क्राइस्टचर्च Harry Brook Record : न्यूझीलंड आणि इंग्लंड क्रिकेट संघ यांच्यात क्राइस्टचर्च इथं खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी हॅरी ब्रूकनं शानदार शतक झळकावलं. हॅरी ब्रूकनं 123 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं आपलं शतक पूर्ण केलं, जे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 7 वं शतक आहे. त्यानं चौकारासह आपलं शतक पूर्ण केलं.
Test ton No.7 for Harry Brook 💪#WTC25 | 📝 #NZvENG: https://t.co/VTgZ8Nxc3q pic.twitter.com/9kfaUuRIQd
— ICC (@ICC) November 29, 2024
अडचणीच्या वेळी आला फलंदाजीला : पहिल्या डावात इंग्लंडची धावसंख्या 45 धावांत 3 विकेट्स अशी दयनीय असताना ब्रूक फलंदाजीसाठी मैदानात आला. सलामीवीर जॅक क्रॉली (0), जेकब बेथेल (10) आणि जो रुट (0) पॅव्हेलियनमध्ये परतले होते. यानंतर हॅरी ब्रूक मैदानात उतरला आणि त्यानं बेन डकेटसोबत चौथ्या विकेटसाठी 26 धावांची भागीदारी केली. यानंतर बेन डकेटही निघून गेला. डकेट आपल्या अर्धशतकापासून 4 धावा दूर राहिला.
Harry Brook’s sublime century narrowed the gap between England and New Zealand in Christchurch 👏 #WTC25 | 📝 #NZvENG: https://t.co/HXf4bg0srm pic.twitter.com/Z61bGqMwe4
— ICC (@ICC) November 29, 2024
दुसरा वेगवान फलंदाज : डकेट बाद झाल्यानंतर ब्रूकनं ऑली पोपसह आघाडी घेतली. यानंतर दोघांमध्ये 151 धावांची भागीदारी झाली. ज्यामुळं इंग्लंडची धावसंख्या 200 च्या पुढे गेली. यादरम्यान ब्रूकनं कसोटीत 2000 धावा पूर्ण करण्याचा महान पराक्रम केला. हॅरी ब्रूक हा कसोटीत सर्वात कमी चेंडूंचा सामना करताना 2000 धावा पूर्ण करणारा जगातील दुसरा सर्वात वेगवान फलंदाज आहे. त्यानं 2300 चेंडूत 2000 धावांचा टप्पा गाठला. या बाबतीत इंग्लंडचा बेन डकेट पहिल्या क्रमांकावर आहे. डकेटनं 2293 चेंडूत हा मोठा टप्पा गाठला होता.
The Christchurch crowd rises to Harry Brook.
— England Cricket (@englandcricket) November 29, 2024
A SEVENTH Test match century! 💯 pic.twitter.com/i6bs4ok6eO
कसोटी क्रिकेटमध्ये कमीत कमी चेंडूंचा सामना करुन 2000 धावा पूर्ण करणारा फलंदाज :
- 2293 चेंडू - बेन डकेट (इंग्लंड)
- 2300 चेंडू - हॅरी ब्रूक (इंग्लंड)
- 2418 चेंडू - टिम साउथी (न्यूझीलंड)
- 2483 चेंडू - ॲडम गिलख्रिस्ट (ऑस्ट्रेलिया)
शतकं ठोकण्याचाही पराक्रम : हॅरी ब्रूकनं आतापर्यंत इंग्लंडसाठी 22 कसोटी सामन्यांच्या 36 डावांमध्ये 2000 हून अधिक धावा केल्या आहेत आणि 7 शतकं ठोकली आहेत. अशाप्रकारे, पहिल्या 22 कसोटी सामन्यांमध्ये 7 हून अधिक शतकं ठोकणारा तो इंग्लंडचा पाचवा फलंदाज ठरला आहे.
A brilliant day of Test cricket 🤌
— England Cricket (@englandcricket) November 29, 2024
Harry Brook guides England from 45/3 to near parity at the close. Some player. pic.twitter.com/BVStnP9Jqy
पहिल्या 22 कसोटी सामन्यांमध्ये 7 हून अधिक शतकं झळकावणारे इंग्लिश फलंदाज :
- डेनिस कॉम्प्टन (8)
- अँड्र्यू स्ट्रॉस (7)
- वॅली हॅमंड (7)
- हर्बर्ट सटक्लिफ (7)
- हॅरी ब्रूक (7)
हेही वाचा :