Hardik Pandya Natasha Stankovic Divorce: भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार असलेल्या हार्दिक पांड्या गेल्या काही काळापासून चर्चेचा मोठा विषय आहे. हार्दिकच्या नेतृत्त्वाखाली मुंबई इंडियन्सच्या संघाला अपेक्षित यश मिळालं नाही. तेव्हापासून क्रिकेटप्रेमींकडुंन हार्दिकवर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
एकीकडे करिअरमध्ये बॅड पॅच सुरू असतानाच आता चर्चा अशीही आहे की, हार्दिक आणि पत्नी नताशा स्टॅनकोविक यांच्यातील नात्यात कटुता निर्माण झाली आहे. दोघांचाही घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, याबाबत अधिकृत दुजोरा आलेला नाही. घटस्फोटानंतर हार्दिक पांड्याची 70 टक्के संपत्ती पत्नी नताशा स्टॅनकोविककडे जाणार असल्याचीदेखील चर्चा आहे.
नताशाची इन्स्टाग्राम स्टोरी: नताशानं वाहतूक चिन्हांचा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर केला. त्यात कुणीतरी रस्त्यावर येणार असं तिनं म्हटलं आहे. तिनं इन्स्टाग्राम स्टोरीमधून हार्दिक पांड्याला इशारा दिल्याचा अंदाज व्यक्त केला करण्यात येतोय. तिनं मागील शनिवारी तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये येशूची झलक दिसतेय. नताशानं या फोटोसोबत कोणतेही कॅप्शन दिलेलं नाही. घटस्फोटाच्या अफवांनंतर गेल्या शनिवारीच नताशा ही दिशा पटानीचा कथित बॉयफ्रेंड अलेक्झांडर अलेक्सलिकसोबत दिसली. दोघेही जेवणासाठी रेस्टॉरंटमध्ये पोहोचले होते. रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना पापाराझींनी दोघांनाही कॅमेऱ्यात कैद केलं. यादरम्यान एका पापाराझीनं नताशाला तिच्या घटस्फोटाच्या अफवांबद्दल विचारलं. यावर नताशानं प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. ती हसली आणि 'थँक्यू' म्हणून गाडीकडे निघाली. नताशानं यापूर्वी हार्दिकचं आडनाव इन्स्टाग्रामवर वापरलं होतं. परंतु आता तिनं हे आडनावही आता काढून टाकलं आहे.
- हार्दिक-नताशाचं लग्न कधी झालं?: हार्दिक पांड्या आणि नताशा यांचा विवाह 31 मे 2020 रोजी झाला होता. या जोडप्यानं कोरोनाच्या काळात साधेपणानं लग्न केले. पण त्यानंतर 2023 मध्ये दोघांनी हिंदू रितीरिवाज आणि ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार मोठ्या जल्लोषात लग्न केलं. या जोडप्याला एक मुलगा आहे. त्याचं नाव अगस्त्य आहे.
आयपीएलमध्ये खराब कामगिरी: मुंबई इंडियन्सनं आयपीएल 2024 मध्ये हार्दिक पांड्याकडं संघाचं कर्णधारपद सोपवलं. पण त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. मुंबईनं 14 साखळी सामने खेळले. त्यात फक्त 4 सामने जिंकले. तर 10 सामने गमावले. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सनं गुणतालिकेत 10व्या स्थानावर राहत स्पर्धेला निरोप दिला. खराब कामगिरीमुळं क्रिकेट चाहत्यांकडुंन हार्दिक पांड्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली जातेय. आयपीएलमधील आधी सर्व सामन्यांना मैदानात हजेरी लावणारी नताशा यावेळी सर्व सामन्यात गैहजर राहिली. तसंच हार्दिक आणि नताशा एकमेकांपासून वेगळे राहत असल्याची शक्यतादेखील वर्तवली जात आहे.
घटस्फोट घेणारे भारतीय क्रिकेटर
- दिनेश कार्तिक - 2007 मध्ये दिनेश कार्तिकने त्याची मैत्रीण निकिता वंजारासोबत लग्न केलं. लग्नाच्या 5 वर्षानंतर निकिता कार्तिकचा सहकारी असलेल्या मुरली विजयच्या प्रेमात पडली. त्यानंतर दिनेश कार्तिकनं वेगळं होण्याचा निर्णय घेतला. निकितापासून घटस्फोट घेतल्यानंतर कार्तिकनं स्क्वॉशपटू दीपिका पल्लीकलशी लग्न केलं.
- मोहम्मद अझरुद्दीन - भारताचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी 1996 मध्ये लोकप्रिय अभिनेत्री संगीता बिजलानीशी लग्न करण्यासाठी पत्नी नौरीनला घटस्फोट दिला.
- विनोद कांबळी - भारताचा माजी फलंदाजा 1998 मध्ये बालपणीची मैत्रीण नोएला लुईसशी लग्न केलं. मात्र काही वर्षांनी त्यानं माजी मॉडेल अँड्रिया हेविटशी लग्न करण्यासाठी नोएला लुईसला घटस्फोट दिला.
- जवागल श्रीनाथ - भारताचे माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ यांनी 2008 मध्ये माधवी पत्रावली नावाच्या पत्रकाराशी लग्न करण्यासाठी पहिली पत्नी ज्योत्सना यांना घटस्फोट दिला.
हेही वाचा