ETV Bharat / sports

आरसीबीविरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याच्या सावत्र भावाला मुंबई पोलिसांकडून अटक; काय आहे प्रकरण? - HARDIK PANDYA News

Hardik Pandya : हार्दिक पांड्याच्या सावत्र भावाला मुंबई पोलिसांनी अटक केलीय. त्यामुळे क्रिकेटविश्वात खळबळ उडाली आहे.

Hardik Pandya
मोठी बातमी! मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याच्या चुलत भावाला मुंबई पोलिसांकडून अटक; काय आहे कारण?
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 11, 2024, 11:04 AM IST

Updated : Apr 11, 2024, 1:41 PM IST

मुंबई Hardik Pandya : क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई पोलीसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं आरोपीला नुकतेच त्याच्या लोअर परळ राहत्या घरातून अटक केल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संग्रामसिंग निशाणदार यांनी दिलीय. वैभव पांड्या (37) असं आरोपीचं नाव आहे. तो हार्दिक आणि कृणाल पांड्यांचा सावत्र भाऊ आहे.

तीन भावांनी मिळून सुरू केली कंपनी : 2021 मध्ये हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांनी त्यांचा सावत्र भाऊ वैभवसोबत पॉलिमर व्यवसाय सुरू केला होता. या कंपनीत हार्दिक आणि कृणाल यांची 40-40 टक्के तर वैभवची 20 टक्के हिस्सेदारी होती. या भागीदारीच्या अटींनुसार, कंपनीचा नफा या आधारावर तिघांमध्ये विभागला जायचा. मात्र, कंपनीचा नफा त्याच्या भावांना देण्याऐवजी आरोपी वैभवनं वेगळी कंपनी स्थापन करुन ती त्याच्याकडे हस्तांतरित केली. त्यामुळं हार्दिक आणि कृणाल पांड्याला 4.3 कोटी रुपयांचं नुकसान झालंय. ही बाब हार्दिक आणि कृणाल पांड्याच्या लक्षात येताच त्यांनी त्याला जाब विचारला. मात्र त्यानं दोघांना धमकी दिली.

राहत्या घरातून अटक : या प्रकरणी अखेर क्रिकेटपटू आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याच्या सावत्र भावाला अटक करण्यात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला यश आलंय. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं (ईओडब्ल्यू) लोअर परळ इथून क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि कुणाल पांड्याचा सावत्र भाऊ वैभव पांड्या याला राहत्या घरातून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्याला न्यायालयात हजर केलं असता शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.

  • दोघं भाऊ आयपीएलमध्ये व्यस्त : हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या सध्या आयपीएलमध्ये व्यस्त आहेत. हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करत आहे. तर कृणाल पांड्या लखनौ सुपरजायंट्सचं प्रतिनिधित्व करत आहे. आज हार्दिकच्या मुंबईचा सामना बंगळुरूशी होणार आहे.

हेही वाचा :

  1. गुजरातनं राजस्थानच्या जबड्यातून हिसकावला विजयाचा घास; रशीद खान ठरला 'जायंट किलर' - RR vs GT
  2. शेवटच्या षटकात 26 धावा करुनही पंजाब विजयापासून 'दोन पावलं' दूर; हैदराबादचा विजयाचा 'सुर्योदय' - PBKS vs SRH

Last Updated : Apr 11, 2024, 1:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.