोबर : दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज, ढाका
  • 5 ऑक्टोबर : बांगलादेश विरुद्ध इंग्लंड, ढाका
  • 6 ऑक्टोबर : न्यूझीलंड विरुद्ध क्वालिफायर-1, सिलहट
  • 6 ऑक्टोबर : भारत विरुद्ध पाकिस्तान, सिलहट
  • 7 ऑक्टोबर : वेस्ट इंडिज विरुद्ध क्वालिफायर-2, ढाका
  • 8 ऑक्टोबर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान, सिलहट
  • 9 ऑक्टोबर : बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज, ढाका
  • 9 ऑक्टोबर : भारत विरुद्ध क्वालिफायर-1, सिलहट
  • 10 ऑक्टोबर : दक्षिण आफ्रिका विरुद्ध क्वालिफायर-2, ढाका
  • 11 ऑक्टोबर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड, सिलहट
  • 11 ऑक्टोबर : पाकिस्तान विरुद्ध क्वालिफायर-1, सिलहट
  • 12 ऑक्टोबर : इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज, ढाका
  • 12 ऑक्टोबर : बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ढाका
  • 13 ऑक्टोबर : पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, सिलहट
  • 13 ऑक्टोबर : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, सिलहट
  • 14 ऑक्टोबर : इंग्लंड विरुद्ध क्वालिफायर-2, ढाका
  • 17 ऑक्टोबर : पहिला उपांत्य सामना, सिलहट
  • 18 ऑक्टोबर : दुसरा उपांत्य सामना, ढाका
  • 20 ऑक्टोबर : अंतिम सामना, ढाका

हेही वाचा :

  1. सात दिवसांत बंगळुरुकडून गुजरात दुसऱ्यांदा पराभूत; आरसीबीचं स्पर्धेतील आव्हान जिवंत - RCB vs GT
  2. भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का; कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थान गमावलं, कोणत्या संघानं केला अव्वल स्थानावर कब्जा? - ICC Rankings

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.