जेद्दाह IPL Mega Auction 2025 : सौदी अरेबियातील जेद्दाह इथं 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या IPL मेगा लिलावात एकूण 574 खेळाडू सहभागी होणार आहेत. यापैकी 366 भारतीय आणि 208 परदेशी आहेत, ज्यात सहयोगी संघातील तीन खेळाडूंचा समावेश आहे. तर 330 अनकॅप्ड खेळाडूंपैकी 318 भारतीय आणि 12 परदेशी आहेत. एकूण 204 स्लॉट भरायचे आहेत, त्यापैकी 70 परदेशी खेळाडूंसाठी उपलब्ध आहेत. यावेळी सौदीतील खेळाडूंवर पैशांचा मोठा वर्षाव होणार आहे.
A look at the Total Money Spent in #TATAIPL Auction 🔨 each season 💰
— IndianPremierLeague (@IPL) November 17, 2024
What will the amount be this time around 🤔 pic.twitter.com/bxkwLfNUqI
5 संघ कर्णधाराच्या शोधात : यावेळी श्रेयस अय्यर, केएल राहुल, अर्शदीप सिंग आणि ऋषभ पंत या खेळाडूंचा लिलावात समावेश आहे. यामुळं ते अधिकच मनोरंजक बनलं आहे. तसंच 5 IPL संघांची नजर लिलावात कर्णधारावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, पंजाब किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाइट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या संघांमध्ये सध्या कर्णधार नाही.
यावेळी लिलावात किंमत किती : यावेळी आयपीएल मेगा लिलावात 641 कोटी रुपये पणाला लागणार आहेत. 2022 मध्ये आयपीएल लिलावात संघांनी सर्वाधिक खर्च केला होता. तेव्हा मेगा लिलावात खेळाडूंच्या खरेदीसाठी 551.7 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.
लिलावात कोणत्या वर्षी किती रुपये खर्च झाले?
- 2008- 36.43 दशलक्ष अमेरिकन डॉलर
- 2009- 7.65 दशलक्ष अमेरिकन डॉलर
- 2010- 3.65 दशलक्ष अमेरिकन डॉलर
- 2011- 62.775 दशलक्ष अमेरिकन डॉलर
- 2012- 10.995 दशलक्ष अमेरिकन डॉलर
- 2013- 11.885 दशलक्ष अमेरिकन डॉलर
- 2014- 262.6 कोटी रुपये
- 2015- 87.6 कोटी रुपये
- 2016- 136 कोटी रुपये
- 2017- 91 कोटी रुपये
- 2018- 431 कोटी रुपये
- 2019- 106.8 कोटी रुपये
- 2020- 140.3 कोटी रुपये
- 2021- 145.3 कोटी रुपये
- 2022- 551.7 कोटी रुपये
- 2023- 167 कोटी रुपये
- 2024- 230.45 कोटी रुपये
पंजाबकडे सर्वाधिक रुपये शिल्लक : पंजाब किंग्सकडे सर्वाधिक रुपये शिल्लक आहे. त्यांच्या पर्समध्ये 110.5 कोटी रुपये आहेत. प्रत्येक संघाकडे खेळाडूंना खरेदी करण्यासाठी किंवा कायम ठेवण्यासाठी एकूण 120 कोटी रुपये आहेत. यातील काही रुपये आयपीएल 2025 च्या लिलावापूर्वी खेळाडूंना कायम ठेवण्यात खर्च करण्यात आले आहे.
मेगा लिलावासाठी कोणत्या संघाच्या पर्समध्ये किती पैसे आहेत?
- पंजाब किंग्स - 110.5 कोटी रुपये
- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु - 83 कोटी रुपये
- दिल्ली कॅपिटल्स - 73 कोटी रुपये
- गुजरात टायटन्स - 69 कोटी रुपये
- लखनौ सुपर जायंट्स - 69 कोटी रुपये
- चेन्नई सुपर किंग्ज - 55 कोटी रुपये
- मुंबई इंडियन्स - 45 कोटी रुपये
- कोलकाता नाईट रायडर्स - 51 कोटी रुपये
- सनरायझर्स हैदराबाद - 45 कोटी रुपये
- राजस्थान रॉयल्स - 41 कोटी रुपये
खेळाडूंसाठी किती स्लॉट उपलब्ध आहेत?
प्रत्येक फ्रेंचायझी संघात जास्तीत जास्त 25 खेळाडू असू शकतात. संघातील खेळाडूंची किमान संख्या 18 आहे. एकूण दहा संघ आहेत. त्यामुळं एकूण जास्तीत जास्त 250 खेळाडू असू शकतात. संघांनी आधीच 46 खेळाडू राखून ठेवले आहेत, जास्तीत जास्त 204 स्लॉट सोडले आहेत जे IPL लिलावादरम्यान भरले जाऊ शकतात. प्रत्येक संघात जास्तीत जास्त आठ विदेशी खेळाडू असू शकतात, त्यामुळं लिलावात परदेशी खेळाडूंसाठी 70 स्लॉट आहेत.
हेही वाचा :